फ्रेंच ओपन २०१७

Submitted by मुकुंद on 12 June, 2017 - 00:35

मायबोलीवर बर्याच दिवसांनी आलो. परागचे टेनिसचे धागे आत्ता कुठे आहेत? फ्रेंच ओपन २०१७ चा धागा काढला आहे का त्याने? राफाच्या १० व्या फ्रेंच विजेतेपदाबद्दल अभिनंदन करायला इथे लिहायला आलो .

काय खेळला सबंध टुर्नामेंटमधे... एकही सेट गमावला नाही त्याने. आजच्या फायनल मधेही जबरीच खेळला. फेडरर व त्याच्यातल्या या वर्षीच्या ऑस्ट्रेलियन ओपन फायनलमधेही तो मस्त खेळला होता पण तेव्हा तो हरला. आता फेडरर व त्याच्यात विंबल्डनला परत एक एपिक फायनल व्हावी अशी खुप इच्छा आहे...२००६,२००७ व २००८ विंबल्डन फायनलसारखी..

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पराग सध्या गायब आहे मायबोलीवरुन त्यामुळे नवीन टेनिस चे धागेच निघत नाहीत...

पण कालची मॅच फारच एक तर्फी झाली... मरेला हारवल्यावर स्टॅन कडून अपेक्षा वाढल्या होत्या.. पण राफा तुफान खेळला... अजिबातच चान्स दिला नाही..

हो काल सुरवातीचे २ सेट्स पाहिले. काही चान्सच दिला नाही राफा ने.

आमच्या आवडत्या क्ले कोर्टाच्या बादशहाचे अभिनंदन !!!