बेटर कॉल सॉल!

Submitted by maitreyee on 11 April, 2020 - 14:46

saul.jpg
तुम्ही ब्रेकिंग बॅड फॅन असाल तर सॉल ला नोटिस न करणे शक्य नाही. ब्रेबॅ च्या दुसर्‍याच सीझन मधे सॉल, द "क्रिमिनल" लॉयर ची एन्ट्री झाल्या झाल्या बॉब ओडेनकर्क उर्फ सॉल गुडमन भयंकर भाव खाऊन गेला.
ब्रेबॅ च्या जिनियस दिग्दर्शक विन्स गिलिगन ला सॉल च्या पात्रासाठी दुसरी आख्खी सीरीज बनवावीशी वाटली हेही त्याच्या अफलातून क्रिएटिविटीला साजेसेच. अन्यथा प्रचंड गाजलेल्या सीरीज चा स्पिन ऑफ पण तितकाच प्रभावी असणे हेही जवळपास अशक्यच. पण गिलिगन ने करून दाखवलेय!!
ब्रेबॅ संपते तेव्हा सॉल चे शेवटचे स्टेटस आपल्याला "हूवर वॅक्यूम क्लीनर रीपेअर्स " वाल्याच्या मदतीने आयडेन्टिटी बदलून तो एक साधा सिनॅबन चा मॅनेजर बनून ओमाहा मधे कायमचा निघून जातो इतके माहित आहे. तिथेच बेटर कोल सॉल ची सुरुवात आहे. आता सिनॅबन मधे अत्यन्त सुमार, एकाकी, बोरिंग, आणि कुणी कधी आपल्याला ओळखले तर काय या कायमच्या भितीसकट आयुष्य जगणार्‍या सॉल ला त्याचा भूतकाळ आठवतो.. ब्रेबॅ चे कथानक घडण्याच्या आधी काही वर्षांचा काळ.
सॉल गुडमन चं खरं नाव जिमी मॅकगिल. त्याचा मोठा भाऊ चक हा एक मोठा यशस्वी लॉयर आणि प्रसिद्ध लॉ फर्म चा पार्टनर. जिमी मात्र चलाख असला तरी लहानपणापासून शिक्षणात आपट्या खाल्लेला, राजमार्गाऐवजी कायम धोक्याचे किंवा गैर असे शॉर्टकट शोधणारा, कुठल्यातरी समोअन आयलंडवरच्या कॉलेज मधून कॉरस्पॉन्डन्स कोर्सेस करून लॉ ची डिग्री घेतलेला पण भावासारखा मोठा लॉयर होण्याची स्वप्नं बघणारा.
जिमीचा सॉल गुडमन होण्यापर्यन्त चा प्रवास म्हणाजे ही सीरीज. आतापर्यन्त ५ सीझन आले आहेत. पाचवा अ‍ॅक्चुअली नुकताच रिलीज झाला आहे. या सीरीज ची चर्चा इथे करता येईल.
माझ्यासाठी या सीरीज चे अजून एक आकर्षण म्हणजे ब्रेबॅ मधली पुन्हा भेटणारी कॅरेक्टर्स! माइक अर्मनट्रॉट चा पॅरलल लीड सारखाच रोल आहे. गस फ्रिन्ग चे पण महत्त्वाचे पात्र आहे, बाकी टुको, हेक्टर आणि सालामान्का फॅमिली, लिडिया, या सीझन ला हॅन्क ची पण एन्ट्री झाली आहे!! शिवाय ब्रेबॅ मधे नसलेली सॉल ची गर्लफ्रेन्ड किम, भाऊ चक, सालामान्कांचा उजवा हात नाचो, अशी बरीच इंटरेस्टिंग पात्रं आहेत. ब्रेबॅ पाहिलेली नसली तरी ही सीरीज स्वतंत्र पणे बघू शकता पण ब्रेबॅ बघितली असेल तर जास्त मजा येईल हे नक्की!
४ सीझन्स नेटफ्लिक्स वर आहेत. पाचवा AMC वर सध्या सुरू आहे.
imdb लिन्क - https://www.imdb.com/title/tt3032476/
https://en.wikipedia.org/wiki/Better_Call_Saul
*********** स्पॉयलर वार्निंग - खालील चर्चेत बरेच स्पॉयलर्स येऊ शकतील. जपून वाचा!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

हो ती जिमीच्या बर्‍याच अ‍ॅक्शन / चॉइसेस नी हर्ट होताना दिसते आधीच्या सीझन्स मधे. तसे तर मेसा वर्डे च्या त्या प्लॉट च्या केस मधे जिमी त्या म्हातार्‍याला कॉम्पेन्सेशन देववतो आणि वर केविन ला त्या लोगो आर्टवर्क साठी फाइन बसतो तेव्हा मला वाटले आता जोराचे भांडण करेल किम पण ती चक्क शांतपणे "ऑर.... ऑर वी कॅन गेट मॅरीड " असे म्हणते ! इन फ्युचर तिला त्याच्या अगेन्स्ट टेस्टिफाय करायची वेळ येऊ नये हे कारण असले तरी तेव्हा मला चकित व्हायला झाले होते.

"ऑर.... ऑर वी कॅन गेट मॅरीड " असे म्हणते ! इन फ्युचर तिला त्याच्या अगेन्स्ट टेस्टिफाय करायची वेळ येऊ नये हे कारण असले तरी तेव्हा मला चकित व्हायला झाले होते. >> टोटली. मला तर ते पुढचे कारण कळेपर्यंत ही काय एकदम मराठी सिरीज सारखी ट्विस्ट असे वाटले होते Happy

पण तिच्यात तो कॉन एलेमेन्ट आहेच ना! फक्त तो रॉबिनहुड (मायबोलीवरचा नव्हे! Proud ) व्हरायटी आहे. ते उंची टकीलाचं झाकण त्याचाचतर सिम्बॉल केला आहे ना गिलिगनने! कॉमन मॅनला नाडणार्‍या मोठमोठ्या कंपन्या इन प्रिन्सिपल माफिया/कार्टेलपेक्षा फारशा वेगळ्या नाहीत हे तिला कळलेलं आहे.
हॉवर्ड जिमीला त्या माल्प्रॅक्टिस इन्शुरन्सबद्दल सांगतो - वरकरणी दोष स्वतःकडे घेतो - तेव्हा त्याने ते 'फक्त' जिमीलाच सांगण्यातली गोम तिला एकटीलाच कळते!
ती सॉलचे निर्णय नुसते 'समजून घेत' नाही, ती त्याच्याशी रेझोनेट करते. पण तिला शक्यतो तसं व्हायचं नाहीये. शक्यतो.

लालोला ती जे झाडते ते तर एकदम टाळ्याशिट्ट्या प्रकरण आहे! तसंच हॉवर्डने तिला जिमीविरुद्ध वळवायचा प्रयत्न केल्यावर जे हसते तेही!

लालोचं काम केलेला अ‍ॅक्टर हे एक भारीच फाइंड आहे! त्याच्या एन्ट्रीला मला वाटलं इतकं ब्रॉड स्माईल आधी कुणाचं बघित्ल्याचं आठवततरी नाही. आता तेच स्माइल कसलं स्केअरी डेडली वाटतं! >> करेक्ट! समस्त सालामांका 'फॅमिली'च भयानक आहे. तो हेक्टर सालामांकाही महाखट म्हातारा आहे आणि ते दोन चंगुमंगु सालामांका तर कंप्लिट सायको आहेत.

हेक्टर सालामांकाची व्हिलचेअरवर आल्यानंतरची अ‍ॅक्टिंगही कसली मस्त आहे.

सालामान्का फ्यामिली मधे एकमेकात बंधूप्रेम फार आहे पण, फॅमिली इज एवर्रीथिंग Happy त्या हेक्टर आणि लालोचं बाँडिंग किती घट्ट दाखवलंय! हेक्टर फक्त घंटी वाजवून " लालो ला मारण्याचा प्रयत्न केलेली माणसे गस ने पाठवली होती याचा एविडन्स गोळा कर " असं लालो ला सांगतो ( आणि लालोही ते बरोब्बर समजून घेतो) तो पार्ट फार भारी होता.

Pages