मराठी नाटक बसवायचे आहे

Submitted by राम्या on 10 March, 2017 - 12:36

महाराष्ट्र मंडळ/ स्थानिक कार्यक्रमामधे - विनोदि, सामाजीक विषया मराठी नाटक बसवायचा विचार आहे. त्या संदर्भात नाटके , लेखन कुठे मिळेल?
कलाकार हौशी मंडळीच असतील - त्या मुळे विषय आणि लेखन हलके फुलके असावे.

आभारी आहे !!!
राम्या

Group content visibility: 
Use group defaults

२०१० - २०११ च्या सुमारास लिहिलेले चालणार असेल तर मी लिहिलेले एक आहे, १ तासाचे, विषय तुम्हाला हवा तसा सामाजिकच आहे पण नाटक विनोदी \ ब्लॅक कॉमेडी ( म्हणजे प्रयत्न तरी तसा होता) . २०११ मध्ये फ्लोरिडातील ३ -४ जवळच्या गावातल्या मराठी मंडळांच्या कार्यक्रमात ते केले होते. तुम्हाला interest असल्यास संपर्क साधा

विनोदी आणि सामाजिक विषयाशी संबंधित पाहिजे असली तर आचार्य अत्र्यांची असायची . अर्थात ती फार जुनी झाली म्हणा . नवीन पाहिजे असतील तर प्रशांत दामले यांची आहेत पण सामाजिक विषयाची संबंधित नसावीत . जास्त माहित नाही . पण खळखळून हसवणारी मात्र आहेत Happy

नमस्कार @वाट्टेल ते - प्रतिसाद द्यायला थोडा उशीर झाला - माफ करा.
१ तासाच नाटक कदाचित मोठे होईल - पण तुमचा कॉपी राईट वगैरे असे बंधन नसेल तर मी काही बदल करून बसवू शकतो. बाकी केवळ हौस म्हणून करायचा आहे त्यामुळे उपलब्ध कलाकार पाहून बदल करेन.
आपली हरकत नसेल तर वैयक्तिक ई-मेल id वि पु करेन

पुनश्च धन्यवाद

सुजा - प्रतिसाद बद्दल धन्यवाद

असेल तर पाठवा. वाचून ठरवता येईल. आणि हो..लेखकाची परवानगी आहे/कशी घ्यायची ते कळवा, आणि मानधन अपेक्षित असेल तर तेही..

@ विनिता - असेल तर वि पु वर पाठवा.
@ सीमा : प्रश्न मला असेल तर - शक्यतो विनोदी असलेले बरे, सामाजिक प्रश्न काळ आणि स्थान या नुसार बदलतात (शक्यतो) त्या मुळे रेलेव्हन्स राहत नाही आणि लिंक हि लागत नाही (माझे मत)
नाटक कधी आणि कोण कोण बसवणार हे अजून ठरते आहे - त्या मुळे पात्र संख्या कमी असली तरी चालेल

लेखकाची परवानगी आहे/कशी घ्यायची ते कळवा. प्रयोग केवळ मनोरंजनासाठी व हौसे साठी (छोट्या ग्रुप पुरता मर्यादित) करायचा आहे - त्या मुळे मानधनाची अपेक्षा असलेले नाट्य सध्या नको. (माफ करा स्पष्ट वाटले असेल तर). पण लेखकाला उचित प्रसिद्धी देऊ.
दिवाळी इव्हेंट/मोठा शो करण्या पर्यंतची तयारी झाल्यास आणि पुढे चमू जमल्यास नक्क्कीच मोठी नाटके उपयोगी पडतील.

धन्यवाद