चष्मा घालवण्यासाठी सुचवा

Submitted by BH on 7 March, 2017 - 00:49

माझी मोठी मुलगी 8 वर्षाची आहे. तीला दोन वर्षापासुन चष्मा आहे..ती 1-2 च भाज्या खाते...सुका मेवा , काहीच खात नाही...क्रुपया मला रेसेपी व इतर माहीती सुचवा

Group content visibility: 
Use group defaults

खाण्यापिण्याने चष्मा जातो का हे माहित नाही. (गाजरे डोळ्यासाठी चांगली असतात असे वाचले आहे). डोळे दिवसांतुन ६/७ वेळा गार पाण्याने धुणे, योगासनांतील डोळ्यांचे व्यायाम करणे हे जनरली डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण ८ वर्षांची मुलगी हे काही करणार नाही. चष्म्याचा काँप्लेक्स देवु नका तिला. मोठी झाल्यावर लेन्सचा पर्याय आहेच की. आणी काही काही लोकांना चष्मा मस्त सुटही होतो.

माझ्या दोन्ही मुलांना चश्मा आहे. डॉक्टर म्हणतात की नवर्‍याला आहे - ते मुलांमध्ये आलय. त्याला काही करता येत नाही. टी. व्ही मुळे चश्मा लागतो असे काही नाही असे त्यांचे म्हणणे आहे. गाजर वगैरे खाऊन जाणार पण नाही हे ही सांगितले आहे. अर्थात चांगले, सकस खावेच पण त्यामुळे चश्मा जाणार नाही इतकेच.

गुमान चष्मा लावा. गाजरं आणि सुकामेवा खाऊन चष्मा जात नाही.
चष्मा हरवणे आणि मग शोधणे किंवा फोडण्याबाबत नक्की मदत करू शकतो.

चष्मा वापरण्याबाबत तूम्ही कॉम्प्लेक्स घेऊ नका आणि मुलीलाही देऊ नका.
डोळ्यांची काळजी घ्याच, त्यासाठी डोळ्याचे व्यायाम असतात. योग्य तो आहारही पाहिजेच.
त्याशिवाय आणखी नंबर वाढणार नाही यासाठी काळजी घ्या. जास्त टीव्ही बघणे, अंधारात वाचणे वगैरे टाळा थोडक्यात डोळ्यांना ताण येईल असे काहिही करु देऊ नका. नियमितपणे डोळ्यांच्या तज्ञ डॉक्टरांना दाखवा ( फक्त चष्मेवाल्याकडून नंबर काढून घेऊ नका ) ते योग्य तो सल्ला देतील, गरज असेल तर औषधेही देतील.