माझा होशील ना

Submitted by DJ.. on 19 February, 2020 - 02:40

२ मार्च पासुन 'झी मराठी' वर नवीन मालिका येत आहे जिचं नाव आहे 'माझा होशील ना'

मा.हो.ना. ही सिरिअल सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता आपल्या भेटीला येत आहे. आता लवकरच कळेल ही नवी सिरिअल आपली होते का ते..! Proud

mhn.JPG

Group content visibility: 
Use group defaults

विजय गोखले संगीत नाटककार विद्याधर गोखले यांचा मुलगा.फार फेमस नाही झाला,पण विनोदी भूमिका जास्त वाट्याला आल्या.पण संगीत नाटकाचा वारसा त्यांची बहीण शुभदा दादरकर (अद्वैत आणि आओंकार दादरकरची आई) यांनी चालू ठेवला ,त्यामध्ये विजय गोखलेंचा सहभाग आहे.विद्याधर गोखले प्रतिष्ठान तर्फे संगीत नाटकाचे जे शिक्षण दिले जाते त्याच्या जडणघडणीत ही बहीण भावंड कार्यरत आहेत.

UP Happy

विजय गोखले आहेत तसे फेमस. माझे मन तुझे झाले मधला रोल गाजलेला, छान काम केलं होतं त्यांनी.

आशुतोष गोखले मस्त अभिनय पण मी सिरीयल बघत नाही, मुळात सावळ्या नायिकेच्या भुमिकेसाठी गोरी नायिका घेऊन तिचा मेकअप सावळा केलाय हे पटलं नाही.

शुभदा दादरकर आणि त्यांचे पती पुर्वी दुरदर्शनवर कामगार विश्वमधे असायचे.

विद्याधर गोखले आमच्या कॉलेजमधे आलेले, शायरीवर केलेला प्रोग्रॅम.

माझे मन तुझे झाले.........अन्जू..ही कोणती सिरियल.कुठे होती?
माझा होशील ना मध्ये काहीतरी सिक्रेट आहे जे तवया व्रुध्दांनाच माहिती आहे,आदित्यला नाही.म्हणजे तो खरा आदित्य देसाई नाहीच.
आताच प्रोमो पाहिला.
मला एकदम तुपारे आठवली एक हीरो ,दोन नाव.

माझे मन तुझे झाले.........अन्जू..ही कोणती सिरियल.कुठे होती? >>> इ tv , कलर्स मराठी. सुरु झाली तेव्हा इ टीव्ही नाव होतं, संपली तेव्हा channel कलर्स मराठी झालेलं. कलर्स मराठी झाल्यावर आठ महिने होती.

माझा होशील ना ...
सीरियल सध्या तरी बरी वाटतेय !
पटकथा घट्ट आहे आणि डिटेलिंग ही चांगलं आहे ...
डायरेक्टर चांगला दिसतोय .

सध्यातरी माझ्याकडून ****

विद्याधर गोखले ( जुने संगीत नाटककार )याना चार मुलं दोन मुली दोन मुलगे . सुनंदा ( आडनाव माहित नाही ) आणि शुभदा दादरकर या मुली आणि विजय गोखले तसेच संजय गोखले हे मुलगे. त्यातले सुनंदा आणि संजय गोखले हे या क्षेत्रात नसल्याने कोणालाच माहिती नाहीत . शुभदा दादरकर या अद्वैत दादरकर ( मनाबा मध्ये आता राधिकाचा नवरा ) आणि ओंकार दादरकर ( शास्त्रीय गायक ) यांच्या आई. शुभदा दादरकर यांचे मिस्टर श्रीकांत दादरकर हे माणिक वर्माचे भाऊ ( माणिक वर्मा म्हणजे पूर्वीच्या माणिक दादरकर ) त्यामुळे ते वंदना गुप्ते आणि इतर तीन भगिनी यांचे मामा आहेत . त्यामुळे अद्वैत आणि ओंकार दादरकर हे वंदना गुप्ते / भारती आचरेकर आणि दोन भगिनी यांचे मामे भाऊ Lol
आणि विजय गोखले याना दोन मुलं त्यातला आशुतोष गोखले हा तुपारे मुळे लोकांना माहिती झाला . आता रंग माझा वेगळा मध्ये त्याला लीड रोल पण मिळाला. स्वतः विजय गोखले हे पूर्वी नाटकात काम करत होते. खूप नाटकांमध्ये त्यांनी काम केलेली आहेत Happy

त्यामुळे अद्वैत आणि ओंकार दादरकर हे वंदना गुप्ते / भारती आचरेकर आणि दोन भगिनी यांचे मामे भाऊ Lol>> माझ्या सासुबाई माणिक वर्मांच्या कॉलेज मैत्रीण व अगदीच जवळच्या होत्या त्यामुळे मी त्यांच्या बरोबर दादरकरांच्या घरी गेलेली आहे. त्यांचे पुण्यात गोळ्या बिस्किटे बेकरी
आयटेम विकायचे छोटेसे दुकान होते. तेव्हा ओंकार अद्वेइत खूपच लहान होते.

ह्या सिरीयलचं टायटल सॉंग सुरु होतानाच जे म्युझिक आहे ते संपलं की मला लगेच तुमको पाया है तो जैसे खोया हु येतं मनात

Pages