लग्न जमवताना काय काय करावे

Submitted by वेडोबा on 18 March, 2017 - 16:08

माझ्या बहिणीसाठी वरसंशोधन सुरू करायचे आहे . काही बेसिक प्रश्न म्हणजे biodata कसा लिहावा. कोणत्या वधुवर सूचक मंडळात नाव नोंदवावे. matrimonial sites चा काही फायदा होतो का किंवा त्यावर नाव नोंदवावे की एखाद्या मंडळात..आणि एकूणच सुरवात कुठून करावी...कृपया सल्ला द्यावा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ मी मिनु
सर्वप्रथम आपले मनापासुन आभार हा धागा काढल्याबद्दल....
मलाही याबद्दल माहिति हविच होती...

matrimonial sites वर बरेच timepass साठी हि आलेले असतात असा मा़झा व्यक्तिगत प्रथम अनुभव आहे,(अशा लोकांना facebook & dating sites वर जायला काय होत? असे वाटुन डोके फिरते कधी कधी..) पण चांगले लोक ही असतात तिथे हे बरे आहे....

मला वाटते कि, जे लोक matrimonial sites वर community/region, age & other expectation या बाबी काडिमात्र जुळत नसताना,आपला फोटो, डिटेल्स दिले नसताना दे़खिल interest पाठवतात ते नक्किच fraud अस्तात किंवा timepass करायला आलेले असतात...

हा किळसवाणा अनुभव घेण्यासाठी एक प्रोफिले काढुन बघा .. फोटो टाकु नका.. अजिबात डिटेल्स टाकु नका... किति interest येतात ते पाहा... personal msg तर कळस असतो... २ दिवसा नंतर ते प्रो डिलेट करा... निट विचार करुन नंतर गरज वाटल्यास खरे प्रो टाका...
मला आलेल्या अनुभवातुन मी हे लिहित आहे...

रघुनाथन ह्यांनी सांगितलेली आईडिया खरेच वापर करा मीनूजी नाहीतर खुप मनस्ताप सहन करावा लागतो बऱ्याचदा मुलींच्या प्रोफाईलला. कारण सोशल साईट प्रमाणे इकडे मेट्रिमोनियल साईटवरती सुद्धा ह्या प्रकारच्या विकृती हल्ली वाढीस लागल्या आहेत.

मी त्यात थोड़ी अधिक काळजी घेण्यासम्बधी सुचवेन की कृपया आपला स्वतःचा मोबाईल आणि ईमेल चुकूनसुद्धा त्या नंतरच्या खऱ्या प्रोफाइलमध्ये देवू नका. आई वडील किंवा भावाचा असे शक्यतो दया.

रघुनाथन अंबज्ञ सुजा तिघंचेही धन्यवाद। प्रो मधे फोटो टाकला नाही तरी पन बरेच मेसेज आलेत। बट आता नाही टाकणार प्रो।। मंडळात नाव नोंदवायचे असेल तर अपेक्षा काय लिहाव्या। कसा फॉर्म भरावा काहीच माहीत नाहीये

@मी मिनु
मंडळात नाव नोंदवायच्या अगोदर त्यान्चे चार्जेस विचारुन घ्या,
कारण .........
मागे आम्हि एका मेंबर चे नाव एका कोल्हापुर येथे मुळ रजिस्टर्ड असलेल्या विवाह मंडळात नाव नोंदायला गेलो होतो, त्यांचि फि भरल्या नंतर सहज म्हनुन विचारले तुमची मदत कशि होते, बाकी चार्जेस नाहित ना? तर ति बाई म्हनालि आम्हि बघायचा कार्यक्रम करण्यास मदत करति, एथे दाखवन्याची सोय आहे, तसेच तुमचे परस्पर ठरले तरी आम्ही पैसे मागत नाही, पन तुम्हि एक खुषाली म्हनुन फक्त ७०- ८० हजार आम्हाला द्यायचे, बाकि मंडळे ला़ख-दिडलाख घेतात.... आम्हि पैसे मागत नाहि तुमच्या इच्छेला येतिल तेव्हडे द्या (७०-८० हजार), आमच्या इथे जेवढि लग्ने थरलि त्यांच्या कडे आम्ही कधिच ला़खाच्यावर पैसे पाहिजेच असा हट्ट धरला नाहि, असे ति बाई मोठा उपकार केयाचा चेहर्यावर भाव आनुन सांगत होती...
फॉर्म भरायला तिथले लोक मदत करतिल, कारन त्यांना पैसा मिळानार असतो.. Lol

याबाबतीत बरेच आणि चांगलेवाइट अनुभव लोकांस आलेले आहेत तरीही या दिव्यातून (प्रेमविवाह,मागणी नसल्यास) जावेच लागते. मंडळातले लोक सामान्यत: मदत करतात. प्रथम तुमच्या फॅार्ममधिल माहितीप्रमाणे ती वेगवेगळ्या फाइलीत ठेवतात. १) उंची २)वय ३)शिक्षण ४) आर्थिक स्थिती. नंतर ५) अपेक्षा हा मुद्दा मुला/मुलीने अगदी प्रामाणिकपणे लिहिला तर स्थळ लवकर मिळते. उदा० अमुकएक शहरातच हवे/ परदेश जाण्याची तयारी/ सैन्यातला-बोटिवरचा-फिरतीची नोकरी असणारा नवरा चालेल का वगैरे.

एका मुलीने स्वत:च फॅार्म भरून अपेक्षा -जगात कुठेही जायची तयारी,लिहिलेलं. मुलाने स्थळाच्या फॅार्मसमधून फक्त अपेक्षाच वाचल्या आणि हिला सिलेक्ट केले.

पत्रिका पाहणे महत्त्वाचे नसते. आयुष्यात पुढे काय होणार ते कोणीच सांगू शकत नाही.

{{{फॉर्म भरायला तिथले लोक मदत करतिल, कारन त्यांना पैसा मिळानार असतो.. Lol
Submitted by रघुनाथन on 25 March, 2017 - 11:06 }}}

काय भयंकर मराठी लिहिलंय. अशा भाषेत तुम्ही फॉर्म भरणार असाल तर तो दुरुस्त करायला खरंच दंड म्हणून तुमच्याकडून ७० / ८० हजार वसूल करुन ते मराठी भाषा सुधार समितीला देणगी दिले पाहिजेत.

<<मराठी भाषा सुधार समिती>>
हो, असे काहीतरी पाहिजेच. आफ्टर ऑल, मराथी म्हणजे आपली मदरटंगच!
आमच्या कडे मराठी भाषा सुधार च्या बैठकीत असेच ठरले की वी मस्ट, म्हणजे, स्पीक इन मराथि ओन्ली!

एकूणच सुरवात कुठून करावी...कृपया सल्ला द्यावा.. >> सल्ला म्हणुन नाही पण जसे आपण बाजारात जातांना आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंची यादी बनवून नेतो तसेच लग्न आणि जोडीदाराला बद्दल आपल्या अपेक्षा कागदावर उतरवून त्या अपेक्षांची priority सेट केल्यास पुढचे काम थोडे सोपे होईल. आपल्याला काय हवे आहे आणि काय नाही हे आपल्या मनात 100 टक्के फिट असेल तर निवड प्रक्रिया सोपी होईल असे वाटते.
शुभेच्छा.