Submitted by prasad inamke on 11 April, 2017 - 06:27
कथा कशी लिहावी याबद्दल काही टीपा मिळाव्या.
जसे की सुरवात कशी व्हावी इ.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कथा कशी लिहावी याबद्दल काही टीपा मिळाव्या.
जसे की सुरवात कशी व्हावी इ.
माझा प्रश्न विचित्र वाटेल पण
माझा प्रश्न विचित्र वाटेल पण सहकार्य करावे .विनंती
माझा प्रश्न विचित्र वाटेल पण
माझा प्रश्न विचित्र वाटेल पण सहकार्य करावे .विनंती
सहकार्य करावे .विनंती
सहकार्य करावे .विनंती
http://www.maayboli.com/node
http://www.maayboli.com/node/2576
ईथे बोलले तर खुप मार्गदर्शन देणारे सल्ले मिळतात
धन्यवाद अंबज्ञ
धन्यवाद अंबज्ञ
अगदी छोट्या प्रसंगावर सुद्धा
अगदी छोट्या प्रसंगावर सुद्धा कथा होऊ शकते, जस सुचेल तसं लिहून काढा, त्यासाठी आधी कागद, पेन घेऊन लिहायला सुरुवात करा.
कथेसाठी हेच नियम लागू आहेत असे नाही, पण हे नियम वापरले तर कथा लिहिणे सुकर होईल.
१. पहिल्यांदा. लघुकथा लिहिण्याचा प्रयत्न करावा.
२. साधारण ८०० शब्दापर्यंत एक छान लघु कथा लिहिता येते.
३. लघुकथेत जास्तीत जास्त तीन, कमीत कमी एक पात्र असावे, पात्रांची संख्या जास्त असल्यास, वाचणाऱ्याचा गोंधळ उडू शकतो
कथेमध्ये हे घटक असावेत,
१. कथानक (कथेत काय घडणार आहे ते)
२. भावना (कथानक घडताना, कथेतील पात्रांना काय वाटले, त्यांच्या मनातील घालमेल, ते कसे व्यक्त झाले, हे सर्व)
३. कथानक = भावना, नुसत्या भावना लिहून काही उपयोग होत नाही किंवा नुसते कथानक लिहून अपेक्षित परिणाम साधता येत नाही, त्यामुळे या दोन्ही बाजू एकाच प्रमाणात ठेवण्याचा प्रयत्न करावा.
४. जमल्यास शेवटी कथेला अनपेक्षित वळण (ट्विस्ट) देण्याचा प्रयत्न करावा.
धन्यवाद अनुराधा दिदि
धन्यवाद अनुराधा दिदि
सर्च मधे हा धागा मिळाला. डीप
सर्च मधे हा धागा मिळाला. डीप सर्च देण्याइतकी मायबोली अजून जमत नाही.
हा धागा मला जे सांगायचंय त्या साठी योग्य आहे का हा प्रश्न आहे पण नेहमीप्रमाणे बिनचूक धागा मिळत नाहीये. तर असो.
मला स्वतःला लेखिका म्हणवून घेणं पसंत नाही. कारण हौशी लिखाण आणि त्याला प्रोत्साहन पर प्रतिसाद असा हा कार्यक्रम आहे. गणेशोत्सवात आपल्या कॉलनीतली मुलं गाणं गातात तेव्हां नाही का त्यांचं कौतुक होत तसं. त्यामुळं आपण लेखक झालोय असा समज करून घेऊन ताण पण घेत नाही.
पण कुठे तरी पहिलटकरणीच्याच भूमिकेत कसं रहावं ? इयत्ता पण वाढली पाहिजे किमान वाढलेली दिसायला नको का असं वाटतं.
हल्ली काही लिहीण्यापेक्षा अशा प्रश्नांच्या गुंत्यातच पडायला होतं.
कथेचा घाट कसा असावा हा एक यक्षप्रश्न. नेहमीच्या सरधोपट पद्धतीने कथा रचणे हा सेफ गेम असतो. निवेदनाच्या रूपाचा घाट वापरून झालाय. टिपीकल पात्र परिचय,ओळख, प्रस्तावना हा फॉर्म लिहायला च कंटाळा येत असेल तर मग वाचकाचं काय होत असेल ?
तसेच कथेत डिटेलिंग असावं, पण ते अनावश्यक आहे हे लेखकाने कसं ओळखावं ? हा पण प्रश्न पडत असतो.
वाचकांच्या समोर जायच्या आधी हे संपादन करता यायला हवं कि एकदा सादर केल्यावर सुद्धा संपादित केलं तर चालेल ?
मी अजूनही जुन्या लेखकांशीच एकनिष्ठ आहे. पण अधून मधून मॉडर्न लेखक वाचले कि घाट, शैली मधे झालेले बदल ठळक होतात. जुन्या लेखकांवर प्रेम आहेच, पण त्यांचं गारूड असेल तरी त्या प्रभावाखाली लिखाण नसावं असं वाटतं.
फेसबुकवर अनेक सशक्त लोकांना वाचलंय. थेट आणि परखड लिखाणाची भुरळ पडते. पण अशी भुरळ पडून आपण जसे आहोत त्यापेक्षा वेगळं लिहावं कि नको हा प्रश्न अनेकदा सतावतो.
लिहीताना अनेक गोष्टी डोक्यात घोंघावतात. मग त्याच्या छोट्या छोट्या कथा करून त्या काढून टाकाव्यात का ? म्हणजे मूळ कथा वेगळी राहील. कि यातल्या अनेक गोष्टी गुंफत नेत शेवटी समेवर यावं हा नेहमी छळणारा प्रश्न.
देणाऱ्याने देत जावे तसे
देणाऱ्याने देत जावे तसे लिहीणाऱ्याने लिहित जावे हेच उत्तम. पब्लिश करावे की नाही हे ठरवणे वेगळा भाग झाला पण मनातील भावनांचा, विचारांचा योग्य वेळी आणि वेळच्या वेळी निचरा होत गेला की कल्लोळ आटोक्यात ठेवणे सोपे जाते.
राभु तुम्ही चांगल्या कथा
राभु तुम्ही चांगल्या कथा लिहिलेल्या आहेत. इथल्या कथालेखकांशी चर्चा करुन तंत्र सुधारता येईल्/जाणुन घेता येईल. गझलेबाबत एक कार्यशाळा झाली होती, कथेबाबत तसे काही आठवत नाही. तुम्ही बेगळा धागा काढुन चर्चा सुरु करु शकता किंवा गणपती उत्सवादरम्यान तसे काही करता येईल का
याबाबत संयोजक मंडळाशी संपर्क करुन विचारणा करु शकता.
फेसबुकवर बहुतेक लोक जराशी सुरवात करुन फ्लॅशबॅक सुरु करतात. शब्दबंबाळ लिहितात, परिच्छेद पाडायचे तर माहितच नसते. मी हल्ली वाचायचे सोडुन दिलेय. चांगले लिहिणारे आहेतच पण मला नावे माहित नाहीत, कुठे शोधायचे माहित नाही. कधी चुकुन चांगले सापडते त्यासाठी ढिगाने कचरा उकरत कोण बसणार?
कथेत एकच फोकस असावा असे मला वाटते. सबप्लॉटिंग खुप झाले तर सरळ कादंबरी लिहावी. कथेत खुप गोष्टी एकत्र आल्या तर भाई केहना क्या चाहते हो सारखे वाटते.
इथल्या कथालेखकांशी चर्चा करुन
इथल्या कथालेखकांशी चर्चा करुन तंत्र सुधारता येईल्/जाणुन घेता येईल. >>> नक्कीच. चांगली सूचना आहे.
गझलेबाबत एक कार्यशाळा झाली होती, कथेबाबत तसे काही आठवत नाही. किंवा गणपती उत्सवादरम्यान तसे काही करता येईल का
याबाबत संयोजक मंडळाशी संपर्क करुन विचारणा करु शकता. >>> भन्नाट कल्पना आहे. त्या उत्सवी वातावरणात चटकन प्रतिसाद येतील असे उपक्रम राबवण्यावर आणि जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेण्यावर भर असतो. मराठी दिवस च्या वेळी मात्र तुमच्या या सूचनेचा संयोजकांनी विचार करावा असं मलाही वाटतं.
कथेत एकच फोकस असावा असे मला वाटते. सबप्लॉटिंग खुप झाले तर सरळ कादंबरी लिहावी. कथेत खुप गोष्टी एकत्र आल्या तर भाई केहना क्या चाहते हो सारखे वाटते. >>> महत्वाचा फीडबॅक आहे हा. असे फीडबॅक मिळण्यासाठी अधून मधून या प्रकारचे उपक्रम असावेत हे खरंच पटलं.
या विषयावरच्या अधिकारी व्यक्तींनी, प्रकाशन व्यवसायातल्या अनुभवी व्यक्तींनी धागा काढावा. तेव्हढा अनुभव, अधिकार नसताना धागा सुरू करणे बरोबर होणार नाही असं वाटतं. फक्त धागा काढून नंतर सहभाग नोंदवता आला नाही, चर्चेत व्हॅल्यू अॅडीशन करता आली नाही तर ते वाईट दिसेल.
मला जे वाचायला आवडेल ते आणि
मला जे वाचायला आवडेल ते आणि तशा प्रकारे मी लिहितो.
शक्यतो संवादाने कथा सुरू करतो. म्हणजे मग वाचक त्या कथेमध्ये ओढला जातो आणि कथा वाचून पूर्ण करण्याची शक्यता वाढते. ज्याप्रमाणे नेटफ्लिक्स ची स्पर्धा आपल्या झोपेशी आहे त्याप्रमाणे लेखकांची स्पर्धा ही instagram च्या रील्स बरोबर आहे. त्यामुळे वाचकाला कुठेही बोर होणार नाही, कंटाळा येणार नाही असे लिहावे लागते.
त्यासाठी सोपे शब्द, छोटी वाक्ये, छोटे परिच्छेद, भरपूर संवाद या गोष्टी कथेत टाकता येतील.
इंग्रजीमध्ये "शो, डोन्ट टेल" हा लेखनाचा एक नियम आहे. म्हणजे असे घडत होते तसे घडले अशाप्रकारे न लिहिता संवादाचा व कृतींचा वापर करून काय घडले ते वाचकांच्या डोळ्यासमोर निर्माण करावे. हा या नियमाचा मला उमगलेला अर्थ.
माबो वाचक , तुमची प्रोसेस आणि
माबो वाचक , तुमची प्रोसेस आणि त्यामागची थॉट प्रोसेस आवडली. रिस्पेक्ट आहे.
इन्स्टाग्रामशी स्पर्धा याच्याशी सहमत आहेही आणि नाहीही. कारण लेखन आणि वाचन हा वेगळाच प्रांत आहे असं माझं मत. इन्स्टाशी स्पर्धा ही त्याच माध्यमातून होईल, म्हणजे दृकश्राव्य. वाचनाची गोडी असलेले आहेत तोपर्यंत माध्यमांतराचं दडपण घेऊ नये. याबाबतीत जागतिक फोरम वर चाललेल्या चर्चा पण उद्बोधक असतात. वाचकांच्या आवडीप्रमाणे लेखकाने लिहावे कि स्वतःला आनंद देणारे याबद्दल एकाच थ्रेडवर मतमतांतरे आढळतात. वाचकाला ओढून घेणारे असे लिखाण सुहास शिरवळकर यांच्या सारखे लेखक करत. त्या वेळी ते तरूणाईचे आवडते लेखक बनले. पण आज त्यांचे लिखाण वाचताना अनेक गोष्टी जाणवतात. अर्थात हे माझे मत आहे.
तुम्ही स्वतःला आवडेल तेच हे जे म्हटलेय ते खूप महत्वाचे आहे.