death cum retirement gratuity आणि इतर लाभ

Submitted by गुलबकावली on 4 January, 2017 - 05:29

क्ष व्यक्तीचे निधन एप्रिल २०१६ ला झालेय. ती व्यक्ती व्यवसायाने शिक्षक होती. नोकरीचे डिटेल्स खालील प्रमाणे :

अर्धवेळ शि़क्षण सेवक : १३/०६/२००५ ते ३०/११/२००८
पूर्णवेळ शि़क्षण सेवक : ०१/१२/२००८ ते २८/०२/२०१०
सहाय्यक शि़क्षण नियुक्ती : ०१/०३/२०१० ते २३/०४/२०१६

तर सदर व्यक्तीच्या वारसांना सेवा लाभ मिळतील का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जर त्या तिसर्‍या नोकरीत पगारातून पी एफ जात असेल तर त्याला जे नॉमिनेशन लावले असेल त्याला ते मिळेल.

तिनहि कालावधी एकाच शाळेत नोकरी केल्याचे आहेत.
नॉमिनेशनचे विचारायला सांगते.

खरतर शाळा म्हणतेय २००५ च्या नियमाप्रमाणे त्यांची नोकरी १० वर्षापेक्षा कमी होतेय त्यामुळे काहिच मिळणार नाहि.

हो . काहीच मिळणार नाही. पण पी एफ त्यांच्या स्वतःच्याच पगारातून गेला असेल तर तो व्याजासकट मिळेल. पगारपत्र्क मागा, त्यात डिटेल्स असतात. एक अकाउंट नंबरही असु शकेल.