गोवा पर्यटन जून महिना माहिती

Submitted by सौमित्र साळुंके on 6 June, 2017 - 03:37

नमस्कार मंडळी,

या आठवड्यात (१० ते १४) कुटुंबासोबत (ज्यात लहान मुले आहेत - वयोगट ३ त ५ वर्षे) गोव्याला (प्रथमच) जायचा विचार आहे.
शाकाहारी सदस्यसुद्धा संख्येने जास्त आहेत. या मोसमात कुठे राहणे योग्य राहील, ४-५ दिवसात कुठे भेटी देता येतील याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे. लहानग्यांची मौज होणार असेल तर बजेट लवचिक ठेवायची तयारी आहे.

कृपया मार्गदर्शन करावे.

धन्यवाद,
सौमित्र

Group content visibility: 
Use group defaults

या महिन्यात ? दोन तीन दिवसात तिथे जोरदार मान्सून सुरू होइल काही पाहता येणार नाही त्यात बरोबर मुले स्त्रिया आहेत म्हनता. हो, अगदी रोम्यांटिक कपल असते तर ठीक आहे. त्या भिजण्यात एक मझा असतो.

अहो जूनच्या पहिल्या आठवड्यात एवढा धुवांधार नसेल पाऊस , न फिरता येण्या एवढा . ज्याला आम्ही काढता ओढता म्हणजे मध्ये मध्ये पडणारा म्हणतो तसा असेल जो कुटुंबातली सगळी जण एन्जॉय करू शकतील .

फाटे फुटतील ह्याने एखादं वेळेस धाग्याला पण एरवी खंडाळा लोणावळा वैगेरे कुठे जाता येते पावसाळ्यात मुलाबाळांना घेऊन ? नुसता धांगडधिंगा चाललेला असतो . गोवा किती डिसेंट आहे . इतर ठिकाणी पावसाळ्यात जे बघायला मिळत ते गोव्याला जरा ही नसतं. म्हणून म्हणतेय जा असं.