मॅरेथॉन साठी तयारी कशी करावी ?

Submitted by प्रन्या on 15 August, 2017 - 01:18

मी नोव्हेंबर २०१७ मधेय आमच्या येथे होणार्या मॅरेथॉन साठी सहभाग नोंदविला आहे. यात ५ किमी १० किमी आणि २१ किमी असे तीन प्रकार आहे.
मी १० किमी साठी प्रयत्न करतोय. आजपासूनच तयारीची सुरवात केलीये पण सलग ५ मिनिटे सुद्धा संथ लयीत धावता येत नाहीये.
माझे काही प्रश्न आहे
१) धावण्या आधी कोणते व्यायाम करावेत
२) Stamina कसा वाढवावा
३) आहार काय ठेवावा

इतर काही सूचना सुद्धा आपण सांगू शकता.

धन्यवाद

Group content visibility: 
Use group defaults

प्रज्ञा, माबोवर एकदा मॅरेथॉन म्हणून सर्च करा या आधी 2 3 धाग्यांवर खूप डिटेल्ड डिस्कशन झाले आहे,
काही स्पेसिफिक माहिती हवी असेल तर हर्पेन, वैद्यबुवा अशा अनुभवी लोकांना (अजूनही बरीच नावे आहेत, पण ही आत्ता अगदी लगेच आठवली) संपर्क करू शकता Happy

सगळ्यात आधी ५, १० किमी अंतराच्या धावण्याच्या स्पर्धांना मॅरेथॉन म्हणत नाहीत. हाफ मॅरेथॉन २१ किमी व फुल मॅरेथॉन ४२ किमी अशा असतात. त्यामुळे कोणालाही सांगताना मी ५, १० किमी अंतराच्या स्पर्धेत भाग घेणार आहे असे सांगा.

सगळ्यात महत्चाचा प्रश्न :- या आधी कधी व्यायामाचा भाग म्हणून धावला आहात का? समजा उत्तर नकारार्थी असेल तर सुरुवात केल्या केल्या आपल्याला लगेच धावणं जमेल अशी अपेक्षा ठेवणं थोडं चुकीचं ठरेल. सुरुवात करताना अगदी अर्ध्या मिनिटापासून करा. वॉक-रन असं करत रहा. सुरुवातीला जास्त वॉक व रन कमी. एका आठवड्याने धावण्याचा कालावधी अर्ध्या मिनिटावरून एक मिनीट करा. आयडियली आठवड्याला मायलेज १०% वाढवायचं असं ऐकलं आहे. जसं जसं रनिंग नियमीत होईल, स्टॅमिनाही वाढेल.

तुमची रेस नोव्हेंबरमध्ये आहे तर अजून ३ महिने आहेत तयारीला. एखादं रनिंगचं अ‍ॅप डाऊनलोड करून घ्या. रनकीपर, एन्दोमोन्दो, नायके, स्ट्रावा अशी अ‍ॅप्स आहेत. नायके रनिंग वर तर ५के, १०के रेसच्या तयारीचे ऑप्शन्स आहेत. ते फॉलो करू शकता. तुम्हांला रेससाठी शुभेच्छा.

आऊटडोअर्स + १
त्यांनी अगदी व्यवस्थित लिहिले आहेच.

सिम्बा / धनश्री म्हणताहेत तसे मॅरॅथॉनच्या धाग्यावर / खेळाच्या मैदानात गृप मधे तुम्हाला बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.

तुमच्या प्रश्नांची उत्तरे, तुमचे वय काय, सध्या काय करता, शिकता आहात की नोकरी धंदा, तुमच्या कामाचे स्वरुप , ट्रेनिंग करता देऊ शकत असणारा वेळ ई. सर्व बाबींनुसार बदलू शकतात. तुम्ही जिथे राहता तिथल्या अथवा जवळपासच्या एखाद्या रनिंग गृपला अगदी रोज नाही जमले तरी निदान विकेंडला सामील झालात तर त्याचा अधिक उपयोग होऊ शकतो.

तुम्हाला तुमच्या रन / मॅरॅथॉन करता शुभेच्छा !

आऊटडोअर्स आणि हर्पेन +१

याआधी आजिबात धावले नसाल तर रन / वॉक ने सुरूवात केलेली चांगली. हळू हळू वॉक पार्ट कमी करून रन पार्ट वाढवा. तसेच सुरूवातीला २ मैल, मग ३ असे अंतर पण वाढवत न्या. तुमची रन नोव्हेंबर मध्ये आहे म्हणजे तुमच्या कडे बराच वेळ आहे. त्यामुळे सध्या धावता येत नाही असे वाटून निराश होऊ नका. फक्त ट्रेनिंग सुरू ठेवा.