सेक्रेड गेम्स २ - परीक्षण - Bigger But Not better! (स्पॉयलर नाही)

Submitted by अज्ञातवासी on 16 August, 2019 - 15:05

कुठल्याही थ्रिलरचं सगळ्यात महत्वाचं इलेमेंट काय असतं?
रहस्य?
की ते थ्रिलर बघताना पदोपदी बसणारे धक्के, आणि त्यातून मिळणारं थ्रिल?
सेक्रेड गेम्स २ बघताना हाच प्रश्न कायम सतावत राहतो...
सेक्रेड गेम्सच्या पहिला सिजन म्हणजे एक परिपूर्ण थ्रिलर होता. जिथे क्षणाक्षणाला धक्के होते, रोमांचक कथा होती, आपण जी पुराणे वाचलीत, त्यांचा मानवी जीवनाशी संबंध होता, आणि शेवट एक धक्का होता, असा धक्का, ज्याने प्रत्येकाला पुढे काय होणार, याची उत्सुकता लावून ठेवली होती, म्हणून सेक्रेड गेम्स २ च्या शिरावर वाढलेल्या अपेक्षांच प्रचंड ओझं होतं...
आणि त्या ओझ्याखाली सिजन २ दबला गेला...
थोडक्यात कथा :
कथाभाग १ (गायतोंडे स्टोरी - अनुराग कश्यप) - जिथून सिजन १ संपतो, तिथूनच कथा चालू होते. गायतोंडे आता केनियाला पोहोचलाय, तिथेही तो बदल्याच्या आगीत जळत असतो, आणि तिथे त्याला असे लोक भेटतात, आणि त्याचं जीवन पुन्हा त्याला मुंबईत आणून सोडतं.

कथाभाग २ (सरताज स्टोरी - नीरज घायवान) - सरताज न्यूक्लियर अटॅक कसं थांबवावं या प्रयत्नात असतो. या प्रवासातच त्याला स्वतःच्या पर्सनल इशूजशीही सामना करावा लागतो.

कथाभाग १ -

हा मागच्या सिजनसारखाच उत्कंठावर्धक झालाय. गायतोंडेचा कैलासपाड्यातुन झालेला प्रवास केनिया, क्रोएशिया ते पुन्हा मुंबई व्यवस्थित जमलाय. बऱ्याच प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र ते करताना अनावश्यक घाई केली गेली. बरेच स्टोरी आर्क घाईघाईत संपवलेले वाटतात, आणि काहीकाही तर खूपच बालिशरित्या संपवलेले वाटतात.
बरेच प्रसंग अनावश्यक ताणले आहेत, आणि काही प्रसंग तर विनाकारण, कथेची काहीही गरज नसताना घुसडलेले आहेत. (उदा. मट्टू आणि पुरुषोत्तमच्या बायकोची लव्ह स्टोरी, जोजोच्या बहिणीची कथा, रामजी वर्माचा चित्रपट, कुसुम देवी यादववर झालेला गोळीबार इ. अगदी अनावश्यक हे प्रसंग फक्त लांबी वाढवण्याचे काम करतात.)
दिगदर्शन आणि चित्रीकरण मात्र सुंदर झालंय. कुठेही कथा रेंगाळत नाही. अनेक थ्रिलिंग प्रसंग याच कथाभागात आहे, किंबहुना ते या सिजनमधील सर्वोत्तम प्रसंग आहेत. बंटी, कांताबाई या जुन्या पात्रांना अजून स्क्रीन टाईम मिळाला असता, तर अजून मजा आली असती.
लेखन मात्र प्रचंड गंडलय. जवळजवळ ऐशी टक्के सीन्स शिव्याच्या बळावर लिहिले आहेत, जे काहीही प्रभाव पाडत नाहीत. मात्र वीस टक्के सिन (गुरुजी आणि गायतोंडे मधील, आणि गुरुजींचे सर्व सिन) अक्षरशः अंगावर काटा आणतात. खास अनुराग कश्यप टच बऱ्याच ठिकाणी जाणवतो.

कथाभाग २ - नीरज घायवान या दिगदर्शकाने या सिजनची माती केली. प्रचंड वाईट, अक्षरशः संतापजनक वाईट.
कोणतंही छोट्यातल छोट पात्र असू दे, त्याला बॅकस्टोरी द्यायचा पण केलाय दिगदर्शकने आणि तेही पूर्णपणे अनावश्यक. न्यूक्लियर अटॅक जर होणार असेल, तर एक अस्वस्थता, एक सेन्स ऑफ अर्जन्सी असतो... किंबहुना तो दाखवावा लागतो, पण नाही... आर्ट फिल्मसारखं सगळं संथ आणि उदास, मग मध्येमध्ये आठवण आल्यासारखं प्रचंड घाई, मग उदास. इथे काही प्रसंग नाही, तर पात्रेच अनावश्यक आहेत. त्यांना बॅकस्टोरीही दाखवलीये, आणि अर्धवट...लिटरली अर्धवट सोडून दिलीये. एक ना धड भाराभार चिंध्या. चित्रीकरणही धड नाहीये. अतिशय महत्वाचा प्रसंगांचा इफेक्टही जाणवत नाही. आणि दिगदर्शनाला एक दिशाही नाहीये. चला, आता वाटलं, न्यूक्लियर अटॅक दाखवू, आता वाटलं, सरताजची पर्सनल लाईफ दाखवू. अरे, शेवटचा भाग आला वाटतं, चला संपवून टाकू. गोल गोल गोल फिरत शेवटी अतिशय फालतू, प्रभावहीन क्लायमॅक्स केलाय. याजागी श्रीराम राघवन नाहीतर विशाल भारद्वाज हवा होता, सोनं केलं असतं त्यांनी या सिजनच. माकडाच्या हाती कोलीत पडलं, आणि त्याने सिजनलाच आग लावली.
कलाकार खूप आहेत (विनाकारण जास्त भरलेत, त्यांच्यावर एक नजर टाकूयात.) खूप नावे असल्याने विकिपीडियावरून घेतोय.

Saif Ali Khan as Inspector Sartaj Singh - जबरदस्त अभिनय, आणि शोभतो खराखुरा सरदारजी. अजून खुलून आला असता, पण डायरेक्टरने वाया घालवला. एक निराश, हताश मात्र परिस्थितीशी झुंजणारा सरताज सैफने मस्त साकारलाय.

Nawazuddin Siddiqui as Ganesh Gaitonde - जबरदस्त, प्रत्येक इमोशन नवाजने व्यवस्थित साकारलेत. बदल्याच्या आगीत होरपळत जाणारा , हळूहळू बदलत जाणारा आणि शेवटी एक वेगळाच माणूस उरणारा गणेश गायतोंडे अक्षरशः जगलाय तो.

Pankaj Tripathi as Khanna Guruji -
देवा, हा माणूस आहे की अभिनयगुणांची खाण? जे प्रवचन ऐकताना माणूस पाच मिनिटात उठून जाईल, ते मी रिपीट मोडवर ठेवलं होतं. अतिशय संयत, मात्र कातील अभिनय. असा व्हिलन पुढे कित्येक वर्षात होणार नाही, आणि असा अभिनय पंकज त्रिपाठी सोडून कुणाला जमणारही नाही. हा सिजन बघावाच याच सगळ्यात मोठं कारण... बेस्ट!!!!

Radka Apte as Anjali Mathur - ही बाई सिजन वन मध्ये गेली, आणि बरं झालं गेली.

Amruta Subhash as Raw Agent Kusum Devi Yadav - डोकेदुखी, निव्वळ डोकेदुखी. मी खूप डेंजर आहे, मला घाबरा असा अविर्भाव. मुळात हिच्या चेहऱ्यावरची माशी कंटाळून उडून जाईल तरीही हिचा चेहरा हलत नाही. एका महत्वाच्या पात्राच्या चिंधड्या...

Kalki Koechlin as Batya Abelman - दुसरी डोकेदुखी. एकसुरी विचित्र आवाज आणि उच्चार, आणि भयानक चेहरा. बघवत नाही.

Ranvir Shorey as Shahid Khan - वाया घालवलाय, डिरेक्टरच अपयश पूर्णपणे.

Neeraj Kabi as DCP Parulkar - एक चांगला अभिनेता फारसं काम नसल्याने फक्त सलामीपुरता ठेवलाय. बघवत नाही. डिरेक्टरच अपयश क्रमांक २

Jatin Sarna as Deepak "Bunty" Shinde - मस्त अभिनय करतो, आणि थोडाफार कॉमिक रिलीफही मिळतो. आवडला.

Lue Kenny as Malcolm Mourad - मस्त अभिनय, फारसं काम नाही.

Elnaaz Norouzi as Zoya Mirza/Jamila - चांगला अभिनय, आणि दिसतेही सुंदर.

Aamir Bashir as Inspector Majid Ali Khan - चांगला अभिनय, एक स्टोरी आर्क दिला होता या अभिनेत्याला, तो पूर्ण नाही झाला. डिरेक्टरच अपयश क्रमांक ३

Shalini Vatsa as Kanta Bai - मस्त अभिनय. कांता बाईला बघून खरंच बरं वाटलं. आफ्टर ऑल बाई>भाई.

Surveen Chawla as Jojo Mascarenas - अतिशय लाऊड आणि प्रभावहीन.

Girish Kulkarni as Bipin Bhosale - लाऊड आणि प्रभावहीन. जोकर बनवलाय याचा. डिरेक्टरच अपयश क्रमांक ४

Anupriya Goenka as Megha Singh - विचित्र दिसते आणि अभिनयाच्या नावाने शंख. एक स्टोरी आर्क दिलाय, अर्धवट ठेवलाय. डिरेक्टरच अपयश क्रमांक ५.

Vikram Kochar as Mathu - चांगला अभिनय केलाय.

Samir Kochhar as ACIO Markand - चांगला अभिनय केलाय.

Chittaranjan Tripathi as Trivedi - हा माणूसही वेगळाच उठून दिसतो. अतिशय नैसर्गिक अभिनय. आवडला.

Jaipreet Singh as Constable Dilbagh Singh - हा कलाकार मला प्रचंड आवडला. एक सच्चा शीख, इमानदार पोलीसाच्या भूमिकेत हा माणूस शोभून दिसतो. पहिल्यांदा बघितला, पण खूप आवडला.

Saurabh Sachdeva as Suleiman Isa - विचित्र दिसतो, आणि घोगऱ्या आवाजात के बोलतो कळत नाही.

Sandesh Kulkarni as Gaitonde's Father - या कलाकाराची मराठी मला प्रचंड आवडली. चांगला अभिनय.

Neha Shitole as Constable Katekar's wife - चांगला अभिनय, पण घोगरा आवाज इरिटेट करतो. एक नवीन स्टोरी आर्क दिलाय, नेहमीप्रमाणे अर्धवट ठेवलाय. डिरेक्टरच अपयश क्रमांक ६.

स्मिता तांबे as रमा - बिलकुल आवडली नाही, एकसुरी अभिनय आणि अनावश्यक पात्र, ज्याची गरज नव्हती. स्टोरी आर्क दिलाय, नेहमीप्रमाणे अर्धवट ठेवलाय. डिरेक्टरच अपयश क्रमांक ७.

अजूनही बरेच कलाकार आहेत.

नीरज घायवान आणि विक्रमादित्य मोटवाणी यांची तुलना करता विक्रम कित्येक पटीने उजवा ठरतो. इथे सतरा साईड कॅरेक्टर आणून नीरजने त्याची माती केलीये, तर पहिल्या सिजनमध्ये काटेकरसारखं एकच कॅरेक्टरही अक्षरशः विक्रमने जिवंत केलंय.

मात्र या दोन्ही सिजनचा यूएसपी म्हणजे पार्श्वसंगीत. प्रत्येक महत्वाच्या सिनमागे वाजणार पार्श्वसंगीत अंगावर काटा आणतं. सिजन१ आणि सिजन२ च्या प्रत्येक एपिसोडच्या एन्ड क्रेडिटसला वाजणारे म्युजिक नक्की ऐका, इट्स बेस्ट!

शेवटी सांगायला गेलं तर सेक्रेड गेम्स २ हे मोठं अपयश आहे, मात्र गुरुजी नावाचं पात्र हे अपयश लक्ख धुवून काढतं. गुरुजींसाठी एकदा नक्की बघा. बलिदान देना होगा! Wink

रेटिंग -
अनुराग कश्यप भाग - *** + गुरुजी व दिलबाग सिंगसाठी *
नीरज घायवान भाग- *१/२

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सेक्रड गेम्स हि मूळ कादंबरी कोणि वाचली असेल तर या सिरिजने तिच्यापासुन कितपत फारकत घेतली आहे, किंवा नाहि हे जाणुन घ्यायची उत्सुकता आहे. सैफने चांगलं काम केलं आहे. नवाजुद्दिन साठी गायतोंडे कॅरेक्टर म्हणजे त्याचा स्वीटस्पॉट, मस्त फिट बसला आहे. जोजो पण आवडली, पहिल्या सिझनमध्ये बहुतेक तिला जास्त स्कोप नव्हता. या सिझन मध्ये भरपुर आहे. ओवरऑल अगदिच टाकाउ/पकाउ नाहि, पण त्याचबरोबर एव्हढि हाइप करण्याच्या लायकिचीहि नाहि...

सगळं वाचलं नाही, पण मसान फार फार आवडला होता. त्याचा सारखा असेल तर आवडेल म्हणजे. बघू वीकेंडला कसा वेळ मिळतोय तशी.

लेखन तर प्रचंड गंडलय. जवळजवळ ऐशी टक्के सीन्स शिव्याच्या बळावर लिहिले आहेत, जे काहीही प्रभाव पाडत नाहीत. +१००

बरीच पात्रं स्टोर्‍या अनावश्यक आहेत?
वर्षानंतर तर सीझन २ पण अनावश्यकच खरंतर. Lol
अभिनय येत नाही, चेहर्‍यावरची माशी हलत नाही हे ठीक पण विचित्र दिसतो/दिसते म्हणजे काय? ती माणसं जशी दिसतात तशीच दिसतात. Happy
गायतोंडे कुठला हॅन्डसम हंक आहे? पण मला तर तोच जास्ती आवडतो Happy
तुम्हाला मसान आवडला नाही म्हणून सेगे पण आवडलं नसेल.
पण तुम्ही मसान सारखा आहे लिहिल्याने न बघणारे पण बघतील. आणि कदाचित आवडेल पण.

अरे मसान ला तर कल्ट फॉलोइन्ग आहे. तरून रक्ताच्या प्रेक्षकांना हे सर्व जरा स्लो वाटले असेल. पण गणेश गायतोंडे एक मुलगा ते मरून जाई परेन्त पन्नाशीतला एक माणूस हा प्रवास एकदम बरोबर दाखवला आहे. सद्सद्विवेक बुद्धी जागृत होउन तो संहारापासून वाचवाय चा प्रयत्न तरी करतो ह्यात तो एका अर्थी रिडीम झाला आहे. गुरुजी पात्र एकदम भन्नाट. असे सॉफिस्टिके टेड बोलून ........ ...... खूप असतात. मला गंमत वाटली कि त्या आश्रमात लाँड्री किती मोठी असेल दर वेळी कोणी आले की स्वच्छ कप डे आपले हातात. असे रोज घरी कोणी केले तर किती मस्त. बंकर मध्ये पण अगदी सर्व स्वच्छ. किती तयारीने बसले आहेत सर्व. कल्की पण सर्वत्र एकच रोल करते. अनुराग मुळे तिला हा ब्रेक मिळाला असेल.

Btw मुळ novel peksha different ahe he.. Mi vichaycha paraytn kela pan utsah sampla season 2 mule. Proud

अज्ञा शब्द नी शब्द पटला.
सेक्रेड गेम्सच पार्श्वसंगीत मात्र मनात घर करून बसलंय, काही मेलडीज तर अप्रतिम आहेत.
पंकज त्रिपाठीच्या कारकीर्दीतला सर्वोत्तम रोल असावा. मात्र गायतोंडे आणि गुरुजींचे गेईश रिलेशन अनावश्यक वाटलं.
पुस्तक वाचलं असशील तर नक्की रिवयु टाक!

पंकज त्रिपाठीने मिर्झापूर मधे कालिन भैया पण फार भारी केलाय! ती सीरीज वासेपूर वगैरे च्या तोडीची नाही पण कालिन भैया जबरा आहे !!

मालिका पहात नाही पण हो, हा त्रिपाठी खरंच अत्यंत गुणी कलाकार आहे. त्याने लुकाछुपी मधे विनोदी भुमिका फार मस्त केलीये, अगदी थोडे प्रसंग वाट्याला आले असताना देखील.

हा त्रिपाठी खरंच अत्यंत गुणी कलाकार आहे. त्याने लुकाछुपी मधे विनोदी भुमिका फार मस्त केलीये, अगदी थोडे प्रसंग वाट्याला आले असताना देखील. >> पंकज त्रिपाठी, संजय मिश्रा असे कलाकार ही बॉलीवूड मधील हिरे आहेत खरंच..

हे प्रसंग फक्त लांबी वाढवण्याचे काम करतात.)
दिगदर्शन आणि चित्रीकरण मात्र सुंदर झालंय. कुठेही कथा रेंगाळत नाही. >> ही दोन वाक्ये सलग वाचायची वेळ कधी येईल असं वाटलं न्हवतं. Rofl
तुमच्या नंतरच्या लेखातलं एकही मत पटलं नाही. प्रत्येक पात्रात निगेटिव्ह प्रतिक्रिया दिलीच पाहिजे अशा अविर्भावात लिहिलेलं वाटलं. असो.

मात्र या दोन्ही सिजनचा यूएसपी म्हणजे पार्श्वसंगीत. प्रत्येक महत्वाच्या सिनमागे वाजणार पार्श्वसंगीत अंगावर काटा आणतं. सिजन१ आणि सिजन२ च्या प्रत्येक एपिसोडच्या एन्ड क्रेडिटसला वाजणारे म्युजिक नक्की ऐका, इट्स बेस्ट!>>>>>>>
नार्कोस च म्युजिक वाटतय.............