कोण बस णार लोखंडी सिंहासनावर?!!!

Submitted by अमा on 10 May, 2019 - 01:35

तर मंडळी, गेम ऑफ थ्रोन्स अर्थात सिंहासनाच्या खेळाचे अवघे दोन भाग प्रक्षे पित व्हायचे राहिले आहेत. आपण एक अंदाज वर्तवायचा आहे.
शेवटी कोण बसेल लोखंडी तलवारींच्या सिंहासनावर... पण ह्यात गेम अशी की हा अंदाज चुकीचाच असला पाहिजे. ही खेळाची अट आहे.
यदा कदाचित तुमचा अंदाज बरोबर निघालाच तर बक्षिसे मिळणार नाहीत. फक्त इथेच कौतू क होईल.

सिंहासन समुद्रात फेकले जाउन साम्राज्यात लोकशाही नांदेल हे उत्तर ग्राह्य धरले जाणार नाही.

व्हालार मॉर्गुलिस.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा गेस घोस्ट. पळत पळत किंग्ज लँडिन्ग ला जाईल. स्कॉर्पिअन चालवून उरीव ड्रॅगन ला मारेल. व टुप कन उडी मारून सिंहासनावर बसेल.
जॉन ला जवळ आला तर चावेल.

अमा, तुमचा प्रतिसाद वाचून मला 'एंटरटेनमेंट' सिनेमामधला अक्षय कुमार आणि इस्टेट मिळालेला ऑफिस चेअरवर बसलेला कुत्रा दिसला.

मजेदार धागा आहे Lol

खरंतर मला ओशाहला सिंहासनावर बसवायचं होतं पण ती जिवंत नाहीय.... त्यामुळे व्हॅरिस राजा आणि हाऊन्ड राजाचा उजवा हात Proud

गंभीरपणे सांगायचे तर ते त्या दुसऱ्या धाग्यावर लिहते Happy

गंभीरपणे सांगायचे तर मला वाटतं>>. नो नो गंभीर पणा नॉट अलाउड. चुकीचेच उत्तर हवे आहे. विनर गेट्स स्टारबक्स कॉफी.

सचिन पिळगावकर >>
त्यासाठी महागुरुंनी लॉर्ड ऑफ लाईटला "तुझं नागड्यानं दर्शन घेईन", असा नवसच केलाय म्हणे