खरेखुरे नाते

Submitted by नीत्सुश on 23 December, 2016 - 05:36

एका शापित क्शणी एखादी शन्का मनात रुजते
मनातीलच अद्रुश्य भिती तिला खतपाणी घालते
शक्याशक्यतान्च्या खेळात त्या शन्केचा वट्व्रुक्श बनतो
मनोराज्यात चाललेल्या या खेळाचा आपल्याला पत्ताच नसतो..

कधीतरी एखाद्या गाफील क्शणी आपल्याकडून एखादा वाक्ग्बाण सुटतो
तेव्हा खरतर तो मनोराज्यातल्या खेळाचा केवळ एक सन्वाद असतो
आणी प्रत्यक्शात -
प्रत्यक्शात घडणारा आणखी एक वितन्द्डवाद असतो..

असे कितीतरी वाद सन्वाद आणी वितन्द्डवाद लढले
प्रत्येक नात्याने असे अगणित वार झेलले
त्यातून तावून सुलाखून जे जिवन्त राहिले
तेच अन तेवढेच तुझे नि माझे खरेखुरे नाते उरले
तुझे नि माझे खरेखुरे नाते उरले...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users