नवोदीत कथा/ललित लेखक

Submitted by अॅमी on 1 January, 2017 - 21:21

'सिर्फ नामही काफी है' धाग्यावरील साती आणि अमाच्या प्रतिसादांवरुन या धाग्याची कल्पना सुचली. त्याबद्दल त्यांचे आभार.

* गेल्या अडीच वर्षात (अडीचच का ते 'त्या' धाग्यावर सांगितले आहे ;-)) मराठी आंजाला लाभलेले उत्कृष्ठ कथा/ललित लेखक कोणकोणते आहेत हे जाणून घेण्यासाठी हा धागा.

* या धाग्याचा मुळ उद्देश कौल नसून यादी बनवणे हा आहे. एखादा नवीन आयडी काय वाचू विचारत आला की त्याला या धाग्याची लिंक द्यायची.

* पण जास्त लोकप्रिय लेखक कोणते हे जाणून घ्यायलादेखील आवडेल. त्यामुळे तुमच्या आवडत्या सगळ्या लेखकांना Vote up करा.

* केवळ कथा आणि ललित या लेखन प्रकाराचाच इथे विचार केला जावा.

* कविता, प्रवासवर्णन, धार्मिक, विडंबन, भाषांतर, समिक्षा, माहिती इ. लिहणार्या लेखकांना यातून वगळावे.

* फार जुनी+सध्या फारशी अॅक्टीव नसलेली नावं नकोत. तसेच वर्षातून एखाद दुसरा धागा टाकणारे, मोबदला घेऊन लिहणारे लेखक नको. नवीन सदस्य किंवा नवीनच अॅक्टीव झालेले सदस्य हवेत.

* माबो, मिपा, ऐसी या तीन साइट्सच्या माझ्या अल्प अभ्यासावरुन मी काही नावं, त्यांच्या लेखनाची लिंक खाली प्रतिसादात दिली आहे.

* त्याखेरीज इतर नावंदेखील सुचवा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users