Submitted by कबूतर on 12 April, 2017 - 03:04
नमस्कार,
मला शिवणकाम शिकायचे आहे. तर पुण्यात कोथरूड / कर्वेनगर परिसरात शिवणक्लास कोणाला माहीती आहे का? तसेच नवशिक्यांसाठी कुठले शिवणयंत्र घ्यावे ?
लहान मुलांचे कपडे शिवायला शिकायचे आहे.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
तुमचं बजेट किती आहे? अ
तुमचं बजेट किती आहे? अॅटोमॅटीक मशीन घ्यायचे असेल, तर नॉव्हेल डिझायनर अॅटोची सिरिज चांगली आहे. मी Novel Designer Auto 39 मशीन वापरले आहे, चालवायला सोपे आहे, सहज उचलता येते, त्यात साध्या टाक्यांशिवाय इतर टाकेही आहेत, ते वापरून कपड्यांवर चांगले डिझाइन करता येईल. शिवाय पिको/ बीडींग, बटण शिवणे, काजे करणे याचीही सुविधा यात आहे. त्यासाठी प्रेसर फूट बदलणे अगदी सोपे आहे, स्क्रूची गरज लागत नाही. दोन सुयांवरचे दोन धागे वापरूनही डिझाइन करण्याची यात सोय आहे, मशिन चालू केले, की शिवणाच्या जागेवर प्रकाश पाडणारा बल्ब चालू होतो. मशिनबरोबर येणार्या इतर वस्तू ठेवायला मशिनच्या आत कप्पा आहे. मशिन चालवण्यासाठी पायाने ज्या उपकरणावर प्रेस करावे लागते, त्यावर दिलेल्या कमीजास्त प्रेशरप्रमाणे मशीनचा स्पीड कमीजास्त होतो. त्यामुळे नवशिक्यांसाठी ते सोयीचे आहे. वीजेचा काही प्रॉब्लेम नसेल, तर हे मशीन चालवण्यासाठी उत्तम आहे, फक्त मशीन चालवतांना लहान मुले आसपास वावरणार नाहीत, याची काळजी घ्या. बहुधा मशीनची कंपनी पुण्याचीच आहे. आमच्या दुकानदाराने डेमो दाखवण्यासाठी माणूस घरी पाठवला होता. या मशिनच्या सीरीजचे डेमो व्हिडिओ यूट्यूबवर उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या वेबसाईटवर मशीनच्या किंमर्तीही पाहता येतील.
http://www.maayboli.com/node
http://www.maayboli.com/node/44215
दीपगृह, सोनू धन्यवाद.
दीपगृह, सोनू धन्यवाद.