सूर नवा ध्यास नवा- ३ या रे या सारे या!

Submitted by सूलू_८२ on 14 September, 2019 - 08:37

Sur-Nava-Dhyas-Nava-Season-3-2019-Starting-on-Colors-Marathi.jpgमित्रान्नो,

सूर नवा ध्यास नवाचा तिसरा सिझन सुरु झालाय. सध्या ऑडिशन्स सुरु आहेत.

ह्यावेळेस स्पर्धक ५- ५५ वयोगटातली असतील.

सूत्रसन्चालक - पुष्कर जोग आणि स्पृहा जोशी. जज्स- अवधूत गुप्ते, महेश काळे

सोमवार- बुधवार ९.३० वाजता

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ईंडीयन आयडॉल सुरू होत आहे.... ऑडीशन्स तर तूफान आहेत... Indi Idol is in completely different league than others हे पुन्हा पुन्हा जाणवते. >>> याला +१११ काय एकेक स्पर्धक होते आयडॉल च्या ऑडिशन्स ला! एक से एक आवाज, वेगवेगळ्या स्टाइल्स, मजा येणार आता!
सू . न ध्या.न. गेल्याच सीझन ला फार बोर झाल्यामुळे सोडलेय बघायचे.

मला त्या रोहित राउत पेक्षा इतर बरेच लोक जास्त चांगले वाटले ऑडिशन मधे. त्याने दिल से रे म्हटले तशा प्रकारचे इम्प्रॉव खूप लोकांचे ऐकले आहे . त्यामुळे फार इनोवेटिव नाही वाटले.
त्या अझमत या जुन्या लिटल चँप ची स्टोरी ट्रॅजिक होती. लहान वयात मिळालेले यश, ग्लॅमर आणि अटेन्शन, वाढलेल्या अपेक्षा, मग तेवढ्याच वेगाने ती लोकप्रियता ओसरणे हे हँडल करता न आल्याने तो ड्रग्ज च्या आहारी गेला. आत्मविश्वास हरवून बसला. हे फार प्रातिनिधिक वाटले. रिएलिटी शो ची एक कडू रिएलिटी. विशेषतः छोट्या वयात झालेल्या विजेत्यांच्या बाबतीत अगदी अशीच नाही तरी अशा प्रकारची गत होऊ शकते असे वाटले.

>>लहान वयात मिळालेले यश, ग्लॅमर आणि अटेन्शन, वाढलेल्या अपेक्षा, मग तेवढ्याच वेगाने ती लोकप्रियता ओसरणे हे हँडल करता न आल्याने तो ड्रग्ज च्या आहारी गेला.
हे तितकसं खरं नाही... त्याचा आवाज 'फुटला' (बाल वयातील बदलून पौगंडावस्थेत जाताना) आणि मग तीच गाणी त्याच्या आवाजात लोकांना बेसूर वा अप्रिय वाटू लागली.. त्यामुळे अचानक रातोरात त्याचा हुकुमाचा एक्का गळून फक्त निव्वळ काही पाने हाती राहिली. यात त्याचा दोष नाही. पण दुर्दैवाने त्यावर ऊपाय शोधण्यापेक्षा अझमत चुकीच्या संगतीला बळी पडला. हे खरे आहे की प्रसिध्धि च्या चकाचक दुनियेत तुम्ही जेव्हा अक्षरशः सर्वस्व गमावलेले असता तेव्हा तुमच्या पाठी खंबीर्पणे ऊभे राहून तुम्हाला योग्य मार्गादर्शन करणारे खूप कमी असतात.
सर्वात वाईट वाटले ते तर जेव्हा त्याने पुन्हा ऑडीशन दिली तेव्हा त्यालाच ऊमगले की त्याचा आवाज, त्याचा गळा, आणि दुष्ट संगतीने केलेले त्याच्या संगीताचे नुकसान याचा एकत्रीत परिणाम म्हणजे तो स्वतःच स्वताच्या अपेक्षांना न्याय देऊ शकत नव्हता. एका कलाकारासाठी हा सर्वात वाईट टप्पा असतो. यातून सवरून व स्वताच्या मर्यादा ओळखून पुन्हा वेगळ्या वाटेने आपला प्रवास चालू ठेवणारे फारच कमी असतात. अझमत हा पहिलाच स्पर्धक असावा ज्याने स्वतःच सांगितले ' मुझसे नही होगा'... खरेच खूप वाईट वाटले. गातानाचा त्याच्या गळ्यावरील ताण, बिघडलेला आवाज, सर्व पाहून दया आली.
(प्रसिध्ध गायक आनंद भाटे असेच 'आनंद गंधर्व' म्हणून अक्षरशः लोकांनी डोक्यावर घेतले.. आणि अशाच काहीशा चुका झाल्याने अक्षरशः पुढे वाईट परिस्थिती आली होती... सुदैवाने त्यांच्या पालकांनी त्यांना योग्य गुरू कडे नंतर नेले आणि पुढील वाट्चाल सुकर झाली. हे सत्य आहे णाई जे त्या वाटचालीत सहभागी होते त्यांचेकडून स्वतः ऐकलेले आहे.)
लहान मुले जेव्हा गायनाच्या रियालिटी स्परधा जिंकतात तेव्हा ते यश तात्पुरतेच आहे हे त्यांना कुणितरी ठामपणे समजावून सांगणे गरजेचे असते. कारण मुलांच्या बाबतीत अवाज बदलणे हा निसर्ग नियम आहे.
असो...

रोहित राऊत निश्चीतच चांगला स्पर्धक ठरेल... गायन, कला, मेहेनत याच्या जोडीला त्याच्याकडे आता प्रचंड अनुभव आहे.. he can only get better.. फक्त त्यॅच त्या रॉक स्टाईल मध्ये न अडकता त्याने थोडे स्वता:ची गायकी सर्वंकशपणे पेश केली तर वरच्या ५ मधे नक्की असेल यात शंका नाही.
एक गोष्ट पुन्हा सिध्ध झाली... मराठी मध्ये कितीही तीर मारा, बॉलिवूड मध्ये यश मिळाले तरच तुम्ही खर्‍या अर्थाने यशस्वी होवू शकता... its mass acceptance!

मला ती "जाने तू, जाने तू या जाने ना" हे गाणं गायलेली मुलगी प्रचंड आवडली. काय अफाट गायली ती हे गाणं
योग ++१११, फक्त रोहित राउत नाही आवडत आता तेवढा, त्याने सिरीयसली गाणं पुढे नेलं तर बघू. अत्ता तो सुद्धा अर्ध्या हळकुंडाने पिवळा झाल्यासारखा वागतो

सैय्या... गाणं खूप सुरेख म्हटलं, माझं आवडतं गाणं. तो राजू नदाफ आणि तेजस्वी सिंग आवडतात मला. अक्षय्या चं गाणं ठीक पण ते expressions महा भयानक, अजून तिने खूप रियाज करावा खूप शिकावं, expressions खूप नंतरची गोष्ट आहे, का माहीत नाही पण असं वयाशी विसंगत वर्तन नाही आवडत मला लहान मुलांच... असो

अरे बापरे! अझमत बद्दल माहिती नव्हतं. अत्यंत आवडीचा बालगायक होता तो. दु:ख झाले Sad
त्याला त्याचा गळा पुन्हा सापडो.

अझमतविषयी वाचले. वाईट वाटले. त्याला आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण फारस घेता आल नाही. शाळेत गेला नाही, प्रायव्हेट टयूशन्स घेत होता. २०१३ नन्तर त्याने शिक्षण सोडल. गॉड ब्लेस हिम फोर बेटर फ्यूचर.

रोहित राऊत निश्चीतच चांगला स्पर्धक ठरेल... गायन, कला, मेहेनत याच्या जोडीला त्याच्याकडे आता प्रचंड अनुभव आहे.. he can only get better.. फक्त त्यॅच त्या रॉक स्टाईल मध्ये न अडकता त्याने थोडे स्वता:ची गायकी सर्वंकशपणे पेश केली तर वरच्या ५ मधे नक्की असेल यात शंका नाही. >>>>>>>>> +++++++१११११११११ माझा आवडता गायक आहे तो.

त्या परान्जपेकाकू एलिमिनेट झाल्या ते एक बर झाल.

>>२ आठवडे महेश काळे नाहिये तर सगळं अगदी गोड गोड वाटतंय. मधुमेह होईल इतपत.
बाकी काही नाही तर शूटींग पण लवकर आटोपत असेल... ! Proud
ईतके पाहुणे ये जा करत आहेत वाटलं ते कलर्स अ‍ॅवॉर्ड्स पण सून च्या मंच्यावरच ऊरकून घेतात की काय?

Indian Idol चे स्पर्धक सही आहेत. पण जजेस् खूप जास्त irritating आहेत. सारखं "वाह", "क्या बात है", किंचाळणं , नाचणं. जज् करायचं सोडुन हेच चालू असतं. सूर नवा ध्यास नवा मध्ये अवधूतपण हातवारे "क्या बात है" वगैरे करत असतो, पण त्याचा आवाज म्युट केलेला असतो. त्यामुळे performance मध्ये distraction होत नाही. इथे किती लाऊड चालू असतं हे सगळं, खूप distracting Uhoh अतिशय उथळ आहेत Idol चे जजेस्. अन्नु मलिक सर्वात जास्त! कदाचित एवढ्यात हिंदी reality show पाहिला नाही त्यामुळे हा नविन norm मला माहित नसेल.

आनंद शिंदे यांना किती वेळा बोलावतात!! कंटाळा आला आता. माग्च्या खेपेस पण २ वेळा आले होते. ते असतील थोर गायक, पण आण्खिन पण आहेत ना लोक आप्ल्याकडे.

अन्नु मलिक सर्वात जास्त! >>> ह्याला परत घेतला कसा. ह्याच्यावर बऱ्याच जणींनी आरोप केलेत ना.

कलर्स मराठी awards मध्ये, सु न ध्या न च्या काही जणींनी गाणी गायली. सुमित राघवन सु न ध्या न म्हणाला तेव्हा माझ्या मनात आले, मायबोली वाचून लिहितात, इथे दिलेलं नाव आहे ना हे. अजून काहीतरी आपण माबो वर लिहितो तेच म्हटलं गेलं, आता आठवत नाही.

>>अन्नु मलिक सर्वात जास्त! >>> ह्याला परत घेतला कसा. ह्याच्यावर बऱ्याच जणींनी आरोप केलेत ना
आरोप सिध्द होत नाहीत तोवर त्याला कार्यक्रमात असायला हरकत नाही?

मला तरी अन्नु, विशाल, नेहा हे परिक्षक म्हणून आवडतात. अन्नु कितीही बाष्कळपणा करत असला तरी गाण्याला धरून बर्‍यापैकी अभिप्राय देतो. विशाल तर ऊत्तमच आहे. नेहा फुल्ल टिआरपी ड्रामा करते पण तीघांचे समीकरण व कॉंबो चांगले जमते. सून पेक्षा नक्कीच ऊजवे आहे. सून मध्ये महेश कधी कधी काय बोलतो हे त्याला तरी कळतं का असा प्रश्ण पडतो. Wink अक्षरशः १२ गावं आन जग फिरुन येतो.
रच्याकने: गेल्या सिझन मध्ये देखिल स्वप्निल आला तेव्हा महेश गायब होता.. आणि त्याही वेळा अवधूत व स्वप्निल ने महेश विरुध्ध भरपूर फटकेबाजी करून घेतली होती.. हा योगायोग नक्कीच नाही.
बाकी सून अधून मधून लावल्यावर असे वाटते की तीच गाणि रिपीट करत आहेत फक्त समोर शिंदे वेगळे असतात. आणि त्या स्पृहा च्या अँकरींग बद्दल काय लिहावे? नुसती गंमत जंमत.. सगळी... Wink

मला पण अन्नू , विशाल आवडतात जज म्हणून. नेहा फेवरीट नाही पण ठीके चलता है म्हणून चालून जाते त्यांच्यासोबत. प्रिमिअर चांगला झाला. या वेळी मुली फार खास नाहीयेत. त्यातल्या त्यात मला निधी आवडली. मुलांमधे सनी, रोहित, आदित्य पुढे जातील असे वाटते. ऑर्केस्ट्राला विशेष दाद द्यायला हवी!
अँकर म्हणून मनिष पॉल ला मात्र फार मिस करतेय या सीझन ला!! तो फार एंटरटेनिंग होता! मधेच काही काही वन लायनर्स एकदम ब्रिलियन्ट असायचे!! त्याचा स्वतःचा शो आहे वाटते आता कुठल्या तरी चॅनल वर. त्याच्या स्टँडर्ड ने आता आदित्य सामान्य वाटतोय.

कधी आणि कश्यावर लागतं इंडीयन आयडॉल?

सुनध्यान बघायचा प्रयत्न केला मधे.. अवधुत आणि महेश तेच तेच तेच तेच तेच बोलत रहातात प्रत्येक पर्वात.. कंटाळा आला आता..

मला कधी पासून एक प्रश्न आहे, जी सुवर्ण कट्यार मिळते ती प्रत्येक राज गायक किंवा राजगाईकेला कायमची मिळते कि रोटेट होते? कायमची मिळत असेल तर प्रत्येक आठवड्यात एक सोन्याची कट्यार देणं कसं परवडतं?

इंडियन आयडॉल चे सगळेच स्पर्धक छान आहेत सु. न. पेक्षा.
सगळ्या जजेस मध्ये ती नेहा फार डोक्यात जाते.
साधारण गाण्यालाही खूप exicited होऊन दाद द्यायची, किंचाळणे ह्या सगळ्यमुळे.
सु. न. मध्ये अवधूत आणि महेश सतत एकच टाईप चे कंमेंट्स देतात. गेस्ट जजेस पण तेच तेच बोलावतात.
म्हाग्रूना ह्यावेळेसही बोलावलेलं. दुसरं कुणी मिळत नाही का ह्यांना..
मी नेहमी सु. न नाही बघत.
रिपीट बघते 12 वाजता ते पण वन्स ऑर ट्वाईस इन a वीक.
इंडियन आयडॉल सहसा चुकवत नाही.

म्हाग्रूना ह्यावेळेसही बोलावलेलं. दुसरं कुणी मिळत नाही का ह्यांना..>> बघ न.. काय त्यांचे कौतुक. मग मी मी मी ..

त्यात त्या दोन स्पर्धकांना हिंदीच गाणी देऊन वाहवा चालवली आहे. त्यापेक्षा तो युपीचा माणुस बरा.

म्हाग्रुनी महेश काळेंना 100 rs ची नोटही दिली.

महेश काळे हे कॅनडा, यू. स, ऑस्ट्रेलिया, भारतात पण बऱ्याच ठिकाणी ते कॉन्सर्ट्स करतात.
ते एक मोठे गायक आहेत.
एखाद्या नवोदित गायकाला प्रोत्साहन म्हणून देणे वेगळं.
महेश काळेंना द्यायची गरज नव्हती.
एनीवे म्हाग्रू नाहीच आवडत.

त्यात त्या दोन स्पर्धकांना हिंदीच गाणी देऊन वाहवा चालवली आहे. त्यापेक्षा तो युपीचा माणुस बरा. >> तो काल आऊट झाला. हिंदी गाणी तर इतकी गातात की नक्की मराठी कार्यक्रम बघतोय की हिंदी तेच कळत नाही.

त्यातल्या त्यात गेल्या आठवड्यात राहुल देशपांडे आले होते तेव्हा छान वाटल.

आयडॉल पण गेल्या वेळचा सीझन फार मस्त होता, त्या मानाने हा सीझन कमीच आहे. काहीतरी स्वतःचा युनिक फ्लेवर असलेले आवाज किंवा गाण्याची स्टाइल असली तर बघण्यात मजा येते. मला तरी सो कॉल्ड व्हर्सटाइल कोणतीही गाणी जशी च्या तशी गाणारे, गरिबांचे सोनू निगम, अरिजित कॅटेगरी लोक अजिबात अपील होत नाहीत. नेमके तसेच लोक जास्त आहेत यावेळी. एक क्लासिकल गाणारा तो आदित्य होता तो लगेच एलिमिनेट झाला.

Pages