अक्कल दाढ काढण्यास साधा डेंटिस्ट चालेल , की ओरल सर्जन लागेल?

Submitted by sneha1 on 14 August, 2017 - 13:23

नमस्कार!
मला थोडी माहिती हवी आहे. मला खालच्या बाजूला एक अक्कलदाढ आहे, आणि ती बाजूच्या रूट कॅनल केलेल्या दाताला पण अफेक्ट करते आहे. endodontist ने सांगितले आहे की हे दोन्ही दात काढावेच लागतील. तर प्रश्न असा आहे कि हे काम कुणाकरून करून घ्यावे? माझी डेंटिस्ट म्हणते की ती करू शकेल पण वाटलं तर सर्जन कडे जा. कोणी काही माहिती देऊ शकेल का प्लीज?
धन्यवाद!

Group content visibility: 
Use group defaults

माझी डेंटिस्ट म्हणते की ती करू शकेल पण वाटलं तर सर्जन कडे जा. >> आपला थोडा अविश्वास त्यांना दिसल्यास बहूतेक डेंटिस्ट असेच म्हणतात.
सर्जनचा कल फूल अ‍ॅनास्थेशिया देण्याकडे असतो तर डेंटिस्ट फक्तं तोंड नम करतात.
डेंटिस्ट अगदीच तरूण नसल्यास आणि चांगली अनुभवी असल्यास काही फरक नाही. सर्जन एकावेळीच दोन्ही काढेल पण डेंटिस्ट कदाचित दोन फेर्‍या मारायला लावेल. तुमची तयारी असल्यास दोन्हीही काढेल.
मी मित्राला फुल्ल अ‍ॅनास्थेसिया नंतर पिक अप ड्रॉप करणार होतो तेव्हा अ‍ॅनास्थेशिया ऊतरतांना त्याने जो गोंधळ घातला त्याचा सॉलिड फनी किस्साच झाला. Happy

स्नेहा, मुंबईत पार्ले सांताक्रूझ भागात असाल तर खात्रीचा डेंटिस्ट सांगतो,
माझा वैयक्तिक अनुभव चांगला आहे

माझी अक्कलदाढ सध्या डेंटिस्टने काढली (उखडली!) अक्कलदाढ एकदम मागे असल्यामुळे थोडा त्रास झाला पण दाढ काढायची काही मिनिटं सोडली तर बाकी काही त्रास नाही.

अक्कल दाढ फार मागे असलेला दात असल्याने तो काढण्यासाठी डेंटिस्टला अक्कलेसह हुशारी लागते म्हणून त्यास अक्कल दाढ म्हणतात परंतू त्या दाढेखाली खूप अक्कल असते असं मला लहानपणी वाटायचं. आमची डेंटिस्ट पार्ट टाइम एका धर्मादाय दवाखान्यात काम करत असल्याने तिला खूप अनुभव सराव होता व तिने ते काम फटकन केले. दात काढून झाल्यावर दाखवून म्हणाली ही तुमची अक्कल दाढ. अगोदर सांगितलं नाही कारण पेशंट फार घाबरतात.

मला दोन्हींमधला फरक कळत नाही Sad मी दातांचे डॉक्टर असा generic शब्दप्रयोग करते. माझ्या कॉम्प्लेक्स chya whatapp group वर जेव्हा इतर 255 बायका दातांच्या वेगवेगळ्या कारणांसाठी असलेले वेगवेगळे डॉक्टर बद्दल discussion करतात, तेव्हा for once I have nothing to add / contribute Happy
माझ्या दाताच्या डॉक्टरनी अक्कलदाढ काढावी लागेल असे सांगितले तेव्हा मी त्याला ok सांगितले आणि त्यांनी काढली. मला माहीत नाही तो सर्जन आहे का नाही. त्यांनी सांगितले एकटीच आली असशील तर दात काढल्यावर थोडावेळ बाहेर बाकावर बस आणि मगच रिक्षाने घरी जा, चालत जाऊ नकोस. Thats it.

माझ्या दोन अक्कलदाढा आत्ताच काढल्या 2 महिन्या च्या अंतराने
वरची ईतकी दुखायची मी दोन रात्री झोपलीच नाही , ती खुप आत होती अन रूट्स वाकडे होते सो ऑपरेट करुन काढली सर्जनने.
दुसरी खालची तिही खुप आत होती तरी तिच्यात मटण अडकले , दोन दिवसानंतर ठणकायला लागली, तोंड ऊघडणेच बंद झाले होते
डॉकने सांगीतले ऑपरेट करुन लगेच काढावी लागेल, अजुन एकदोन दिवस गेले तर बाहेरून ड्रील करूण काढावी लागेल.
सेकंड ओपीनियन घेतले तर त्यानीही तेच सांगतले
सो ही सुद्धा सर्जननेच काढली, पण खुप कठीण काम होते कारण जेमतेम दोन बोटे जातील ऐवढेच तोंड ऊघडत होते. चार टाके घातले.
पण ते डॉक खुप चांगले होते दोन्ही वेळेला खुप कमी त्रास दिला मला, खरेतर मीच त्यांना जास्त त्रास दिला रडुन गोंधळ घालुन.
आल्मोस्ट महिना लागला.होता तोंड पुर्ण ऊघडायला

पण ऐक निरीक्षण ... ईझी नसेलतर शक्यतो डॉक्स स्वःत सर्जनला बोलावतात
आणी सर्जन खुप महागडेही असतात पण त्रास कमी होतो

धन्यवाद सगळ्यांना. दाढ खूप मागे आहे, आणि बाजूचा दात रूट कॅनल केलेला आहे. त्यामुळे शेवटी सर्जन कडे जायचे ठरवले आहे!

स्नेहा मी सर्जन कडेच जा असा सल्ला देईन. एप्रिल मध्ये माझ्या चारही अक्कल दाढा एकाच वेळी काढल्या. ALLEN मध्ये डॉक्टर दीपाली निगुडकर आहे . तुमच्या इंशुरन्स मध्ये कव्हर असेल तर बघा . मी दाढा काढल्यावर ८ दिवस काळजी घेतली आणि मला नन्तर काहीही त्रास झाला नाही .