जाडूबाई जोरात - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 12 July, 2017 - 10:57

जाडूबाई जोरात ही विनोदी मालिका झी मराठी वर २४ जुलै पासून (सोमवार ते शुक्रवार, दुपारी १ वाजता) चालू होतेय.
किशोरी शहाणे आणि निर्मिती सावंत कलाकार आहेत.

आधीचा धागा दोन मालिकांचा सोबत आहे म्हणून हा वेगळा काढलाय जेणेकरून वेगवेगळं चर्वितचर्वण (चांगलं/वाईट दोन्ही इथेच) करता येईल.
चला सुरू व्हा... Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिचा नवरा तिला जानू म्हणतो!!! बहुतेक!
की जाडू!
आणि ती अतिशय कृत्रिम वाटावी अशी भोळी आणि साधी दाखविली आहे...

Real life मधल्या मुलींसारख्या कोणीही नायिका नाहीयेत zeeच्या ।। सगळ्या अति गोड आणि सोशिक etcetc बघवत नाही अगदी ।। बोर आहे ही पण सिरीयल

साधी भोळी अति गोड सोशिक सोबत कणाहीन आहे ती, कोणी ही यावं आणि टपली मारून जावं असं कॅरॅक्टर आहे तिचं.. मी पण गळले आहे म्हणे तिचे म्हणजे आत्म-सन्मान ही नसावा हे किती खेदजनक, कोण लिहितं असं काहीही.... त्या जुई च्या नवर्यात आणि अण्णा मधले संवाद पाहून बघायची सोडली ही मालिका

Pages