एअर चायना मुंबई ते बीजिंग ते सॅन फ्रॅन्सिस्को

Submitted by रेव्यु on 15 February, 2017 - 04:33

आम्ही दोघे हा प्रवास एअर चायनाने करू इच्छितो.
कारण एकच ... भाडे स्वस्त आहे. इतर एअर लाईन्स ७० ते ९० हजार रिटर्न आहेत तर ही एअर लाईन ५७ हजार आहे ( प्रति प्रवासी).... ट्रिअअ‍ॅडव्हायजर वर विरोधाभासी मते आहेत. कुणाला अनुभव असल्यास लिहा.... हाच प्रवास नाही तर कोणताही चालेल फक्त या एअर लाईनेले केलेला असावा.
लौकर कळवल्यास मदत होईल.
वेळ साधारण ले ओव्हर धरून २२-२३ तास... सामान्य आहे.
धन्यवाद

Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://www.airlinequality.com/airline-reviews/air-china/
http://www.airlineratings.com/passenger-reviews/59/air-china

इथले रिव्ह्यूज पण वाचा. लांबच्या प्रवासात त्रास होऊ शकतो, छोट्या प्रवासात आपण अडजस्ट करू शकतो. पण जर तिकिटदर हाच निकष असेल, तर मग काही काळजी घ्या. ( जास्तीचे पैसे, खाणे जवळ ठेवा. )

दिनेश जी ... धन्यवाद... लिन्क्स वाचून धक्का बसला अन कॅथे पॅसिफिक बुक केले... ६४००० ला....त्यांचे रिव्ह्युस उत्तम आहेत!!

कॅथे उत्तमच आहे. ( पण बॅगेज अलाऊंस एकदा परत चेक करून घ्या. त्यांनी एकदा हटवादीपणा केला होता. केबिन लगेज पण टोटल वजनात धरले होते. साईटवर तसे नाही तरी आयत्यावेळी अडवले. कार्ड स्वॅपिंग पण बंद होते त्यांचे, ऐनवेळी धावाधाव करुन रोख रक्कम भरावी लागली होती. माझ्या पुतण्याचा अनुभव आहे हा. ) हॅप्पी जर्नी !

दिनेशदा बरोबर ......baggage चेक करुन घ्या... खुप त्रास झाला आम्हाला पण ह्या वेळी ..

Baggage Policy
BOMSFO
UPTO50LB 23KG AND62LI 158LCMOR MUSICAL INSTRUMENT UP TO
100CMOR DUFFEL BAG B4 BAG SEA BAGOR SLEEPING BAG
1st Checked Bag: Free of Charge
UPTO50LB 23KG AND62LI 158LCMOR MUSICAL INSTRUMENT UP TO
100CMOR DUFFEL BAG B4 BAG SEA BAGOR SLEEPING BAG
2nd Checked Bag: Free of Charge
UPTO50LB 23KG AND62LI 158LCMOR MUSICAL INSTRUMENT UP TO
100CMOR DUFFEL BAG B4 BAG SEA BAGOR SLEEPING BAG

मग ठिक आहे.. हॅपी जर्नी.. ( तूमच्या जेवणाच्या स्पेशल गरजा असतील तर त्याही नोंदवून ठेवा, कॅथे जे जेवण छान असते. )

वर २३ किलो गुणिले २ आणि ७ किलो गुणिले १ आणि एक लहान बॅग म्हणताहेत... विश्वास ठेवायचा का? >>> रेव्यु, यात गोंधळ झालाच तर तो एक कॅरी ऑन व आणखी वरती एक लॅपटॉप सारखी बॅग -हे दोन्ही आणू देतील का यावरच असतो. पण तो ही सहसा होत नाही. एखाद्या ग्राउण्ड स्टाफला नियम माहीत नसेल तर कदाचित होऊ शकेल. त्याकरता प्रिण्ट जवळ असणे कधीही सेफ.

पण एकूण कॅथे अतिशय चांगली एअरलाइन आहे. मी एकदा गेलो आहे व इतर मित्र असंख्य वेळा गेलेले आहेत. खूप चांगले अनुभव आहेत.