बेहद - सोनी टीवी वरील मालिका

Submitted by बी.एस. on 9 June, 2017 - 11:30

सोनी टीवी वर रोज रात्री 9.00 वाजता बेहद ही मालिका लागते. खरं तर मालिका सुरू होऊन बरेच महिने झालेत.. पण सुरवातीपासून ही मालिका फार आवडतेय. मी एकही एपिसोड मिस करू शकत नाही.. रोज नवीन सस्पेन्स, वेगवान घडामोडी, सर्व कलाकारांचा मस्त अभिनय.. ह्या बाबी मस्त जमून आल्या आहेत.
सर्वात बेस्ट म्हणजे माया.! अभिनय, दिसणं, अटिटयूड.. मस्त कॅरी करतेय.. तिच्या साठी हा धागा.. Happy Happy
चला तर मग इथे बेहद ची चर्चा करुया..
beyhadh 1.jpgmaya 2.jpgmaya.jpg

Group content visibility: 
Use group defaults

अरे काय हे..माय्याला अर्जून ले मारलं..पण कसं? फक्त टेबलावर डोकं आपटलं..आणि गेली पण? मग अर्जुन झोपला कसा तिथे? आणि पोलिसांना कुणी बोलावलं मग? कुछ तो गडबड हे..

@सस्मित, तुम्ही पहिल्यापासून पाहिली का.? आवडण्यासारखी आहे. नेहमीपेक्शा वेगळी..प्रत्येक भागात नवीन सस्पेन्स..
अर्थात काही अ आणि अ प्रसंग आहेत पण तेवढ चालायचचं..

आवडण्यासारखी आहे. नेहमीपेक्शा वेगळी..प्रत्येक भागात नवीन सस्पेन्स..
अर्थात काही अ आणि अ प्रसंग आहेत पण तेवढ चालायचचं... +१

बाप रे...माया इज डॉन बाबा...फुल्ल सस्पेन्स.. खरंच मेली आहे की नाही... मेली तर कसली प्लॅनिंग करून मेली...अर्जुन ला फुल अडकवून मेली... तिची आई खरंच आजारी आहे का नाटक चालू आहे... सांझला नेहेमीप्रमाणे फक्त रडणे आणि केकाटणे एवढंच काम..अयान बरा म्हणायचा...

मी तर फक्त माया ला पाहते
ती काय दिसते, तिची स्टाईल जबरीच आहे
बाकी कथेबिथेशी मला काही देणं घेणं नाही Proud

खरंच मेली आहे की नाही..सहमत.. कालच्या भागात गडबड वाटत होतीच..नवीन मेत्रिण कुठुन आली मध्येच...!
जबरदस्त प्लॅनिंग मायाचं..अगोदर वाटलं..ती स्वतःची बॉग भरते..पण त्यात अर्जुन चा पास्पोर्ट,नवीन सिम .. अर्जुनला चांगलाच अडकवला..
पण तरीही तो झोपला कसा? हे काही समजलं नाही..
युटुब प्रोमो वरून असं वाटतयं की ती परत येणार..मेली नाही..

कालच्या भागात अर्जुन मायाला मारतो तेव्हा मला तिच्या एका कानामधलं दिसलच नाही...
मायाच्या मैत्रिणीला आधीपण कोणत्या तरी सिरीयर मध्ये बघितल आहे पण आठवत नाही...

तिच्या एका कानामधलं दिसलच नाही... ते पडतं खाली. आणि पोलिस पंचनामा करताना उचलतात.
मायाने अर्जुनला सगळं सांगितलं पण हे नाही सांगितलं की समय कडून शरिरावर जबरदस्तीचे निशाण करुन घेतले आयानला अडकवण्यासाठी.
अर्जुन कसा सुटतो ते बघायचं आता.

प्रत्येक एपिसोड मध्ये नवीन काहीतरी सस्पेन्स आहे...आणि माया जबरी आहे...इन्शुरन्स पोलिसी, ती नेबर,चिट्ठी, बॅग, कपडे, पासपोर्ट तिकीट... काय लॉंग टर्म प्लॅनिंग केलंय बयेन...डेंजर आहे बॉ माया…...

काल सांझ ला पोलिसांनी पकडुन नेलं, तेव्हा तिने काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. लगेच दुस्र्या दिवशी कोर्टात लाल रंगाचा होता.
हिने जेल मधे कपडे बद्दले काय?
अर्जुन ही फ्रेश आहे. ४ दिवस झाले जेल मधे जाऊन त्याला.

माया काय जबरदस्त प्लॉनिंग करून गेली...शेअर्स नावावर नाही केले तर अर्जुन लग्न करणार नाही म्हणे..
बिचारा अर्जुन..आता काय प्रुव करणार?
मायाची आई बोलली तरच काहीतरी होईल आता..
मायाने ईतके खून केले त्याचं काय? एकही सिध्द होऊ शकला नाही..!

मेलीच नसेल...डोक्याला जखम झाली की डोक्यावरचे केस काढतात ना>>>> मी अस वाचलय की ती लीपनन्तर सन्यास घेण्यासाठी आश्रमात गेली. तिकडे ती मुन्डन करुन घेते. अर्जून आणि सान्झच लग्न झालय. माया अर्जूनकडून आपल्या खुनाचा बदला घ्यायचा ठरवते.

कान्हेरी गुन्फा मध्ये तिने नव्या लुक मध्ये शुटिन्ग (एपिसोडच शुटिन्ग) सुद्दा केल आहे.

हो ना. तिला इतक्या सुंदर रूपात बघायची सवय झाली आहे आणि आता डायरेक्ट टकलं बघायला जड जाईल..

टकल्या मायाचा फोटो पाहिला, छान नाही दिसत. >>>> घाबरु नका लोक्स, ति तिची खरी टक्कल नाहीये, तो विग आहे. हा लूक कायमचा नसणार.

अर्जुन सांझच्या कानात काहीतरी बोलला.. त्या मायाच्या डेडबॉडी मध्ये काहीतरी गडबड असणार ज्याने अर्जुन ला समजल कि ती बॉडी मायाची नाहीच

जज डेड बॉडी examine कराय्ला येतात तेव्हां आरोपी असतात बरोबर आणि नातेवाईक पण येऊ शकतात?
तो भाऊ आणि मायाची आई कशी येऊ शकली तिथे त्यावेळी?

मला काही कळलंच नाही...ती टकली दाखवली फक्त एका एपिसोड साठी ?????आणि ते पण ओझरती... आणि लगेच नेक्स्ट एपिसोड 3 मंथस लेटर ???आणि विथ केस????

Pages