सिनेतारकांच्या सौंदर्यावर कॉमेंट करणे योग्य आहे का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2017 - 13:17

कदाचित कधी ना कधी आपण सर्वांनीच कोणत्या ना कोणत्या सिनेकलाकाराच्या दिसण्यावरून चांगली वाईट कॉमेंट केली असेलच. सई, स्वप्निल, शाहरूख(?), सुबोध भावे, कंगणा राणावत, गेला बाजार अमेय वाघ, कोण तो एक प्रभाकर, लेटेस्ट जॅकलीन आणि अजूनही लिस्ट निघेल... पण हे चटचट आठवणारे.

प्रत्यक्षात ही लोकं आपल्यापेक्षाही कैक पटीने सुंदर असतात, वा असू शकतात, तरीही आपण त्यांच्यावर कॉमेंट करायचा आनंद उचलतो. यामागे बरेचदा हेतू निखळ आनंद मिळवणे हाच असतो. पण काहीवेळा हा हेतू तितक्या ताकदीने पोहोचत नाही आणि वाद होतात.

बरेच दिवसांपासून हा धागा काढायचा होताच, कारण वरच्या लिस्ट मध्ये माझेच फेव्हरेट लोकं जास्त भरले आहेत. त्या त्या वेळी तो तो धागा भरकटू नये म्हणून विषय वाढवायचो नाही, पण आज दुसर्‍या एका धाग्यावर (कुठला ते शोधायला जाऊ नका) हा विषय पुन्हा आल्याने राहावले नाही आणि यावर तो धागा न भरकटता स्वतंत्र चर्चा घडावी यासाठी वेगळा धागा काढला.

चर्चा सुरू करायला माझे स्वत:चे मत मांडतो.
मला एखाद्या कलाकाराच्या दिसण्यावरून कॉमेंट करण्यात फार काही आक्षेपार्ह वाटत नाही. फक्त कधीकधी त्यामागचा हेतू कमी जास्त आक्षेपार्ह वाटू शकतो.
मी स्वत: कधी फारशी अशी कॉमेंट केल्याचे आठवत नाही, पण जाणीवपूर्वक टाळलीही नाही. किंवा एखाद्याने केलेली कॉमेंट आवडली तर हसलो देखील असेन.
मला स्वत:ला माझ्या आवडत्या कलाकारांच्या दिसण्यावरून केलेली कॉमेंट त्रास देऊन गेली नाही. कारण वर लिहिले आहे तेच. प्रत्यक्षात सई, स्वप्निल, शाहरूख वगैरे हे कॉमेंट करणार्‍यापेक्षा कैक पटींनी सुंदर असण्याची शक्यताच जास्त असते. आणि हे त्या कॉमेंट करणार्‍यांनाही ठाऊक असतेच. पण होते काय, बरेच वेळा आपण मनात आलेली एखादी विनोदी तुलना कागदावर उतरवायच्या प्रयत्नात असतो. आपल्या नजरेला जे दिसले ते ईतर कोणाला दिसले का हे चाचपत असतो.

तसेच सौंदर्याच्या व्याख्या प्रत्येकाच्या वेगळ्या असतात हे सांगायला नकोच. मला सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा लहानपणी सलमान आम्हाला जगातला दुसर्‍या की तिसर्‍या क्रमांकाचा चिकणा हिरो वाटायचा पण माझी आत्या एकदा बोलता बोलता सहज बोलून गेलेली, "हा दिसायला काही खास नाही पण अभिनय चांगला करतो.. म्हणून भाव खाऊन जातो Happy
त्या आत्येसाठी सौंदर्याचे बेंचमार्क मधुबाला आणि देव आनंद होते !

बरेचदा काय होते, सिनेकलाकारांबद्दल बोलण्याचा आपला हक्क आपण बजावत असतो. आपण ज्यांना पडद्यावर २०० रुपये खर्चून बघायला जातो जर ते आपल्या डोळ्यांना वा मनाला आल्हाददायक नाही दिसले तर एक ग्राहक म्हणून आपण आपला असंतोष व्यक्त करू शकतो. वेगळ्या भाषेत सांगायचे झाल्यास त्यांचे सौंदर्य हे आपल्यासाठी एक प्रॉडक्ट असते. निदान आपण तरी तसे समजतो.

बरेचदा आणखी एक प्रकार होतो. एखाद्याचा चेहराच नकोसा वाटणे. जे माझे कोणे एके काळी शक्ती कपूरबाबत फार व्हायचे. म्हणजे तो पडद्यावर आला की मला ईरीटेट व्हायचे. त्याने काहीही केले तरी ते डोक्यातच जायचे. आणि त्याच्या बाबतीत त्याने चांगले काही केले असण्याची शक्यता कमीच असायची. मी माझे पैसे वेळ खर्च करून एखादा सिनेमा बघतोय, मला तो आवडतोय, माझे पैसे वसूल होत आहेत, पण त्यासोबत मला न आवडणारा हा एक माणूस मला सहन करावा लागतोय, ही भावना खरेच खूप ईरीटेटींग असू शकते हे तेव्हा अनुभवलेय. खरे तर तो हिरो नाहीये, त्याने सुंदर दिसावे अशी अट नसायची, पण तरीही ईतके घाण, ओंगळवाणे दिसू नये अशी माझी अपेक्षा असायची. आणि म्हणून त्याने काम केलेला एखादा चित्रपट बघून आल्यावर चित्रपटाबद्दल जे काही चांगलेवाईट मत असेल ते व्यक्त करून झाल्यावर त्याला चार शिव्या हासडायला विसरायचो नाही. तो माझा पब्लिक म्हणून हक्कच समजायचो. बरेचदा त्या बोलण्यात एक विखार असायचा, ज्याची काही गरज नव्हती हे आता मला जाणवतेय. अर्थात, आजही तो माझा नावडताच आहे, आणि आजही तो मला ईरीटेटच करतो. पण आता मी ते ईरीटेशन हॅण्डल करायला शिकलो आहे Happy

अजून मुद्दे आठवतील तसे ईथे किंवा प्रतिसादात भर टाकतो ...

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ ऋन्मेऽऽष >>>> घे तुला नविन खाद्य
Mata news _

5 Oct 11:00 PM
मुंबई : शाहरुख खानच्या रेड चिली कंपनीच्या गोरेगावमधील डीएलएच पार्कमधील कार्यालयावर मनपाची कारवाई. २ हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम तोडले- टीव्ही रिपोर्ट

ओ व्हीबी... वाईच थांबा की राव.... आम्ही इथे गहन विषयावर चर्चा करत आहोत. आधी सिनेतारका म्हणजे काय ते स्पष्ट होऊंद्येत.

नानाकळा, सर्वांनाचा समजावे म्हणून ईंग्लिशमध्ये Happy

An actor (often actress for females; see terminology) is a person who portrays a character in a performance.

A movie star is an actor who is famous for their starring, or leading, roles in motion pictures.

Superstar is a term used to refer to someone who has great popular appeal and is widely known, prominent, or successful in some field.

आता अनुक्रमे कोणाच्या सौंदर्यावर कमेंट करणे योग्य की अयोग्य हे सांगा

जी फील्ड त्यानुसार कंमेंट चा एरिया..

सिनेमा - सगळ्याच्या सौन्दर्यावर आणि अकटिंगवर कंमेंट करणे योग्य..

माबो - लेखनशैली वर कंमेंट करणे योग्य..

क्रीडा - खेळण्यावर कंमेंट योग्य, त्यांच्या लुक्स वर अयोग्य..

जी फील्ड त्यानुसार कंमेंट चा एरिया..
सिनेमा - सगळ्याच्या सौन्दर्यावर आणि अकटिंगवर कंमेंट करणे योग्य..

>>>>>

च्रप्स लॉजिकशी सहमत.
फक्त सिनेमा म्हणजे सौंदर्य किंवा अभिनय किंवा दोन्ही असे हवे ते..... हा फक्त सौंदर्याचा बाजार नाही.
हा, त्या फॅशन शो मधील रॅम्प वॉक करणर्‍या मॉडेल त्यांच्याबाबत तसे तुम्ही म्हणू शकता.

राजकारण्यांच्या / समाजसेवकांच्या सौंदर्यावर कॉमेंट करायची का?

लालूप्रसादनी बिहारचे रस्ते हेमामालिनीच्या गालासारखे बनवू असे सांगितले होते.

सोनिया गांधींच्या गोरेपणावर तत्कालीन विरोधी पक्षनेत्यांनी अतिशय खालच्या थरावर जाऊन कॉमेंट्स केल्या होत्या.

बाळ ठाकरे यांनी अण्णा हजारे यांना वाकड्या तोंडाचा गांधी असे संबोधले होते.

शशी थरूर यांच्या सॉफिस्टिकेटेड पर्सनॅलिटीवरही कोणीतरी कुत्सित कॉमेंट केल्याचे स्मरते.

पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राज ठाकरे यांनी ते ७०-८० च्या दशकातील मराठी सिनेमाच्या व्हिलनसारखे दिसतात असे म्हंटले होते.

मायवती - इज् शी ही ऑर शी? अशी कॉमेंट शायना नाना चुडासामा यांनी केली होती.

सहसा काँग्रेसचे नेते असल्या वाचाळपणात अडकत नाहीत पण (बहुदा) २०१४ मध्ये काँग्रेसच्या फुटकळ नेत्यांनी स्वपक्षीय अभिनेत्री नगमा यांच्यावर काही अश्लाघ्य टिपण्णी केली होती.

भाजपचे नाव घेण्याचे हेतुपुरस्सर टाळले का बिपिन? >>> +111
बाळ ठाकरे यांनी अण्णा हजारे यांना वाकड्या तोंडाचा गांधी असे संबोधले होते. >>> सह्याद्री चैनेल वर खरे खोटे देव जाणे नावाचा कार्यक्रम लागायचा त्यामध्ये अण्णा हजारे यांच्यावरही काही आरोप होते. असे ऐकलेय खरे खोटे देव जाणे.

<हा, त्या फॅशन शो मधील रॅम्प वॉक करणर्‍या मॉडेल त्यांच्याबाबत तसे तुम्ही म्हणू शकता.>
कसं काय ब्वा?
मॉडेल्सच्या कामाचा एक भाग झाला सुंदर दिसणं. त्यांचं मुख्य काम आहे कपडे किंवा जे कुठले प्रॉडक्ट आहे ते दाखवणे.

मॉडेल्सच्या कामाचा एक भाग झाला सुंदर दिसणं.
>>>>>

उत्तरही तुम्हीच दिलेत Happy

याच धर्तीवर चीअरगर्ल्स आणि चीअरबॉईज, हवाईसुंदरी आणि हवाईसुंदर यांनाही या गटात घेऊ शकतो.

प्रत्यक्षात सई, स्वप्निल, शाहरूख वगैरे हे कॉमेंट करणार्‍यापेक्षा कैक पटींनी सुंदर असण्याची शक्यताच जास्त असते. हे विधानच मुळात चूक असून असे विधान धागाकर्त्याच्या बालिश मनोव्रुत्तीचे दर्शक आहे. तुम्ही कोण ठरवणार कोण कुणापेक्षा किती पट सुन्दर वगैरे आहे म्हणून? तुम्हाला कोणी अधिकार दिला ? प्रत्येक व्यक्ती स्वतःसाठी सुन्दरच असते . असली फालतू विधाने करण्याआधी दहादा विचार करावा ...

मला तर वरती नावे आहेत त्यातले सुबोध आणि ललित प्रभाकर (किंवा प्रभास असेल तर तो ही) सोडले तर इतर कोणी सुंदर आहेत यावरच ऑब्जेक्शन आहे Wink

ऋन्मेष - शाखा सुंदर नाही. अमिताभही नव्हता. त्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा करिश्मा निर्माण केला त्यामुळे ते देखणे वाटू लागले त्यांच्या तरूणपणात.

शाखा सुंदर नाही. अमिताभही नव्हता. त्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा करिश्मा निर्माण केला त्यामुळे ते देखणे वाटू लागले
>>>>>>>
हो खरंय. बहुधा हेच ते एक्स फॅक्टर. अननोन फॅक्टर. ज्याची व्याख्या करता येत नाही वा ज्याचे काही ठोस परीमाण नाही. जे कुठल्या निकषांच्या अधारे ओळखता येत नाही वा मोजता येत नाही. जसे एखाद्या खेळाडूला सरावात खेळताना बघून त्याचा दर्जा ओळखू शकतो तेच एक्स फॅक्टरबाबत लागू नाही. ते लोकांनी डोक्यावर उचलून घेतल्यावरच समजते. म्हणूनच सुपर्रस्टार बनायचा काही फॉर्म्युला नाही. ते बस्स बनतात...
पण तरीही या दोघांकडे सौंदर्य नावाचा प्रकार नाही, ते सर्वसाधारण वा कुरूप दिसतात असेही नाही. त्यांच्यातील करिश्मा प्रकाशात यायच्या आधी त्यांना लीड रोलचे म्हणजे हिरोचे काम मिळू लागलेले याचा अर्थ आपल्याकडे हिरोच्या भुमिकेसाठी लागणारे किमान सौण्दर्य त्यांच्याकडे होतेच.

काल परवात नौहीद सायरूसी नावाच्या नटीचे काळ्या साडीतले फोटो जालावर उपलब्ध आहेत ते बघा. साडी नेसूनही पदर जाग्यावर नाही फ्रंटला. आणि मागून जवळ जवल पूर्ण गोरी पाठ दाखवली आहे. मुद्दाम दाखविते आहे असेच दिस्ते. काही लाजत बिजत नाहीये व सुरेखही दिसते आहे. त्यांनाही असे दाखवून प्रसिद्धी मिळवायची असते. पण इन्स्टाग्राम वर फोटो खाली कमेंट एकदम भारी आहेत.
आज काल चिमुरड्या तैमूरचे पण जवळ जवळ रोज फोटो असतात. एन डी टीव्ही, लोकसत्ता साइट वर तर नेहमी असता त. हे पण पीआर एजन्सीच हँडल करत असावी. तो गोड आहे पण रोज रोज बघून वैतागच येतो. लोकसत्ता मध्ये
पब्लिक फार भयानक प्रतिक्रिया देतात. सारखे त्याला ं मीडिआत नाचवायची काय गरज आहे कोण जाणे.

हेमामालिनीच्या मुलीला मुलगी झाली तर लगेच फोटो घरी जातानाचा बाळाबरोबर. व हि अशी हात वर करते की अगदी राणीच कोणचीतरी. टू मच करतात.

प्रत्येक व्यक्ती स्वतःसाठी सुन्दरच असते .
>>>
याला नॉस्त्रादेमस बोलतात. हा एक आजार आहे. >>> Rofl
नॉस्त्रादेमस? हा आजार? ऋन्मेष प्लिज मला जरा नीट उलगडून सांग ना
या नव्या रोगाबद्दल मला फारच उत्सुकता लागून राहिली आहे. Rofl

>>याचा अर्थ आपल्याकडे हिरोच्या भुमिकेसाठी लागणारे किमान सौण्दर्य त्यांच्याकडे होतेच.<<

सौंदर्य नाहि रे बाबा, इस्टाइल (हल्लीच्या भाषेत स्वॅग) असते काहिंची खास; त्यावरुन सुरुवात होते...

नॉस्त्रादेमस? हा आजार?
>>>>

सॉरी स्पेलिंग मिस्टेकली Happy
नार्सिसम हा आजार. काहीतरी नार्सिस नावाचा राजकुमार होता. त्याला स्वत:च्या रुपाचे कौतुक होते. तळ्याकाठी जाऊन तो पाण्यात आपले प्रतिबिंब तासनतास न्याहाळत बसायचा. बहुधा तेव्हा आरश्याचा शोध लागला नसावा. तर एकेदिवशी असाच तळ्याकाठी पाण्यात बघत बसला असताना तोल जाऊन पाण्यात पडतो आणि बुडतो कि पाण्यातून मगर येऊन त्याला खेचून नेते असे काहीसे होत मरतो. तेव्हापासून त्याच्या स्मरणार्थ या रोगाला त्याचे नाव देण्यात आले आहे.

नॉस्त्रादेमस? हा आजार? >>> Lol

पण तरीही या दोघांकडे सौंदर्य नावाचा प्रकार नाही, ते सर्वसाधारण वा कुरूप दिसतात असेही नाही. >>> अगदी कुरूप नाही (म्हणजे तो म्हैस मधला ऑर्डरली तुम्ही पोलिस नाही विचारल्यावर "पोलिस नाही तर काय चोर आहे?" विचारतो तसे), पण सर्वसाधारण लूक्स होते. पब्लिक मधे उठून दिसण्यासारखे काही नव्हते - लूक्स मधे.

राज,
अशी ईस्टाईल मारणारी पोरं दर कॉलेजच्या कट्ट्यावर शेकड्यांनी मिळतील. एखाद्या नवीन हिरोला ब्रेक देताना त्याचा अभिनय सर्वात पहिले बघितला जात असणारच, सोबत जर त्याला हिरोची भुमिका द्यायची असेल तर तो हिरोईनला साजेसा नको का? आज शाहरूख हा शाहरूख झाला म्हणून किंग ऑफ रोमान्सच्या प्रेमात जगातली कुठलीही ऐश्वर्या पडू शकते हा विश्वास आपल्याला वाटतो. पण एखादा साधारण रुपाचा नवीन हिरो असेल ज्याचा करीश्मा अजून लोकांनी आवडीने स्विकारला नाहीये तो किमान ईतका सुण्दर तरी असलाच पाहिजे ना की समोरची हिरोईन याच्या प्रेमात पडू शकते यावर प्रेक्षकांचा विश्वास बसावा..

नार्सिसस तळ्यात आपल्या प्रतिबिंबाकडे पाहत तहानभूक हरवून गेला. उपासमारीने त्याचा तिथेच मृत्यू झाला. (नोंदः ही माहिती विकि-गुगल केलेली नाही, स्वतः नारसिससला भेटून विचारलेली आहे.)

नानाकळा, प्लांचेट करून विचारले का Happy
तो राजकुमार होता ना. उपासमारीने मेला यावर विश्वास बसत नाही. एवढा मरेपर्यण्त कोणी त्याला भरवायला गेले नाही का? गेला बाजार तोण्डाने खायला तयार नसता तर सलाईनच लावले असते.

अमा,
कोण्या नौहीद सायरूसी नावाच्या नटीने आपले हॉट फोटोशूट केले म्हणून प्रत्येक हिरोईनीच्या सौण्दर्यावर कॉमेंट करायचा हक्क घेणे हे योग्य का असा मुद्दा आहे.

बाकी पुढे लिहिलेले अति करतात हे योग्य. पण यांचे हे अति करणेही चवीने वाचणारा पेज थ्री गॉसिप प्रिय वाचक असतातच. किंवा माझ्यासारखे आवडीनुसार सिलेक्टीव्ह पण न कंटाळता वाचणारे असतात. म्हणजे मी एखाद्या सलूनमध्ये गेलो की नंबर येईपर्यण्त तिथे पडलेले पेज थ्री फिल्मी मासिक वा वृत्तपत्र चाळतो, त्यात शाहरूख शोधतो, आणि तेवढेच वाचून घेतो. गंमत म्हणजे शाहरूखबद्दल काहीच वाचायला मिळाले नाही असे कधीच झाले नाही. तो असतोच. आणि माझा नंबर येईपर्यण्त ते पुरतेच. लोकांना आपल्या आवडीच्या फिल्मस्टार्सबद्दल मिळेल ते वाचायची सवय असते, आणि या डिमान्डमधून तो सप्लाय होतो. माग्र् एकदा नेहा धुपिया बोल्ली होती. या ईण्डस्ट्रीत दोन गोष्टी विकल्या जातात. एक सेक्स आणि दुसरा शाहरूख. वर उल्लेखलेले पेज थ्री मासिक चाळताना मला या दोन्ही गोष्टी पटतात.

अरे स्वतः तहानभूक विसरला तो. तो मेल्यावरच सलाइनचा शोधाची चळवळ सुरु झाली म्हणे....

प्लांचेट वगैरे विषयांतर करु नये..... Sad

>>एखाद्या नवीन हिरोला ब्रेक देताना त्याचा अभिनय सर्वात पहिले बघितला जात असणारच,<<

अरे बाबा, काहि लोक त्या इस्टाइललाच अभिनय समजतात आणि शाखा सारख्यांना डोक्यावर घेतात... Happy

नॉस्त्रादेमस? हा आजार?
>>>
अवांतर - नॉस्त्रादेमस हा देखील आजार असू शकतो. रक्त नावाच्या चित्रपटात हा आजार बिपाशा बासूला झालेला. तिला अचानक पुढे काय घडणार हे दिसायचे. आणि सगळ्या वाईट गोष्टीच दिसायच्या.

Pages