पालक - Grow your own food

Submitted by अक्षता08 on 25 April, 2020 - 23:48

घरच्या घरी आपण लावलेल्या भाज्या बनवून खाण्यात खरंच एक प्रकारचं समाधान असतं.
माझ्यासारखे बरेच जण असतील जे फ्लॅटमध्ये राहतात त्यामुळे किचन गार्डनिंग मध्ये बऱ्याच मर्यादा येतात. आणि त्यातही नोकरी, इतर कामे करून बागकाम करणे म्हणजे अजून कठीण गोष्ट. पण काही भाज्या अशा आहे ज्या आपण कुंडीत लावू शकतो म्हणजेच ज्या बाल्कनी आणि विंडो ग्रिलच्या कमी जागेसाठी उत्तम आहेत. त्यातील एक पालेभाजी म्हणजे 'पालक'.
पालक ही एक अशी पालेभाजी आहे जी आपण वर्षभर कधीही लावू शकतो. पालक बियाणांपासून लावावा लागतो (पालकाच बियाणं खूप कमी दरात नर्सरी/ ऑनलाइन नर्सरीमध्ये मिळतं). साधारण चार-पाच दिवसात अंकुर येतात. एकदा true leaves दिसले की आपण त्यानंतर पालक कधीही harvest (कापणी) करू शकतो. पालक पूर्ण तयार व्हायला साधारणतः 30 ते 40 दिवसांचा कालावधी लागतो. पहिल्यांदी पालक harvest केल्यावर (वरच्यावर पानं कापावी. मुळांपासून काढू नये ) त्यानंतर अजून १-२ वेळा परत पालक harvest करू शकतो. आठवड्यातून एकदा कडुनिंबाच्या तेलाचा फवारा मारावा.
पालकासाठी माती तयार करताना मुबलक प्रमाणात खत घालावे (उदा. शेणखत, कंपोस्ट ) आणि दर १५ दिवसांनी खत देत रहावे. उन्हाळ्यात दररोज पाणी द्यावे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात १-२ दिवसातुन एकदा पाणी द्यावे.
तर, वर्षभर कधीही, जास्त काळजी न घेता आपण घरच्या घरी सेंद्रिय खतापासून पालक लावून हवं तेव्हा त्याचा आस्वाद घेऊ शकतो. स्वतःच्या हाताने लावलेला पालकाची चव खरंच वेगळी लागते.

{True leaves - 'बी'ला अंकुर फुटल्यावर आपल्याला छोटंस पान (एक किंवा दोन) दिसतं त्याला Cotyledons म्हणतात. हा बीचा एक भाग असतो. त्यानंतर, True leaves दिसतात. म्हणजेच, एखाद्या रोपट्याला जी भविष्यात पानं येणार आहेत त्याचं हुबेहूब पण लहान आकारातील version जे दिसायला Cotyledons पेक्षा खूप वेगळे असतं }

IMG20200416093051.jpgIMG20200329135238.jpgIMG20200307131002.jpgIMG_20200426_085534.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान माहिती. हे लावायला भांडी किंवा कुंडी कश्या प्रकारची घ्यायची का पसरट ट्रे?/ माती आमच्या इथे सोसायटीत कुठुन तरी आणा वी लागेल.
धन्यवाद. मी लॉकडाउन संपला की किचन गार्डन सुरूच करेन. लायनीत उभे राहुन भाज्या घ्यायचा धस्का घेतला आहे.

@अमा
धन्यवाद !
मी salad पालक लावला आहे (आपल्या नेहमीच्या पालकापेक्षा ह्याची पानं लहान असतात) त्यामुळे मी ह्याला ६-७ इंचाची पसरट कुंडी घेतली होती.
जर तुम्ही बाजारात मिळतो तसा पालक लावणार असाल तर जास्त खोली (depth) असलेली कुंडी घ्या

@अनघा_पुणे
धन्यवाद !
नक्की लावा !!
कोथिंबीर आणि मिरचीच्या बिया विकत घ्यायचीही गरज नाही

अमा लॉक डाऊन संपायची वाट न पाहता किचन गार्डन सुरुवात करायला एक सोप्पा मार्ग सुचवतो ―
हायड्रोपॉनिक्स पद्धतीने मेथी भाजी (१ आठवड्याची) बनवायला अतिशय सोप्पी आणि छोट्या कुटुंबासाठी एकवेळची पुरेशी भाजी बनते. १०० ग्राम मेथी पासुन ८०० ग्राम भाजी ७व्या दिवशी तयार !
माहितीसाठी वीडियो

छान! मीही घरी पालक लावते. दोन तीन वेळा पानं काढून झाली की नंतर येणारी पानं चवीला चांगली नसतात.निबर असतात. शिवाय तुरा येऊन फुलंही यायला लागतात. या फुलांपासून घरच्या घरी बिया मिळतील का? मला कधीच बिया दिसल्या नाहीत.

@वावे
पालकाला फूल आली की, ती पुर्ण सुकल्यावर नंतर त्यातुन बिया मिळतात.(मी स्वतः घरच्या पालकापासून बिया घेतल्या नाही आहेत परंतु अशाच पद्धतीने गणेश वेल आणि एकदंती लसुण च्या बिया मिळवल्या आहेत).

@Kashvi
नक्की घरी लावा !!
आणि घरच्या पालकाचे (spinach) फोटो पाठवा Happy

मी नक्कीच लावणार. बिया मिळाल्यावर लगेच. मला घरी कोथिंबीर, पालक आणि एक कुठलीतरी पालेभाजी लावायची आहे.

@वावे
झाड मरू नये इतकच पाणी द्यायच.
होय. आपोआप फूलं सुकतात. आणि नंतर त्यातुन बिया मिळतात.

@Bagz
नक्की लावा !!
सोबत मेथी पण लावु शकता

पालक मस्त आला आहे.
एका मोठ्या कुंडीत अरवी लावली होती.अळू येते.५-६ पानांची भाजी होते.बाकी वर दाखवल्याप्रमाणे कुंडी ठेवायला जागा नाही.

@अज्ञानी
ही पद्धत (hydroponics) try करेन

अक्षता ताई माहिती अवडली. मी पण एकदा कुंडीत राजगिरा , दुसर्‍या कुंडीत मेथी आणि तिसर्‍या कुंडीत कोथिंबीर लावली होती...पण उन पुरेसं न मिळाल्यामुळे आणि पावसाळी दिवसांत या सगळ्या भाज्या उगवल्याने कुंड्यांमध्येच नासल्या. त्यांची आठवण आली वाचून!
लेखातील फोटोज दिसत नाहीयेत. काय करू? (लॅपटॉप वरून लॉग ईन असल्यामुळे दिसत नाहीये का?)

वर्णिता ताई तुमचा फोटो दिसतोय. मस्त मोठा झालाय पालक!