थायरॉईड संबधी माहिती हवी आहे..

Submitted by अंतरा on 31 October, 2017 - 05:30

थायरॉईड संबधी माहीती हवी आहे.मला फारशी काही माहीती नाही. कोणाकडुन खात्रिलायक माहिती मिळेल असेही नाही.
कोणाला पुण्यात थायरॉईड च्या उपचारासाठी तज्ञ माहीत आहेत का? नातेवाईकांसाठी हवी आहे माहीती.
थायरॉईड ची टेस्ट करून घेतली आहे. TSH-२१.३३, T3-९०, T4-४.९. गेल्या ४/५ महिन्यात २ टेस्ट केल्या पण TSH लेव्हल वाढलेली. थायरॉईड च्या टेस्ट साठी फास्टींग आवश्यक आहे का? सगळे सांगतात तशी थायरॉईड ची लक्षणे नाही दिसत. सध्या ज्यांच्या कडून उपचार घेत आहे त्यांनी कन्फ्युज केले आहे. थायरॉईड आणी e-gfr rate चा काही संबंध आहे का? त्यांचा हा रेट कमी झाला आहे. डॉक्टर तसेच काहीसे सांगत आहेत. ते काय सांगतात त्यामुळे गोंधळल्या सारखे होते आहे.

Group content visibility: 
Use group defaults

वजन वाढलेय का? (वरचे नंबरस बघून लिहितेय)?
दम लागतोय, थकवा येतोय...
माझ्या समजानुसार, हायपो/हाय्पर हा मानसिक/शारीरीक/ भावनिक बदलातून जात असेल तर हामोर्न्स बदलामुळे शक्यतो ज्यास्त वेळा दिसून येतो/होतो. चांगल्या एन्डोक्रोनोलॉजिस्ट कडे जा. मेटाबोलिक पॅनेल पण चेक करून घ्या( ह्या जरूरी नाहीयेत) पण बरे असते.
इन्फेक्शन आहे का?

फास्टिंग ग्लुकोज वगैरे बघायला किंवा रीनल प्रोफाईल केला का( ई जीएफार) केलेय म्हणून?

तुम्हाला चांगला डॉक्टर सांगेलच काय करायचे ते.
तुम्ही डॉक्टरांनाच चार प्रश्ण विचारा ना... जोवर तुमचे समाधान होत नाही. जसे की, ह्या टेस्ट चे रीडींग किती असावे व का केल्या? वगैरे...

इथे एक थायरॉईड वर लिंक आहे तिथे भरपूर माहिती मिळेल.

मी डॉ. नाही. तुम्ही जे लिहिलं आहे त्याचा अर्थ सांगायचा प्रयत्न करतो आहे. मी सांगतोय म्हणून ऐकू नका. तुमच्या डॉ. चा सल्ला घ्या.

TSH म्हणजे थायरोईड स्टीम्युलेटिंग हार्मोन. जे पिट्युटरी ग्रंथी स्त्रवते. हे हार्मोन रक्तातील थायरॉईडचे प्रमाण सुस्थितीत ठेवायला मदत करते. जर थायरॉईडचे प्रमाण कमी झाले तर TSH जास्त प्रमाणात स्त्रवते (स्त्रवण्याचा प्रयत्न करते) जेणे करून थायरॉईड ग्रंथी आणखी जास्त काम करून पुरेशा प्रमाणात थायरॉईड तयार करेल.
TSH 0.4 to 4.0 milli-international units per liter असायला हवे (तुम्ही थायरोईड साठी काही औषधे घेत असाल तर हे प्रमाण बदलेल, आणि प्रयोगशाळेप्रमाणेही बदलेल) जे तुमचे २१.३३ आहे. म्हणजे बरेच जास्त आहे. थोडक्यात तुमच्या थायरोईड ग्रंथीला पुरेसे थायरोईड तयार करायला खूप जास्त वेळा स्टीम्युलेट करायला लागत आहे.
आता थायरोईड ग्रंथी जे T३ T४ तयार करते त्याचं प्रमाण बघितलं तर तुमचं प्रमाण लोअर साईडला बेअरली लिमिट मध्ये आहे. या लिमिट मध्ये कदाचित तुम्हाला टेक्स्ट बुक लक्षणे दिसणार नाहीत. थोडक्यात तुम्हाला सबक्लिनिकल हायपोथायरोईडजम आहे. तुमच्या डॉ. ने तुम्हाला Levothyroxine प्रिसक्राईब केलं असेल. (ब्रान्ड नेम सिन्थ्रोईड इ.) केलं नसेल तर का ते जाणून घ्या. डॉ. सांगेपर्यंत मनाने गोळ्या घेणे/ थांबवणे करू नका.

सुरुवातीला कमी मात्रेचा डोस सुरु करून टिपिकली ६ आठवड्यांनी परत रक्त तपासणी करायला डॉ. सांगतील. त्यात परत TSH, T३, T४ बघून डोस कमी जास्त करायचा असेल तर तो डॉ. करतील. औषध कसं घ्यायचं हे ही ते सांगतील.
टेस्ट साठी काय आवश्यक आहे ते lab ला विचारा. इतके/ इतर फोरम वर लोक काय वाट्टेल ते सांगतील.
अल्टरनेट कुठल्याही उपचाराच्या नादाला लागू नका. गोळ्या कायम घ्याव्या लागल्या तर घ्या.

प्रतिसादांबद्दल धन्यवाद. बर्या पैकी गोंधळ कमी झाला.
थायरॉईड टेस्ट करताना फास्टींग आवश्यक असते का?.. ते केल्यानंतर / न केल्यानंतर टेस्ट केली तर काही फरक पडतो का?. एका लॅब ने फास्टींग आवश्यक सांगीतले तर बाकीचे म्हणतात फास्टींग आवश्यक नाही.

बाकीचे म्हणतात फास्टींग आवश्यक नाही. >>>+ १. त्याबरोबर इतर काही चाचण्या करायच्या असल्यास त्यानुसार ठरवणे

थायरॉइडसाठी फास्टिंग आव्श्यक नाही..
मी ३ महिन्यातून एक वेळा करून घेतो.
टी एस एच २१ असल्यास औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सुरू करावित. अनेकदा लक्ष्णे काहीच नसतात.
माझे २० पर्यंत गेले होते .. औषधांनी २ महिन्यात नीट झाले. मी एल्टॉक्सिन घेत होतो.
आता सेल्फ रेग्युलेट झाले व औषध बंद आहे. प्री कॉशन म्हणून दर ३ महिन्यात चेक अप करतो.
स्वतः काहीही करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तंतोतंत वागा.

माहिती बद्दल धन्यवाद.
थायरॉईड च्या उपचारासाठी पिंपरी-चिंचवड मध्ये तज्ञ कोणाला माहिती आहेत का? असतील तर त्वरीत सांगावे?

अत्यंत कॉमन आहे हायपोथायरॉईझम. तज्ञ नको, जनरल प्रॅक्टिशनर पुरे आहे. एकदा गोळ्या सेट झाल्या की जन्मभर घ्यायच्या आहेत हे मनात असू द्या. तुमच्या डॉ नी जे सांगितलं आहे त्या गोळ्या घेऊन बघितल्या का?

एकदा गोळ्या सेट झाल्या की जन्मभर घ्यायच्या आहेत हे मनात असू द्या.>>> +१ एक्दा एखाद्या डोसची शरिराला सवय झाली की बॉडि नॉर्मल फक्शन करते , हा मोठा आजार नाही पण गोळ्या न घेणे किवा सतत फ्लक्त्युएट होत असेल तर काळजी घेणे मस्ट आहे, दर सहा महिन्यानी चेक करत रहा.
लक्षण-- थकवा वाटत राहतो, स्किन, नेल्, हेअर ड्राय होतात , हेअर लॉस, दुपारी झोपावसे वाटणे, लेथार्जिक वाटणे ही कॉमन लक्षण आहेत,
बेस्ट टाइम टु टेक मेडिसिन--- सकाळी उठल्या उठल्या रिकाम्यापोटी त्यानतर किमान १ ते १/२ तास काहीही खावु नये.
रिड्युस एनी स्ट्रेस लेवल त्याने लेवल मधे फरक पडतो.

बाहेरून सिंथेटिक हार्मोन जन्मभर घ्यायचं.....भिती वाटते की हळूहळू डोस वाढत जाऊन शरीर स्वतः हार्मोन तयार करायचे बंद करेल.

२०१० मध्ये हायपोचे निदान झाल्यावर ५०mcg डोस पासून सुरवात झाली. गेल्या वर्षापासून tsh मधे सारखी चढ उतार होत असून ८५ पर्यंत डोस घ्यावा लागत आहे.

प्रतिसादांबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.
आता थायरॉईड ची गोळी कायम घ्यायला लागणार हे सत्य. काळजी नक्की घेतली जाईल. पण पथ्य आहेत का थायरॉईड साठी?

मी सहा महिन्यापूर्वी thyroid test केली होती. तेव्हा tsh3 .22 होते.तेव्हा डॉक्टरांंनी माझा डोस अर्धा केला. आता ६ महिन्यानी मी परत test केली तर tsh3 ३४.६९ आले. म्हणून परत डोस वाढवला. मला कळेना एकदम tsh3 एवढे कसे वाढले? काल कोणत्या खाण्याच्या गोष्टी मुळे tsh3 वाढू शकते हे शोधत असताना मला अचानक असे वाचण्यात आले की millets म्हणजे नाचणी, बाजरी मुळे tsh3 वाढते. मी 2,३महिन्यापासून नाचणी,बाजरी, जवारी चा दलिया खूप भाज्या घालून खात होते, त्याने sugar एकदमcontrol मधे आली. गोळी पण बंद झाली होती. पण नशिबाने test करायची बुद्धी झाली, आणि tsh3 वाढल्याचे कळले. हे मी अशा साठी शेअर केले कि millets मुळे tsh वाढते हे सर्वांना कळावे.