जुनी ब्लॅक अँड व्हाईट मराठी गाणी सुचवा

Submitted by वर्षा.नायर on 6 April, 2009 - 01:10

लोक्स,
मला दुबई येथिल एका कार्यक्रमात जुन्या ब्लॅक अँड व्हाईट मराठी गाण्यावर अभिनय करायचा आहे, कृपया आपण मला अशी जुनी मराठी गाणी सुचवा.

वर्षा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षे,
कोणत्या विषयावरची गाणी हवी आहेत? ते सांग आधी.

शेकड्यानी आहेत. Happy
- कशाला उद्याची बात,
- मन सुद्द तुझं गोष्ट हाये पृथ्वीमोलाची
- सुंदरा मनामध्ये भरली
- बुगडी माझी सांडली ग
- अरे संसार संसार
- ऐरणीच्या देवा तुला/ माळ्याच्या मळ्यामंदी
- कशी करु स्वागता
- देहाची तिजोरी
- नाच रे मोरा

वर्षा, तू नाच रे मोराच कर Proud

हवास तू.... पण मस्त आहे.
************
निजरुप दाखवा हो, हरि दर्शनास द्या हो |

वर्षा, तू नाच रे मोराच कर >>> आशु, Lol मी लहानपणी केला आहे तो अजुनही मला त्याच्या स्टेप्स आठवितात. Proud

दक्स, अग स्टेजवर ज्याचा अभिनय करिता येईल. विषय काही ठरलेला नाही.
आम्हाला मराठी चित्रपटाचा प्रवास दाखवायचा आहे. मी जुन्या गाण्यावर अभिनय करणार आहे. आणि तेच गाणे मला गायचे देखिल आहे. म्हणजे गाणे माझ्या आवाजात आधी रेकॉर्ड करुन त्यावर स्टेजवर अभिनय करायचा.
डुएट देखिल चालेल. पण शक्यतो एकटीचे चालेल.
रैना,
मला तूम्ही सांगितलेल्या पैकी

-कशाला उद्याची बात,
- मन सुद्द तुझं गोष्ट हाये पृथ्वीमोलाची
-ऐरणीच्या देवा तुला/ माळ्याच्या मळ्यामंदी
- कशी करु स्वागता
हि गाणी आवडली. धन्स.
मनकवडा, लिंक बद्दल धन्स. पण त्यातुन जुनी ब्लॅक अँड व्हाईट कुठली आहेत हे शोधणे जड जाईल.

>>>मी लहानपणी केला आहे
कोणाच्या लहानपणी?? मोराच्या कि तुमच्या Lol

>>आम्हाला मराठी चित्रपटाचा प्रवास दाखवायचा आहे.
मग एकच गाणं घेण्याऐवजी विविध गाण्यांची छोटी छोटी कडवी घेतली, अशी की जेणेकरून त्यावरून एक संकल्पना कळेल आणि सगळा प्रवास दाखवला तर? just a thought

>>पण त्यातुन जुनी ब्लॅक अँड व्हाईट कुठली आहेत हे
त्यातली ८०% गाणी तशीच आहेत हो पण शोधत बसावे लागेल Sad
ऐरणीच्या देवा..छान आहे अभिनयाला

अजून काही...
काळ्या मातीत मातीत..
फिटे अंधाराचे जाळे..
फुलले रे क्षण

(*) घनघन माला नभी दाटल्या, कोसळती धारा.
(*) आज कुणीतरी यावे.
(*) प्रथम तुज पाहता.
(*) हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार व्रुक्षापरि, दिसशी तु नवतरूणी काश्मिरी.
(*) जीवनात ही घडी अशीच राहु दे.
(*) नववधु प्रिया मी बावरते
-----------------------------------------------------

ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

पिन्जरा सिनेमातल्या गाण्यावर अभिनय करता येईल खास करून...
* हवास तू, हवास तू, हवास मज तू.....
* लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
* दोन घडीचा डाव, याला जीवन ऐसे नाव

पिंजरा कृष्ण्धवल नाहिये ना पण.

वर्षा- स्मरणयात्रा ची व्ही.सी.डी मिळाल्यास पहा. त्यात मनकवडा म्हणतायेत तसा गाण्यांचा प्रवास आहे. क्लिप्स् ही आहेत ज्यावरून कृष्णधवल आहे की नाही ते कळते.

मनकवडा, नाही अनेक जणं ह्यात भाग घेणार आहेत. मला जुन्या गाण्यावर करायचे आहे. अजुन बरिच मंडळी आहेत जी बाकीच्या गाण्यांवर अभिनय करतील.

भातुकलीच्या खेळामधले..
चिंब पावसाने
दिस जातील दिस येतील [तुझ्या माझ्या संसाराला]
आला आला वारा [माहेरवाशीणीचा अभिनय]
ही वाट दूर जाते
सांज ये गोकुळी

>>नाही अनेक जणं ह्यात भाग घेणार आहेत.
ओह म्हणजे प्रत्येकाला एक एक गाणे देऊन सगळा मराठी चित्रपटाचा प्रवास दाखवायचा आहे.
हं

धन्स सगळ्यांना. बरिचशी आवडली गाणी.
अनघा, 'जिवनात हि घडी'.. आवडले.
दक्स, 'हवास तू हे कुठले गाणे आहे?'

अगं हवास तू... मला वाट्टं आम्ही जातो आमुच्या गावा मधले आहे.
************
निजरुप दाखवा हो, हरि दर्शनास द्या हो |

'हवास तू (२)
हवास मज तू हवास तू
प्रिया लाजते (नाचते?) आनंदाने...

दूर उभा का उदास तू...
************
निजरुप दाखवा हो, हरि दर्शनास द्या हो |

हा खे़ळ सावल्यांचा
हा सागरी किनारा
ऋतु हिरवा
शोधू कशी प्रिया
चॉकलेट चा बंगला Happy

आणि सगळे मिळून शेवटी: मराठी पाऊल पडते पुढे Happy

परफॉर्मन्स / डान्स ओरिएंटेडः

कशाला उद्याची बात
लटपट लटपत तुझ् चालणं
सख्या रे घायाळ मी हरिणी
इथेच टाका तंबु
बुगडी माझी किंवा इतर अनेक लावणी डान्सेस

अभिनय , लाइट डान्स ओरिएंटेडः
तुला पाहते मी तुला पाहते
प्रेमा काय देउ
माझा होशील का
कधी रे येशील तू
लेक लाडकी या घरची
त्या तिथे पलिकडे
खेड्या मधले घर कौलारु
जिथे सागरा धरणी मिळते
येणार नाथ आता
विसरु नको श्रीरामा मला

********** स्टाइल मे रहनेका !! ************

इथे सगळ्यानी गाणी सुचवली आहेतच्...पण एक विचार आला कि, अश्याच प्रकारचे सदरीकरण झी मराठी च्या बर्‍याच पुरस्कार सोहोळ्यात केले होते... जर शक्य असेल तर तु नळी वर (YouTube :))
पहा क्लिप्स मिळतात का ते..

०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा

>>जर शक्य असेल तर तु नळी वर (YouTube
हं छान आयडिया आहे रे

डिजे,
कशाला उद्याची बात
लटपट लटपत तुझ् चालणं
बुगडी माझी किंवा इतर अनेक लावणी डान्सेस
हि आवडली.
केदार मी शोधेते तू-नळी वर.

झी टॉकिज ची जाहीरात ही पाहून घे....

यमुनाजळी खेळू खेळ कन्हैया का, लाजता (ब्रह्मचारी)
कुणी म्हणेल वेडा तुला, कुणी म्हणेल वेडी मला (देव पावला)
घननीळा लडीवाळा, झुलवू नको हिंदोळा (उमज पडेल तर)
नाव सांग सांग सांग गाव सांग (मराठा तितुका मेळवावा)
झाला महार पंढरीनाथ (पुढचे पाऊल)
जासी कुणीकडे, कोणाकडे सखे सांग ना (किचकवध)
झाला साखरपुडा ग बाई थाटाचा (मोहित्यांची मंजुळा)
डौल मोराच्या मानचा (तांबडी माती)
आम्ही ठाकरं, ठाकरं (जैत रे जैत - थोडं cliché पण जबरदस्त ठेका असलेलं)

यांतली काही अगदी सपशेल नृत्यगीतं म्हणता येणार नाहीत पण त्यांत नृत्यासाठी आवश्यक असा ठेका आहे.

वर्षा
विकु ने सुचवलेली साइट चान्गली आहे
तु आधि गीताचा प्रकार ठरव.
भक्ति गीत, लावणी,अन्गाइ गीत, कोळी गीत्,नाट्यसन्गीत,वीररस गीत
त्याच्यावर तुला कुठल्या प्रकारावर अभिनय करायला आवडेल ते ठरव.
आणी मग गाण सिलेक्ट कर
बेस्ट लक