Hotstar स्पेशल ऑप्स (with spoilers)

Submitted by स्वस्ति on 21 March, 2020 - 01:31

HOTSTAR वर स्पेशल ऑप्स आहे.
अफलातून केके मेनन , सहज सुंदर गौतमी आणि handsome करण .

होउ दे चर्चा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Hmm . पण हाफिजला त्यांच्या बद्दल सगळं माहिती असताना , अहमदवर संशय आल्यावर तो एकदाही तिची चौकशी करत नाही. किंवा इस्माईलला तिचा संशय येत नाही.

तिथेही दाखवलाय पण उगीचच. ~~ +12345
हो.. स्वस्ति right...
पण कामं सगळ्यांंचीच चांगली आहे त.. आपापल्या रोल मधे कनविंसींग.. आणि लोकेशन्स पण सगळी सही आहेत.. ईखलाख च्या घरातील infinity pool व गार्डन एरिया तर वॉव...

बाळबोध ! नीरज पांडे चे बेबी आणि शबाना ज्यांनी पाहिले आहेत त्यांना तर देजा वू आहे.
केके मेनन हा एकमेव प्लस पॉईंट आहे.

नीरज पांडे चे बेबी आणि शबाना ज्यांनी पाहिले आहेत त्यांना तर देजा वू आहे.
केके मेनन हा एकमेव प्लस पॉईंट आहे.>>>>

बेबी आणि शबाना सोबत मी ऐय्यारी पण म्हणेन....
रुहानीचं कॅरेक्टर शबानाचंच एक्सटेंशन वाटलं...
केके आणि अय्यारीमधला मनोज खूप पॅरलल आहेत...

बेबी बघितलाय. पण कायम तुकड्या तुकड्यात.
आता शबाना आणि अय्यारी पण बघणार. Happy

बाय द वे बेबी बघितला असूनही मला इतकं देजा वू नाही झालं. एकाच शहरात एजंट असणं आणि इतक्या देशात इतके एजंट असणं (आणि मग त्या अनुषंगाने प्रत्येकाची वेगळी काहीतरी स्टोरी/ स्टाईल/ बॅकग्राऊंड) हे जास्त रंजक करतं स्टोरीला. बेबी मधला तो एकमेव एजंट बोर आहे. फारुख इज डोळ्यात बदाम <3

मध्येच शेवटच्या दोघींची वेगळीच दुखं, वेगळीच बॅकग्राऊंड.. तरीही त्यांना आतून यातून बाहेर पडायचे आहे हे केवळ फोनवरून जाणवून त्यांना सोडून देण्याची ऑर्डर.. खूप छान रंगवलंय सगळं Happy

बेबी तर ऑटाफे आहे. कधीही बघू शकते .
शबान ठीक होता. अय्यारे केवळ सिद्धर्थ मल्होत्रासाठी सहन केला.

बेबी बघितला असूनही मला इतकं देजा वू नाही झालं. एकाच शहरात एजंट असणं आणि इतक्या देशात इतके एजंट असणं (आणि मग त्या अनुषंगाने प्रत्येकाची वेगळी काहीतरी स्टोरी/ स्टाईल/ बॅकग्राऊंड) हे जास्त रंजक करतं स्टोरीला. >>>> +100000

मी तर या वेबसिरीज च्या प्रेमात. कोणाला कसलीही चर्चा करावी वाटली तरी मी लिहीन इतकी आवडलीये मला Happy>>>>>सेम पिंच ++++११११११ सध्या पारायणं करतेय

संपवली बघून, शेवट नाही आवडला , इतक त्या दोघींना पकडायचे कष्ट घेतले, तर रेड हँडेड आर्म्ड पकडलेल दाखवायचकि, उगीच दिव्या दत्ताने गिव्हप केल्याचे दाखवून सिंपथी कशाला ?
मलाही सोनिया कॅरॅक्टर नक्की रॉ एजन्ट आहे कि अजुन कोण त्या बद्दल कनफ्युजन झालं, ती त्याला फारुख म्हणते .
बाकी सीरीज थोडी फिल्मी असली तरी आवडली, केके मेनन बेस्ट आहे! फारुख , हाफिझ, विनय पाठक, गौतमी सगळ्यांची कामं छान आहेत !

'बटन दबा देना...' सांगते पण बटन आणतच नाही.. Happy
बाकी बालाला कथेसाठी मारलाय.... चाकू / सुर्‍यानी खेळणारा एजंट असाच जातो मारामारी करायला...
मला नेहमी प्रश्न पडतो.. हातात बंदुका / विस्फोटके वगैरे घेऊन जाणारे सगळे, शेवटी हातापायानी मारामारी का करतात? Happy
केके ला गोळ्या घालणार्‍या त्या शूटरला नंतर आणलाच नाही... (आणला तो फोटो काढण्यापुरता).. दिग्दर्शक विसरला असावा त्या पात्राचे काय करायचं ते..

आत्ताच पाहून संपवली, आणि अफाट आवडली. के के मेनन आवडतोच पहिल्यापासून. काय दिसतो आणि काय काम केलंय, डोळे अफाट बोलतात त्याचे. त्यानंतर आवडला फारुख, हा नवीन आहे का कुणी? याआधी कुठे पहिला नाही. पण जो पाहिलाय तो न विसारण्यासारखा. इस्माईल आणि हाफिज पण मस्त. तो टॅक्सी असं कसं सगळं सांगतो त्या माणसाला ? एजंट ना मदत करणारे लोक असे असतील तर अवघडे. नशीब त्यावेळीच हाफीजला मारायचा प्लॅन असतो म्हणून वाचतो आपला फारुख, मी शेवटपर्यंत तो वाचण्याची दुआ करत होते...
शेवट पण आवडला, उगीच ताटकळत ठेऊन पुढच्या सिझनची सोय केलेलीं नाही. म्हणजे आला तरी चालेल ऑर नाही आला तरी.
वर कोणीतरी सक्रेड गेम सोबत तुलना केली आहे, मुळात ही तुलनाच नाही होऊ शकत. त्यात एका गुन्हेगाराचा आयुष्यभराचा प्रवास आहे त्यामुळे rawness भरपूर आहे, ही RAW च्या कामगिरीची गोष्ट आहे सो त्यात सगळं एकतर सगळं गुप्तपणे चालतं त्यामुळे असा rawness (RAW नाव असलं तरी Happy )असूच शकत नाही, मलातरी थोडी फिल्मी असली तरी बाळबोध नक्कीच नाही वाटली.

स्पेशल ऑप्सची स्टोरी (विथ फ्लॉज) एंगेजिंग होती. पण कलाकार (डोळ्यात बदाम Wink ) आणि लोकेशन्स यांनी डोळे टीव्ही पाहता पाहता मध्येच फोनवर पाहाणं होतं तेही झालं नाही. Happy

हो स्टोरी एंगेजिंग होती. अ‍ॅक्टर्स छान होते, कथेत लॉजिकल फ्लॉज बरेच होते मात्र. जे पट्टीचे थ्रिलर्स बघणारे लोक असतील त्यांना निश्चित खटकतील. नेहमी असे थ्रिलर्स बघत नसाल तर ओवरलूक होऊ शकतात.
उदा. ते ऑडिटर्स कोण, काय लेवल ची लोक आहेत? त्यांना आधी हिंमत म्हणतो मी माझ्या एजन्ट्स बद्दल माहिती देणार नाही अन उडवून लावतो, पण मग सगळी कुंडली सांगतो, सिक्रेट मिशन्सस्चे डीटेल ही देतो. यांचे काही प्रोटोकॉल, क्लियरन्सेस नसतात का?? एकच रॉ डिपार्टमेन्ट असलं तरी या ग्रुप ची मिशन्स त्या ग्रुप ला अशी कॅज्युअली सांगितली नक्कीच जात नसतील. मान्य आहे की आपल्याला ती कथा समजावी म्हणून ऑडिटर्स चे थ्रेड निर्मण केलेला आहे पण तो वीक वाटतो.
बरं त्या इकलाख खान चे अस्तित्व च प्रुव्ह करता आलेले नसते तर १९ वर्षे हिंमत चे त्याच्या केसवरच काम चालू असते त्याचे अप्रूव्हल, त्याचा कोटयवधी चा खर्च त्याला कसा मिळतो? मुळात हिंमत ला कुणी सुपिरियर्स नसतात का? त्याचे काय काम चालू आहे , का चालू आहे हे कुणाला रिपोर्ट करावे नाही लागत?
बाला हफिज वर हल्ला असा रँडमली अन एकट्याने का करतो? त्यांचा काही स्पेसिफिक प्लान असल्याचेच दिसत नाही. इतर साथीदार लग्नात कानाला उगीचच ब्लुटूथ लावून टाळ्या पिटत बसतात? हफिज पण स्वतः वर हल्ला होऊन एक खून करून पण अ‍ॅलर्ट न होता कोणाला न शोधता पुन्हा परत येऊन लग्नात सामील होतो? त्याचे प्रेत कुणी नेले हेही बघत नाही? सगळेच अतर्क्य होते.
शेवटी जेव्हा हफिज ला समजते की अमजद उर्फ राशिद म्हणजे इंडियन एजन्ट फारुख अहे तेव्हा तो त्याच्या शेजारीच कार मधे बसलेला असतो.
गाडी त्याची, ड्रायव्हर त्याचा , सोबत अजून एक गार्ड्स ने भरलेली गाडी. अशा वेळी तातडीने गाडी थांबवून सरळ फारुख ला शूट/ एक्झिक्यूट वगैरे करण्याऐवजी चालत्या गाडीत इयत्ता आठवी नापास विद्यार्थ्यांची झटापट शोभेल अशा प्रकारे गचांडी धरून मारामारी का सुरु करतो?

हो हो, हिंम्मत सिंगचं कॅरेक्टर अगदि स्ट्राँग चितारलेलं आहे; ऑलमोस्ट अनटचेबल, इन्विंसिबल. मला वाटत होतं कि पुढे जाउन तो अजित डोवाल बनेल कि काय...

सिरीज बघून आत्ता संपली पण या धाग्यावर लगेच येण्याचा मोह आवरला नाही.
मैत्रेयी तुमचा शेवटचा परिच्छेद Rofl पूर्ण प्रतिसादाला सहमत. उत्कंठा शेवटच्या भागात अगदी शिगेला पोचली होती पण शेवटचा भाग अगदी फिस्स होता. सगळंच अर्धवट सोडून दिलं अनुत्तरित. मालिका कशी चॅनेलचे आदेश आले की सगळं एका शेवटच्या भागात कसंतरी संपवून गाशा गुंडाळतात तसं वाटलं. बाकी उद्या लिहिते.

मी आज्च पाहिली. खूप आवडली. केके मेनन, आणि फारुख मस्त एक्दम..!
त्या मंत्री दाखवल्या आहेत त्या कोण आहेत? म्हण्जे तेव्हाच्या कुणी मंत्री आहेत प्र्त्य्क्श?
त्या हिंम्मत सिंग वर अटॉक करण्यासाठी माणसं पाठवतात?
मग हाफिज च्या मोबाईल मध्ये एकदा हिंम्मत सिंग चा, त्याच्या बायको मुलीचा फोटो दाखवला आहे तो का?

मी इतक्यातच बघून संपवली.
हिम्मत सांगतो ना फारूक ला, सोनिया तुम्हे बचा सकती है. दोन्हीही अर्थ निघू शकतात कि हिला मारून संशय इकलाखवर न्यायचा कि दुसरा आपोआप विश्वास ठेवेल. पण शेवट बघितल्यावर वाटलं कि तिनी मरण्याची फक्त acting केली होती.
शेवटची मारामारी हा सात्विक संताप असू शकतो आणि शिवाय हा आपल्या पकडीत आहे, काहीच करू शकणार नाही, ह्याला जरा झोडपुन घेऊ असा इकलाखचा फाजील आत्मविश्वास पण असू शकतो. त्याला माहिती नसत ना कि बाहेर शार्प शूटर आहेत.
दोन खाटकलेल्या गोष्टी म्हणजे बाला चा मरण. (मे बी त्याला नवीन सिरीयल मिळाली) Happy
आणि दुसरं म्हणजे ज्या बायका ऑलमोस्ट कॉन्व्हर्टेड मिलिटन्ट आहेत त्यांना असंच सोडून देणं. त्या परत कधीही हा डाव खेळू शकतात. कदाचीत त्यांच्यावर नजर ठेवायला सोडलेले असू शकते.
इकलाख मरताना हिम्मत ला सांगतो कि ये रही मेरी चाल आणि फारुख त्याला बोलू न देता गोळी घालतो. क्या अगले सिझनमें फारुख दुश्मनकी साईड से होगा?

Pages