Specification प्रमाणे कुर्ती हव्या आहेत

Submitted by utsukata on 8 September, 2018 - 17:10

स्टेज performance साठी सांगितल्याप्रमाणे ( यात रंग, डिझाईन, साईझ वगैरे येईल ) वुमेन्स कुर्ती करून हव्या आहेत. साधारण ८-१० लागतील.

असे तयार करून देणारे कोणी माहीत आहे का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुर्ती भारताबाहेर पाठवायच्या आहेत.
किंवा कोलकत्याला आणि ओळखीचे इकडे घेऊन येतील.
त्यामुळे भाड्याने नाही घेता येणार.
सध्या काय रेट आहे हेच माहीत नाही त्यामुळे बजेट नाही सांगता येत.
कुर्ती व्हाईट, ३/४, खाली थोडा घेर, तिथे pom-pom lace अशा हव्या आहेत.
नवरात्रीच्या आधी इथे यायला हव्यात.
हे खरंच possible आहे का?

700 ते 900 ला एक च्या दरम्यान लॉंग लेंग्थ व्हाइट कुर्ती विथ पोम पोम मिळायला हरकत नाही.
शॉर्ट व्हाइट पॉम पॉम कुर्ती ऑनलाइन 500-700 पर्यंत मिळतात.होलसेल ला रेट अजून कमी होईल.
https://www.amazon.in/Mystique-India-Embellished-Off-White-MINFPL661_XXL...

Screenshot_2018-09-09-14-09-14-421_com.android.browser.png

_/\_अनुजी
किती हा सळसळता उत्साह ? किंवा किती ही शाॅपिंगची पॅशन. ते पण मोबाईल ची ३% बॅटरी शिल्लक असताना. याला म्हणतात कामाप्रती निष्ठा.
- वरील स्नॅपशाॅट वरून साभार. Wink Rofl Light 1

अनू ग्रे ट अशी कुर्ती असते हेच मला माहीत नव्हते. आता शोधून घेते एखादी. धागाकर्त्या ताई, फेसबुक वर एक सेल युअर क्राफ्ट ग्रूप आहे. तिथे क्वेरी टाकून बघा. सार्वजनिक आहे व चांगला वैविध्यपूर्ण माल असतो. मी ज्वेलरी विकायला सभासदत्व घेतले होते. पण तितके सेट बनवलेच नाहीयेत. तिथे हार्ड कोअर बिझनेस टाइप लोके आहेत. चांगले निगोशिएट करा. सणासुदीच्या शुभेच्छा.

पॉम पॉम कुर्ती जरा रिस्की. वापरलेल्या लेस ची क्वालिटी चांगली नसेल तर पहिल्या धुलाईत कुर्त्यावर रंगपंचमी.
मी पॉम पॉम लेस आणून ठेवली आहे पण कश्याला लावली नाही.एक दोन वेळा धुवून लावेन.तोवर फॅशन जिवंत असेल तर.

पाथफाईंडर Happy Happy अचूक निरीक्षण.

अनु, पॉम-पॉम लेसबद्दल हा विचार नव्हता केला. नीट बघावे लागेल.
अमा, फेसबुकबद्दल माहिती नव्हते हे. बघते लगेच.
खूप थँक्स Happy

उत्कर्षा, (उप्स सॉरी स्पेलिंग वाचायला आळशीपणकेला, उत्सुकता.)फेसबुकवर पुणे लेडिज म्हणून ग्रुप आहे.तुमची कोणी मैत्रिण नक्कीच सदस्य असेल.तिला तिथे पोस्ट टाकायला सांगितल्यास जवळच्या एरियातल्या टेलर्स चे भरपूर रिस्पॉन्स येतील.तुम्ही मेंबर नसाल तर आता बनू नका, त्यांच्याकडे रोज खूप रिक्वेस्ट येतात आणि अप्रूव्ह व्हायला वेळ लागेल.

कसलं कसलं
तुमचं आपलं उगाच कौतुक.
Blush

@अनु
विपु बघाल का?
-कुर्तीवाल्या ताईंची क्षमा मागून इथे पोस्टतो आहे.

असे लिहिलेत की सगळे जण तिकडे जाऊन पाहतातच,

पुढच्या वेळा उत्सुकता ताणायची असेल तर " विपु पहा, आणि वाचल्यावर डिलीट करा," असे लिहा,
लोकांना काहीतरी मिस केल्याचे फीलिंग मिळू दे Wink

Happy
अहो वाट बघून बघून शेवटी त्यांच्या लाडक्या धाग्यावर पोस्टले.
सिम्बा आयड्या वाईट नाही.