स्कोडगासौरसच्या अंगणात

Submitted by aschig on 13 April, 2009 - 02:43

स्कोडगासौरसच्या अंगणात
(आशिष महाबळ ११ एप्रील २००९ लमाल - ऋतु - २)

पुह, ख्रिस्तोफर रॉबीन आणि सवंगडी स्कोडगासौरसच्या अंगणात जमुन नेहमीप्रमाणे गप्पा मारत होते. थंडी असल्यामुळे ख्रिस्तोफर रॉबीनने एक छोटीशी शेकोटी पेटवली होती. बाजुला येऊन मात्र कुणी बसत नव्हते.

नेहमीप्रमाणे टिगर उड्या मारत होता. आज मात्र तो वेगळ्याच मुड मध्ये होता. तो ज्या जंगलात आधी
रहायचा तिथल्या गोष्टी सांगत होता. गोष्टी काय गप्पाच होत्या. टिगर म्हणाला की प्राण्यांव्यतिरिक्त तिथे अनेक पऱ्या, यक्ष आणि जादुगार पण होते. त्यातील एका जादुगाराला एका यक्षाची खूप भिती वाटायची. टिगरने त्या यक्षाला पकडुन जादुगारासमोर आणले होते म्हणुन टिगरला खास बाऊंसींगची जादुई कुपी मिळाली होती. इतरांना दचकवण्याशिवाय थंडीपासुन रक्षणाकरता देखिल त्याची त्याला मदत व्हायची.

वोल शेजारी एका ऊंच झाडावर बसला होता. खाली यायला नकार देत तो म्हणाला की त्याला शेकोटीची काही गरज नाही. त्याने जेंव्हा ज्ञान मिळवण्याकरता हिमालयात कुडकुडत तपश्चर्या केली होती तेंव्हा तिथल्या एका महंताने त्याला उष्णरक्तिय असुनही थंडी वाजणार नाही असा वर दिला होता.

पुह म्हणाला की तो बसल्याबसल्या थोडाथोडा वेळ हायबरनेट करु शकतो त्यामुळे त्याला बाह्य उष्णतेची गरज नाही.

आपल्याला त्यात काही स्वारस्य नाही असे म्हणुन इयोर नेहमीप्रमाणे सगळ्यांपासुन जरा दूरच होता.

पिगलेट आणि रॅबीट काय म्हणायचे याचा विचारच करत होते तितक्यात बाजुच्या रेतीच्या ढिगाऱ्यावरुन एक छोटा आवाज आला: "आमच्या ऑस्ट्रेलिअन आउटबॅक मध्ये आम्ही इतक्या उड्या मारतो की ती सर्व उष्णता आमच्यात साठुन रहाते".

हे ऐकुन आधिच्या सर्व फोकांनीच उबलेली कांगा केवळ म्हणाली: "ऋ तु?"

गुलमोहर: 

"ऋ तु?" >> कोटी आवडली Happy

मी तेच लिहीणार होतो. कोटी आवडली Happy

सर्व फोकांनीच उबलेली >>> Happy
तुला फाको म्हणायचे आहे का ?

    ***
    Real stupidity beats artificial intelligence.

    "ऋ तु?" >> कोटी आवडली .
    मलापण. Happy

    स्लार्टी, आशिषने तो शब्द वापरून आपलं नागपुरीपण सिध्द केलंय. 'फोका' = बढवून चढवून सांगीतलेल्या गोष्टी. Happy पुलंचं "काय फजुल फोका मारून र्‍हायलास बे" आठव. Proud

    हे सर्व माझ्यापासुन ३६००० फुटावरुन गेले Happy . ह्या लेखाची पार्श्वभुमी कोणी सांगेल काय?
    --------------------------
    फिर छिडी बात.. बात फूलोंकी...

    कोटी सहीच होती.

    हे सर्व माझ्यापासुन ३६००० फुटावरुन गेले >>>> Oh, brother., Think, think, think.

    स्कोडगासौरस ही पण कोटिच आहे का पूह बरोबरचे एक कार्टून आहे?
    शंकीला अनुमोदन.

    ओह ! धन्यवाद मृ Happy

      ***
      Real stupidity beats artificial intelligence.