आई तूला आठवतय का ग?

Submitted by केदार१२३ on 11 December, 2007 - 03:49

आई.

लहान मूलाला जेन्व्हा नवीकोरी पाटी आणि पेन्सील मिळते तेंव्हा त्याला काय लीहू आणि काय नको अस होवून जात. नव्यकोर्या पाटीचा गन्ध अपरीचीतसा भिनत असतो. तो काय काय लिहीतो त्यावर रेघोट्या मारतो, काही चित्र काढतो. तस पाहील तर त्या चित्रात आणि त्या रेघोट्यात काहीही नसत वर वर पाहील तर. पण नीट निर्खून पाहील तर खूप काही असत हो त्यात. नव्याची नवलाई असते, आपल्या पहिल्या स्रुजनाचा आनंद असतो. तो ते लगेच आईला दाखवतो. आईला ते सर्व दिसत जाणवत. ती त्याच कवतीक करते.

माझ ही सध्या असच झालय. मला मायबोलीची नवी कोरी पाटी मिळालीये लिहायला. काय लिहु आणि काय नको अस होतय. म्हणूनच पहीला शब्द लीहिला आई.

आई तुला खूप काही सांगायच होत ग. पण राहूनच गेल बघ. ते पत्र रूपी लिहाव म्हणतोय.

आई तूला आठवतय? लहान पणी मी खूप मस्ती करायचो. अगदी खूप दमे पर्यन्त हूंदडायचो. आणि संध्याकाळी घरी आलो की शुभम करोती न म्हणता, न जेवता झोपायचो. मग मध्यरात्री किन्वा पहाटे अवचीत जाग यायची भूकेने. तूला उठवायचो मी मग. आणि तू मल कॉफी करुन द्यायचीस वेलची घालुन बरोबर मारी बिस्किट. ती कीती छान लागायची. ती चव कुठेच मीळत नाही ग. कुठे हरवलीये कोणास ठाउक. आजही रात्री बेरात्री कधी जाग येतेय. पण आता कॉफीच प्यावीशी वाटत नाही बघ

आई तुला आठवतय? तू रोज पहाटे ४ वाजता उठायचीस. सर्वन्चा जेवण नाश्ता बनवायचीस आणि सकाळी ७ वाजता घर सोडायचीस कामा साठी. मला ही कधी कधी पहटे जाग यायची तो केलेल्या जेवण्याच्या वासाने. आजही अशीच कधीतरी जाग येते आणि तो परीचीत वास शोधत राहाते.

आई तुला आठवतय? मी जेन्व्हा पहील्यान्दा परदेश प्रवासाला जाणार होतो. तेन्व्हा आपण एक ऑडीयो केसेट आणलेली- कल हो ना हो. मी पहिल्यान्दा ती गाणी ऐकलेली तुझ्या मांडीवर नीजून्. आजही जेंव्हा ते गाण परत ऐकतो तेन्व्हा शब्दच कानावर पडत नाहीत ग आठवतो तो फक्त स्पर्श तुझ्या उबदार साडीचा.

आई तूला आठवतय तू जेन्व्हा लाम्बच्या प्रवासाला निघलेलीस? मी आलेलो की ग तुला भेटायला. मी हळूच तुझ्या केसातून हात फिरवलेला. तूला जाणवला का ग तो. मला अजून आठवतोय ग तो स्पर्श.

आई, मी जेन्व्हा तूला भेटेन ना तेन्व्हा खूप खूप काही सांगायचय ग तूला.

केदार

गुलमोहर: 

खुप सुन्दर अगदी डोळ्यात पाणी आल वाचुन!!! missing aai!!!!!!!!!!!!!

पहिलेच लिखाण!
एकदम सही!!
अभिनंदन!
Happy
परदेशात गेल्यावर आईची आठवण जास्तच येते, नाही?
Sad

परदेशात गेल्या वर जास्त आठवण येते आणी देशात नाही???? आइ पासुन लाम्ब गेल ना कि आठवण येते

अगदी नेमकं लिहीलंस रे!!!
मला माहीत नव्हतं तु पण इतकं छान लिहतोस ते Happy

पण मला हा अनुभव कधीच आलेला नाही, कारण मी आईला सोडुन कुठे गेलोच नाही आणि जाणार पण नाही.

एकदम छान लिहले आहे...
आई लांब असली की खुपच आठ्वण येते..

खुप रिकामे वाटते,,, काही सुचत नाही,,, मी अनुभवले आहे...तो काळ खुप कठीण जातो...
Sad

शुभेच्छा..
प्रिया पोरे

केदार,
अतिशय सुंदर लिखाण केलेस ... डोळ्यांतून अश्रू आन्लेस...अगदी हृदयाला जाऊन भिडले बघ...
मनपुर्वक आभार तुझे...
खरोखरच आपूल्या जीवनात आईचे महत्व सर्वात उच्च आहे रे... पण काहींना हे कळायला आणि कळल्यास ते वळायला फ़ार वेळ लागतो ... हे आपूल्या समाजाचे सर्वात मोठे दुर्भाग्य...

bhushan.otawanekar@gmail.com
मुंबई

खुप छान लिहिले आहे.

मी आईपासुन दूर असल्यामुळे आईची खुप आठवण आली आणि डोळ्या॑त पाणि आले.

केदार खरंच खुप छान लिहितोस रे तु!! लिहित रहा.... मन मोकळं होईल तुझ!!

केदार, खुप छान लिहलसं, लेख वाचला आणि प्रथम तुझं प्रोफाइल पाहीलं. तुझं लिखानही आवडलं आणि तुही. (जर प्रोफाइलमध्ये लिहलय तसा असशील तर) लिखानात सातत्य ठेव. पुढच्या लेखनकामाठीला शुभेच्छा!
मार्तंड. martand73@rediffmail.com

आई असणे म्हण्जे आकाश आसणे ! आई आसणे म्हणजे धरतीची माया मिळ्णे ! आईचे आस्णे म्हण्जे सारे विश्वच मुठीत आसणे!.........पण आई नसणे म्हणजे .........निष्प्रेम जिवनात रामच नसणे!