उन्हाळा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 March, 2009 - 05:13

उन्हाळ्यात प्रत्येकाच्या तोंडावर रोज एकदातरी ही वाक्य येतातच. "केवढ गरम होतय आज" रोज मध्ये हा आज असतो. "काय उन पडलय कडकडीत", "बाहेर नकोस वाटतय उन्हामुळे", "कधी संपेल हा उन्हाळा ?"

उन्हाळ्याकडे आपण ह्याच दृष्टीने बघतो. तो नकोसा वाटतो. गर्मि ने जीव हैराण होतो. खरच आहे ते. पण ह्यातले आपण फक्त अवगुणच पाहतो. पण ह्यात पण बरेच गुण आहेत. उन्हाळ्यातच मुलांना आणि आपल्याला मार्च एप्रिल पासून सुट्टीचे वेध लागतात. गावाला जायचे, फिरायला जायचे बेत आखायला सुरूवात होते. मे महीना म्हणजे काय मजेला उधाणच. मामाच्या गावाला ह्याच दिवसांत जायला मिळते. शाळेला सुट्टी मिळुन झोपेवरचे, खाण्यावरचे बंधन नाहीसे होते. मजा, मस्ती, खेळ, हुंदडण्यात ती रमुन जातात. माहेरवाशीणींना माहेरची मायेची माणस भेटतात, थोरांनाही आपली मुल, नातवंड भेटल्याचा आनंद होतो. नवर्‍यालाही जरा बायकोपासुन मोकळीक मिळते Wink काही जण लांब सफरीला जातात. प्रेक्षणीय स्थळे ह्या दिवसांत आपल्याला पाहायला आलेल्या गर्दी मुळे धन्य होतात तर अनेक आजी आजोबा आपल्या परीवारा सोबत तिर्थ स्थळांना भेटी देउन धन्य होतात.

ह्याच दिवसांमध्ये बहुतांशी जिकडे तिकडे लग्न सोहळे साजरे होत असतात. लग्न घर आनंदाचे सोहळे अनुभवत असतात. नविन नाती जन्माला येतात. तरूण-तरुणी वैवाहीक बंधनात गुंततात आणि नविन स्वप्नांमध्ये तरंगत असतात. प्रेमभावना आणि प्रेम अनुभवत असतात. मोगर्‍याचा सुगंध ह्या दिवसांची आठवण अजरामर करुन ठेवतो.

उन्हाळ्याच्या दिवसांत निसर्गाचा उत्सव असतो. अनेक कवी पावसांवर कविता करुन त्याचे पावसाळ्याचे स्वागत करतात पण रंगपंचमी रंग उधळत उन्हाळ्याचे स्वागत करते. आमराई बहरुन येते, फळांचा राजा आंब्याचे आगमन होते, काजु दिमाखदारपणे मिरवत असतो. फणसाचा वास घुमू लागतो. कोकमाची झाड रसरशीत भरतात, राना वनात जांभळ, करवंद, आळू, रांजण, जाम, आवळे झाडांच्या फांदी फांदी वर डोलू लागतात.

कडक उन्ह पडायला लागली की सांसारीक बायकांची टिकवण्याचे पदार्थ बनविण्याची लगबग चालु होते. प्रत्येक अंगणात गच्चीवर पापड, कुरडया, फेण्या, शेव असे पदार्थ वाळताना दिसतात, मसाल्यांच्या गिरणिंना ह्या दिवसांत उसंत नसते. ताज्या ताज्या मसाल्याचा वास सगळीकडे दरवळत असतो. लहान मुल ही सुकवलेली आंबोशी, आवळे, फणसपोळी भर उन्हात पळवुन मजा लुटत असतात. लोणची, मुरांब्यांच्या भरलेल्या बरण्या स्वयंपाक घरात मिरवू लागतात.

ह्या दिवसात पाणी म्हणजे जीवन हा समानअर्थी शब्द अधिक तिव्रपणे पटतो. कैरीचे पन्हे, कोकम सरबत, आमरसांच्या गाड्या बाजारपेठेत तळ ठोकुन बसतात.

उन्हामुळे तप्त झाल्यामुळेच पावसाच्या पहिल्या सरीने मातीला मनमोहक सुगंध पसरतो.

गुलमोहर: 

वाव जागु मस्त लिहिलंस......खरंच उन्हाळ्यात ब-याच घडामोडी घडतात.... उन्हाळ्याची सुरवातच मुळी वसंत ऋतुने होते.... इतक्या उत्साही सुरवातीनंतर अर्थातच बाकीची धमाल होणारच... तु खुप छान निरिक्षण केलयस उन्हाळ्याचे.. (बायका साठवणीचे पदार्थ पण उन्हाळ्यातच करतात हे मात्र विसरलीस Happy )

(शुद्धलेखनाकडेही लक्ष दे थोडं)

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

छान निबंध जागू.. Happy हो, ते वाळवण राहिलं ग .. Happy कविता मी जास्त वाचू शकत नाही, तरी तुझ्या काही वाचल्या. कथा, ललित मात्र पटकण वाचणार बघ.. :०

उन्हाळ्यावर निबंध हा पहिलाच!
बरोबर आहे... ज्या पावसळ्याचे गोडवे गायले जातात, ते उन्हाळ्याशी असलेल्या विरोधाभासामुळेच!
वर्षातले १२ महिने पाउस पडला असता (सिंगापुरला पडतो ना?) तर किती कौतुक झालं असतं?!!

"उन जरा जास्त आहे....दर वर्षी वाटतं...
भर उन्हात पाऊस घेउन आभाळ मनात दाटतं.."
(ह्या "गारवा" मधल्या ओळी आहेत.) Wink

माझा आवडता रुतू ... उन्हाळा... (कारण त्यात मनसोक्त आइसक्रीम हाणता येतं... अन मनसोक्त सुट्ट्या... Wink )

माझ्या आवडत्या रुतुवर सुंदर लेख् लिहिल्याबद्द्ल धन्यवाद Happy

................................................
निवडणुकीव्यतिरिक्त माझे मत फारसे कुणी विचारात घेत नाही... Wink

जागू... शालेय जिवनातील उन्हाळा आठवला, तेव्हा उन्हाळी सुट्टीला एक वेगळेच महत्व होते... Happy

ढेकणांची पैदाईश पण उन्हाळ्यातच होते Sad म्हणून की काय बर्‍याच ठिकाणी फर्निचर उन्हात विखुरलेलं दिसतं...

ढेकणांची पैदाईश पण उन्हाळ्यातच होते
Proud Lol

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

छान जागू.मस्त वर्णन! उन्हाळा जवळ आला.मा बो वर किती ढेकणे दिसायला लागलीत. लॅपटॉप साफ करून घ्यायला पाहिजे..
ढेकूण ढेकूण करीत मी
जाऊन पाहतो रानात
तेथे जाऊन पाहतो
तो ढेकूण माझ्या कानात...
अरे माझ्या ढेकणा ने ..मजला पिसाळिले!!
(कोठे तरी वाचलेली)

नवर्‍यालाही जरा बायकोपासून मोकळिक मिळते उन्हाळ्यात. जागू हा चुकीचा आरोप आहे. वाघिणीसमोर बोकड बांधला असतांना वाघीण जर दोन दिवस बाहेर गेली तरी बोकडाला झोप लागेल का?

जागु सुरेख. लहान असताना नेहेमीच उन्हाळ्याची वाट बघायचो ...(उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी Happy )
असो. मस्त्च ! लिहीत राहा !!

____________________________________________

आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही Happy )

उमेशराव आता तुम्ही आंतरजातीय विवाह करु पाहताय यात वाघिणीचा काय दोष ? Happy

____________________________________________

आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही Happy )

वाघिणीसमोर बोकड बांधला असतांना वाघिणीला जरी थोडी डुलकी लागली तरी बोकडाला झोप लागेल का?>>>>>>>>>
Uhoh

उमेशराव आता तुम्ही आंतरजातीय विवाह करु पाहताय यात वाघिणीचा काय दोष ?>>>>
नाही....आन्तरप्राणीय
Happy

विशाल्;अरे बोकड आणि वाघीण दोन्हीही प्राणीच ना!

आंतरजातीय प्राणी !! Happy

____________________________________________

आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही Happy )

उन्हाळ्यावरचे ललित चांगले आहे.
नवर्‍यालाही जरा बायकोपासून मोकळिक मिळते उन्हाळ्यात. जागू हा चुकीचा आरोप आहे. वाघिणीसमोर बोकड बांधला असतांना वाघीण जर दोन दिवस बाहेर गेली तरी बोकडाला झोप लागेल का? >>>
उमेश तूझे लग्न झालयं वाटतं? (हालत फार खराब दिसते Lol ..... take it lightly.)

आणि विशाल, बोकड आणि वाघ हे आंतरजातिय नाही काही आंतर प्राणिय आहे Proud

साधना, अनघा, सॅम, वैदेही, इंद्र, उमेश, विशाल, मनु, वर्षा तुमचे मनापासुन धन्यवाद.

साधना, अनघा तुमच्या सुचनांचा मी विचार केला आहे.

<<<नवर्‍यालाही जरा बायकोपासून मोकळिक मिळते उन्हाळ्यात. जागू हा चुकीचा आरोप आहे. वाघिणीसमोर बोकड बांधला असतांना वाघीण जर दोन दिवस बाहेर गेली तरी बोकडाला झोप लागेल का?

बायकोला पण मोकळिक मिळते ना?