कॅमारिलो -los angeles अधिक माहिती हवी आहे!

Submitted by प्राजक्ता on 13 December, 2016 - 10:28

माझी एक मैत्रीण एलए जवळ कॅमारिलो ला मुव्ह होण्याच्या विचारात आहे, मी आधी कॅलिला होते पण साउथ कॅलीची माहिती नाही फारशी, तेव्हा जाणकारानी या भागातल्या शाळा, देसि कम्युनिटी, महागाई, रेन्टल अपार्ट्मेन्ट वर अजुन प्रकाश टाका.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे एल ए च कुणि नाही का? जी या एरियाची माहिती देवु शकेल? थाउजन्ड ओक, कॅमारिलो दोन्ही प्रायमिरिमधे माहिती हवी आहे?
दोन्ही महाग आहेत म्हण्जे किती आहे अपार्ट्मेन्ट रेन्ट?

हाय प्राजक्ता..मी ५ वर्षांपूर्वी कॅमरिओमध्ये राहायचे. छान शांत गाव आहे. आमचे एक बेडरूम अपार्टमेंटचे रेंट ११०० होते व २ चे १३००. पण आमच्या अपार्टमेंटमध्ये एसी नव्हता. एसी असणारी अपार्टमेंट्स बघायची तर थोडी महाग असतील. पण आम्हाला एसीची जरूरी भासली नाही. कॅमरिओ थंड आहे इतर व्हॅलीच्या मानाने. कॅमरिओ बरंचसं पेन्शनरांचे गाव म्हणता येईल इतके शांत आहे. तसेच कॉस्को, वॉलमार्ट किंवा इंडियन ग्रोसरीची दुकानं कॅमरिओत नाही आहेत. पण ऑक्सनार्ड म्हणून अगदी जवळच ५ मिनिटावर गाव आहे तिथे वॉलमार्ट कॉस्को आहेत. इंडिय्न ग्रोसरी ला आम्ही थाउजंड ओक्स ला जायचो. किंवा जरा लांब टोपांगा ला इंडिया स्वीट्स अन स्पायसेस ला. नंतर आम्हाला सिमि व्हॅलीतील व्हॅली प्रोड्युस मार्केत्चा (आता व्हॅली मार्केटप्लेस.) शोध लागला तिथे बरंच इंडियन मिळते व स्वस्त आहे. सिमि व्हॅलीत अजुन एक इंडियन स्टोअर आहे इंडियन हवेली म्हणून.
कॅमरिओ मध्ये आम्ही होतो तेव्ह २ इंडियन रेस्टॉ होती. पैकी करीलीफ फार सुरेख आहे. तसेच कॅमरिओतील थाई रेस्टॉ आम्हाला खूप आवडतात. कॅमरिओतील शाळांबद्दल मला नक्की माहिती नाही कारण मला तेव्हा जरूरी नव्हती. पण थाउजंड ओक्सचे स्कुल डिस्ट्रिक्ट(कनेहो व्हॅली स्कूल्डिस्ट्रीक्ट) अत्यंत चांगले आहे. थाउजंड ओक्स हा एरिआ खूप सुंदर आहे, महाग आहे जरा. पण इट इज वन ऑफ द सेफेस्ट सिटी इन युएसए. कॅमरिओ पेक्षा थाउअजंड ओक्स एलेपासून जवळ आहे. पण टीओपासून १०१ च घ्यावा लागतो ज्याचे ट्रॅफिक अतोनात असते. सिमि व्हॅलीमध्ये राहयचे ठरव्ले तर ११८ घेता येतो जो जास्त सोयीचा पडतो. कॅमरिओपासून मालिबू व सॅन्ता बार्बरा ही ठिकाणं, समुद्राला अ‍ॅक्सेस सोयीचा आहे जरा. आम्ही राहयचो तेव्हा कॅमरिओत देसी पब्लिक फार कमी होते. जेमतेम २-४ फेमिलीज माहित होत्या. परंतू टीओ, सिमि,वुडलॅद हिल्स ह्या एरियात भरपूर देसी आहेत. सिमि मध्ये खूप मराठी लोकं आहेत.( मी देखील सिमी व्हॅलीतच राहते.) सिमि च्या पब्लिक लायब्ररीत मराठी पुस्तके देखील आली आहेत आता. सो एकंदरीत तो सर्व एरिया छान आहे. भरपूर सेफ. मात्र ऑक्सनार्डला टाळा. (शॉपिंगला जाऊ शकता पण राहयला नको.)

धन्यवाद बस्के! मस्त डिटेल्ड पोस्ट लिहलिस , भरपुर काय काय माहिती मिळाली, त्या मैत्रीणिचा नवरा आधी जाणार आहे आणी प्रोजेक्ट एक्ष्टेन्ड झाला तर फॅमिली मुव्ह होइल...