या गप्पा मारायला...

Submitted by संदिप एस. on 23 January, 2017 - 10:16

तुमचे आवडते लेखक कोण व का?

मराठी, हिंदी, इंग्लीश पैकी कोणती पुस्तके, कांदबऱ्या इ. तुम्हाला आवडतात?

मला रेफरन्स द्याल का?

हल्लीच मी नविन माबोला जोडलो गेलो आहे. जबरदस्त साईट आहे ही.. पण अजुन कोणाशीही इतकीशी ओळख झाली नाही. आपल्याशी गप्पा मारुन मला ह्या साईट वर काय वाचण्यासारखं आहे त्याची माहीती मिळवता येईल...

Group content visibility: 
Use group defaults

मराठीतले पु ल देशपांडे माझ्या आवडीचे लेखक आहेत. माबोवर खुप जणांची कथा वाचली पण बेफिकिर ह्यांची लेखन शैली मला फारच आवडली. त्यांच्या बऱ्याच कथा फारच मनोरंजक व कथानकातील पात्र जिवंत करणाऱ्या आहेत.

हिंदी मधे मी खास अशी कोणाची पुस्तकं वाचली नाहीत.

पण इंग्लीश मधे जे के रोलींग, जी नोर्मन लिबर्ट, रिक रिओर्डेन असे अनेक लेखक आहेत...

जे. के. रोलिंग याचे हॅरी पाॅटर सिरीज..
जी लिबर्ट यांची जेम्स पाॅटर सिरिज...
रिक रिओर्डन यांची पर्सी जॅकसन सिरीज, मॅग्नस चेस सिरिज, गाॅड आॅफ इजिप्त क्रेन क्रोनिकल सिरिज... अजून खुप काही....

गुगलवर शोधून बघा सापडेल....

त्या आधी तुम्ही काय काय वाचलंय ते सांगाल का म्हणजे सुचवायला सोप्पं पडेल..

प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते त्यानुसार पुस्तकांची लिस्ट मिळाली तर किती छान वाटतं

बेफिंचं सगळंच लेखन छान आहे. घर, श्रीनिवास..., ओल्ड मंक..., २०३ बुधवार पेठ, सोसेस्कँ, सावट, ईई.
पण त्यात माझी आवडती कादंबरी 'द वर्ल्ड ऑफ डिफरन्स'

बेफिंचं सगळंच लेखन छान आहे.>>> कोणतीही वाचा कादंबरी सगळ्याच सुंदर पुन्हा पुन्हा वाचन्यासारख्या.

रिया...मी आधी विनोदी, थरारक, साहकथा अशा प्रकारचे साहित्य वाचले आहे. त्यात अनेक हिंदी मराठी आणि इंग्लिश पुस्तकंही आहेत.

बेफिकीर ह्या लेखकाच्या कथा मला कुठे वाचायला भेटतील?

विनोदी, थरारक, साहकथा
>>>
हा तुमचा इंटरेस्ट असेल तर असेल तर मी सजेस्ट करेन माबोवर विशाल कुलकर्णी, कौतुक शिरोडकर आणि कवठीचाफा याचं लेखन वाचुन काढा.. अजिबात निराशा होणार नाही

बोका- कव्वा दाद देईल वाचली. मस्त वाटली...हसुन हसुन मज्जा आली...खरच बेफिकीर यांच लेखन खुपच छान आहे.