लिलावी टी. व्ही . वाहिन्या

Submitted by उडन खटोला on 30 July, 2019 - 01:08

लिलावी टी. व्ही . वाहिन्या आणि त्यांच्या मेड इन स्टुडियो बातम्या.

शिवाजी महाराजांच्या काळांत टी.व्ही. न्यूज चॅनेल नव्हते, भडक मसालेदार बातम्या देणारी वृत्तपत्रे नव्हती, ही या देशावर आई भवानी आणि आई जगदंबेची केवढी मोठी कृपा आहे.

समजा शाहिस्तेखानाच्या छावणीवर हल्ला करण्याचा महाराजांचा मनसुबा असेल, तर आपल्या विकाऊ वृत्त वाहिन्यांनी त्याची तोडफोड बातमी (ब्रेकिंग न्यूज) अशी केली असती. "आता आपल्याबरोबर आपले रिपोर्टऱ अप्रसन्न दोषी आहेत. दोषी , काय सांगशील या छाप्याबद्दल ?"
" माधुरी, मी आता शनिवारवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभा आहे. मध्यरात्रीनंतर मराठ्यांचे सैन्य, गाढ झोपेत असलेल्या खानाच्या सैन्यावर तुटून पडले . तुंबळ चकमक झाली . शाहिस्तेखान पळून जात असतांना महाराजांनी त्याच्यावर वार केला, त्यांत त्याच्या हाताची बोटे छाटली गेली. त्याला वैद्यकीय उपचारासाठी ससूनमध्ये दाखल केले आहे आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. मी आता आपल्याला खानाच्या तुटलेल्या बोटांचे अवशेष दाखवीत आहे. शाहिस्तेखान याच्या वैद्यकीय उपचारांचा तसेच शल्य क्रियेचा सर्व खर्च सरकारने करावा अशी मागणी सूर्याजी पिसाळ, गणोजी शिर्के इत्यादी सुपारीफेम विरोधकांनी केली आहे. फुक्टी देसाई यांनी शाहिस्तेखान यांची ससून इस्पितळात भेट घेतली . श्री. ग्रीष्म उजवेखरे यांनी शाहिस्तेखानाला एक लाख मोहरा सहानुभुती भेट म्हणून दिल्या आहेत. माधुरी".
"अप्रसन्न तू दिलेल्या माहितीबद्दल आभार, आम्ही तुझ्याकडून अपडेट्स घेत राहू "

हीच बातमी दुसऱ्या वृत्त वाहिनीवर ' भुरका फक्त' देत आहेत. "अभी अभी हमे खबर मिली है की शिवाजी महाराज ने शाहिस्तेखान के तळपर हमला बोल दिया है ! खान गाढ झोप्या था ! फिरभी उसपर हमला हो गया, ये काळजीकी बात है | हमारी जानकारी के मुताबिक महाराज ने उसकी बोटे काट ली है | इसपर प्रतिक्रिया देते हुये करवंद माजोरीलालने कहा है,की यह असहिष्णुता का भयानक रूप है | शाहिस्तेखान दिल्लीसे पटना और पटना से पुणे आया था | इस देश के नागरिक को कही भी जाके डेरा डालनेका अधिकार है | उसने शायद पुणेमे लूटपाट की है या स्थानिक जनातापर अत्याचार किये है, तो उसकी बोटे क्यों तोडी ? उसपर केस चलाते | बीस साल के बाद जो भी फैसला होता , उसके बाद सजा तय करते | पर ऐसा नही हुवा | हम इसका विरोध करते है | कल से मै धरणा आंदोलन और प्राणांतिक उपोषण करुंगा "|

यानंतर दोन दिवसांनी 'कलतक वाहिनीचा' रिपोर्टर करवंद माजोरीलाल याची मुलाखत घ्यायला रात्री दहा वाजता उपोषणाच्या जागी पोंचला, तेव्हां त्याला करवंद माजोरीलाल बिर्याणी, चिकन स्टफ्ड पराठा , पनीर मसाला , मुर्ग मुसल्लम आणि सफरचंदाचा रस आदि पदार्थावर आडवा हात मारतांना दिसला. त्यांना "उपोषणात हे पदार्थ आपण कसे खाऊ शकता ?" असा प्रश्न आमच्या रिपोर्टरने विचारला असता "धरणा और उपोषण यह मेरी अंतरात्माकी आवाज है | लेकीन मेरा पेट यह शरीर का अलग हिस्सा है | वो इस आंदोलनमे शामिल नही है | तो अगर मै उसको कुछ खाने न दू , तो उसपर अन्याय होगा | और मै किसिपर अन्याय नही कर सकता "| असा खुलासा करवंद यांनी केला व ते समोरचे पदार्थ हादडू लागले

अफझलखानाचा वध जेव्हां महाराजांनी केला त्याचा वृत्तांत वृत्त वाहिनीने असा दिला असता : मी अखिल गोंधळे "थापा न्यूज" वरून एक खळबळजनक बातमी देत आहे. आमच्या सूत्रांकडून समजते की अफझलखानाने शिवाजीमहाराजांना भेटीस बोलावले होते. कोणीही शस्त्र आणू नये असा सामंजस्य करार झाला होता . त्याप्रमाणे प्रतापगडावर शिवाजी महाराज येताच, अफझलखानाने त्यांना प्रेमाने आलिंगन दिले . त्यावेळी नजरचुकीने त्याची कट्यार त्याच्या हातातच होती. त्याचा चुकून महाराजांवर वार झाला . पण अंगात चिलखत असल्याने कोणती वाईट प्रसंग उद्भवला नाही. परंतु साध्या भेटीच्या वेळी अंगात महाराजांनी चिलखत कां घातले असावे , याबद्दल प्रतापगड परिसरांत चर्चा सुरु आहे. महाराजांनी हातात वाघनखे घातली होती व त्याच्या माध्यमातून त्यांनी अफझलखानाचा कोथळा काढला . हे फारच भयंकर कृत्य आहे, असे बऱ्याच विद्वानांचे मत आहे. महाराजांना समजवण्यासाठी खानाचा सरदार सय्यद बंडा तलवार घेऊन पुढे आला असता, गैरसमजातून महाराजांचा सैनिक जिवा महाला याने दांडपट्टयाने त्याचा हातच छाटला. हे सर्व पूर्वनियोजित असावे असा संशय आहे . जिवा महाला याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी विचारवंतानी केली आहे. व या असहिष्णुतेचा निषेध म्हणून त्या विद्वानांनी बक्षिस मिळालेले आपले ताम्रपट परत करण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त त्यावेळी मिळालेल्या सोन्याच्या मोहरा व जमिनी ते परत करणार नाहीत असे आमचा वार्ताहर कळवतो. असे कळते की या विद्वानांनी घटनास्थळी अफझलखानचा जयजयकारही केला .

राज्यातील आघाडीचा गोंधळी सामीर खानावळ यांने पत्रकार परिषद घेऊन सांगितले की अफझलखानावरील या जीवघेण्या हल्ल्यानंतर माझी बायको अतिशय भयभीत झाली आहे. आम्ही हा देश सोडून जाण्याचा विचार करीत आहोत. सर्व विचारवंतांनी सामीर खानावळ आणि त्याच्या परिवाराला सहानुभूती दाखवली आहे.

आग्र्याहून सुटकेचा प्रसंग वृत्त वाहिन्यांनी अशा प्रकारे रंगवला असता : मै ' भुरका फक्त ' बकबक वाहिनीपर' आपका स्वागत करती हुं | हमारे वार्ताहर के मुताबिक शिवाजी महाराज और उनके पुत्र संभाजी राजे आग्रा की जेल से निकल गये है और वो कहां है ? इसकी जानकारी किसी को नही है | कहा जाता है की,जेलसे भागनेके पहले कुछ दिन महाराजने मिठाई के पेटारे भर भरकर गरीबोमे बाँटे थे | लेकीन हमारे जो पत्रकार चौबीस घंटे बाईट के लिये जेल के इर्द गिर्द थे, उन्हे मिठाईका एक बाईट भी नसीब नही हुवा | कम से कम वार्ताहरोंके लिये दाल चावल सब्जी रोटी का इंतजाम करना जरुरी था | कहा जाता है की ये मिठाई के पेटारेमे छुपकर महाराज और संभाजी राजे जेल से निकल गये है | यह सरासर आलमगीरका विश्वासघात है | सवाल यह उठता है की मिठाईके पेटारे खरीदने के लिये जेलमे पैसे किसने दिये ? शक के दायरेमे मिर्झा राजे जयसिंग भी है |

दिलेरखानाचे सैन्य पाठलाग करीत असतांना महाराजांनी कात्रज घाटाजवळ बैलांच्या शिंगाला मशाली बांधून त्यांना पिटाळले व स्वतः सैन्यासकट दुसऱ्या मार्गाने पन्हाळगडावर सुखरूप पोंचले . ही बातमी कव्हर करतांना भुरका फक्त ने सांगितले असते : हमारे रिपोर्टरने कहा है , की महाराजकी विशाळगडसे निकलनेकी योजना शुरू है | हमारी जानकारी है की कात्रज घाट मे बडी तादात मे बैलोको इकठ्ठा किया जा रहा है | हमारे रिपोर्टर ने जब इस की वजह पुछी तो 'नो कॉमेंट्स ' ऐसा जवाब मिला | हमे शक है की दिलेरखान के खिलाफ बडी साजीश रची जा रही है |

आधारित © अनिल रेगे .

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारीये Happy

खरंच असंच झालं असतं तेव्हा !!

सध्या मायबोली अ‍ॅडमिन झोपेत असावेत. सरळ सरळ इतर ठिकाणच्या पोस्टी डकवुन आपला धागा म्हणुन खुश्शाल दडपुन देवु लागलेत लोक्स!

उडनखटोला, लय भारी ! Lol

काल मनात सहज विचार आला की फार पूर्वी जेव्हा हे टिव्ही, मोबाईल नव्हते, तेव्हा लोक किती सुखी होते. नेत्रदोष तर आतासारखे नावाला नव्हते.

बाकी, प्रसंग मस्त रंगवलेत.