किचन ट्रॉलीमधल्या झुरळांचा बंदोबस्त कसा करावा?

Submitted by स्वप्ना_राज on 20 November, 2016 - 04:05

किती स्वच्छता केली, किती मारले तरी त्रास चालूच आहे. कोणी काही उपाय केले असतील आणि यश मिळालं असेल तर प्लीज सांगा. अतिशय वैताग आला आहे. Sad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

I have one person who does herbal pest control. I will check and send you his number.

बारीक पावडर, कणिक आणि साखर सम प्रमाणात घेऊन ते पाण्याने भिजवून त्याच्या गोळ्या करून ठेवा ट्रॉली मध्ये आणि याचीच जरा पातळ पेस्ट करून सर्व फॅटी भरा.

१. किचनमधील ओल्या कचऱ्याची योग्य तऱ्हेने रोजचे रोज व वेळच्या वेळी विल्हेवाट लावणे. ओला कचरा खुला न ठेवणे. (ओपन)
२. किचन सिंक व सिंकची जाळी स्वच्छ ठेवणे. तेथील अडकलेले अन्नकण काढून बंद कचरापेटीत / ओल्या कचऱ्याच्या डब्यात घालणे.
३. ओटा, सिंक जमेल तेवढे स्वच्छ व कोरडे ठेवणे. तिथे सांडलवंड झाली असेल तर साफ करणे. किचन ओट्याजवळील भिंतीच्या टाईल्स स्वच्छ ठेवणे. रोज गॅसची शेगडी साफ करणे, पुसून घेणे.
४. किचन ट्रॉलीत भांडी कोरडी करूनच ठेवणे. ट्रॉली पुढे ओढून केर नियमित काढणे. तेथील आतील फरशी फिनेलने नियमित साफ करून घेणे.
५. किचन सिंकमधे नियमितपणे ड्रेनेक्स घालून किचनचा पाईप साफ ठेवणे.
६. नियमित रूपात हर्बल पेस्ट कंट्रोल करून घेणे. किचन सिंक व सिंकखालचा भाग (जाळी) येथे केमिकल पेस्ट कंट्रोल करणे.
७. ओटा, टेबल व किचन पोछाची फडकी / वाईप्स नियमित रूपात बदलणे व स्वच्छ ठेवणे.
८. मिक्सर, फ्रीज, मायक्रोवेव्ह इ. किचन उपकरणे स्वच्छ ठेवणे.

या उपायांना नियमितपणे किमान ३ महिने तरी करा. तसेच किचन सिंकखालील जाळीवर डांबर गोळ्या ठेवा. झुरळाचा खडू वगैरेही मिळतो. लक्ष्मणरेषा नाव आहे बहुतेक. तर हे सगळे उपाय कराच. रात्री बाहेर अन्न (ओटा / टेबलवर) नकोच. झोपायच्या अगोदर ते फ्रीजात / कपाटात ठेवा. चिकट, ओली फरशी किंवा चिकट, ओला, सांडलवंड झालेला ओटा म्हणजे झुरळांना निमंत्रण असते.

>>शेजार्‍यांकडेही बंदोबस्त करणे गरजेचे

तिथे काही करणं शक्य नाहीये. Sad तिथूनच येतात असा संशय आहे.

अमा, प्लीज तो नंबर पाठवा मला. देवकी, दिनेश धन्यवाद Happy

अरुंधती, ट्रॉली पुढे ओढून केर नियमित काढणे. तेथील आतील फरशी फिनेलने नियमित साफ करून घेणे. आणि नियमित रूपात हर्बल पेस्ट कंट्रोल करून घेणे. किचन सिंक व सिंकखालचा भाग (जाळी) येथे केमिकल पेस्ट कंट्रोल करणे ह्या व्यतिरिक्त बाकी सगळं होतंच नेहमी.

>>पुण्यात राहत असाल तर तुलसी मधे खास किचन ट्रॉलीसाठी एक पेस्ट मिळते.

नोप, मी मुंबईकर आहे. Happy पण दुकानाचा पत्ता देऊन ठेवता का? कधी गेले तर आणेन.

मॅगी, धन्यवाद! खूप उपयुक्त धागा आहे. आधी बोरिक पावडर घालून बघावं असं वाटतंय.

टग्या धन्यवाद

स्वप्ना, किचनमधून बाहेर उघडणारी खिडकीही झुरळ प्रूफ करायला विसरू नका. तिथे हर्बल पेस्ट, लक्ष्मणरेषा, खडू, डांबर गोळी वगैरे जे जे शक्य असेल ते उपाय करा. जर शक्य असेल तर तीन-चार दिवस अन्य ठिकाणी मुक्काम करून घरात केमिकल पेस्ट कंट्रोल एकदा करून घ्या. परंतु हा उपाय अगदी काहीच उपाय यशस्वी झाले नाहीत तर करायचा उपाय आहे. केमिकल पेस्ट कंट्रोलनंतर जो काही भयाण वास घरात येतो तो तीन-चार दिवस झाले की जर्रा कमी होतो. या उपायाने शेजारून येणारी झुरळेही घाबरतील व शेजारीही! Lol

नोप, मी मुंबईकर आहे. स्मित पण दुकानाचा पत्ता देऊन ठेवता का? कधी गेले तर आणेन. >>> बाजीराव रोड ला चितळेपासून जो रस्ता मंडईकडे जातो त्या चौकातच आहे तुलसी. तीन मजली दुकान आहे. देसाई बंधू आंबेवालेंच्यां रांगेत. टी एमोरियमच्या समोर.

या इथे कु.रु. हे मुळचे पुण्याचे असल्याचे सिद्ध झालेले आहे असे मी जाहीर करत आहे.

हा हा, नाही. पण मला मुंबईचा पुणेकर असे ऑफिसमधील काही कराड-कोल्हापूरच्या मैत्रीणी बोलतात हे एवढेच खरंय

अरुंधती, ट्रॉली पुढे ओढून केर नियमित काढणे. तेथील आतील फरशी फिनेलने नियमित साफ करून घेणे. आणि नियमित रूपात हर्बल पेस्ट कंट्रोल करून घेणे. किचन सिंक व सिंकखालचा भाग (जाळी) येथे केमिकल पेस्ट कंट्रोल करणे ह्या व्यतिरिक्त बाकी सगळं होतंच नेहमी.

>> हेच करणे जास्त महत्वाचे आहे. किचन ट्रॉलीमधील झुरळे नेहमी त्या आतल्या जागांचाच आसरा घेतात.

स्वप्ना, सोपा आणि इफेक्टीव्ह उपाय-
बोरीक पावडर आणि कणीक एकत्र मळुन (बो पा जरा जास्तच घे) त्याचे छोटे छोटे गोळे ट्रॉलीच्या कडेने, कॅबिनेटच्या दाराच्या आतल्या बाजुने चि़कट्व. काही दिवसात झुरळं गायब होतील. स्वानुभव.

बोरीक पावडर अन गव्हाचं पिठ जालीम उपाय.. आंम्ही केलाय .. औषधालासुध्दा मिळत नाहि मग झुरळ.. इफेक्ट बराच काळ राहतो.

साला एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है

मच्छरांसाठी काही सांगा
डेंगु आणतात आणि आमचा मार खाऊन मरतात

हर्बल पेस्ट कंट्रोल च्या नांवाखाली सर्रास शेती साठी वापरले जाणारे ऑरगॅनो फॉस्फरस पेस्टाईड्स वापरतात (उदा. क्लोरपायरीफॉस २०%) जी घरात वापरु नये! तेंव्हा खात्री असेल तेथूनच पेस्ट कंट्रोल करुन घ्या!

सर्वांना धन्यवाद! सर्व स्वच्छता करून बोरिक पावडर आणि कणिक ह्यांचे गोळे करून लावले आहेत. आता पाहू या काय होतं ते. फक्त एव्हढंच आहे की काही गोळे ड्राय होऊन पडत आहेत. तिथे पुन्हा लावायला लागतील. बाकी साधारण किती दिवसांनी नवे लावायचे?

मिमिविजय, डासांसाठी गुड नाईटची लो स्मोक कॉईल इफेक्टिव्ह वाटली. धूप फिरवला तर डास येत नाहीत असं ऐकलंय पण अजून हा उपाय करून पाहिला नाही. बाकी नॅचरल उपाय माहित नाही.

स्वप्ना, सहसा नवे गोळे लावयची गरज पडत नाही.
सुकलेले गोळे पडताहेत का? कणीक थोडी सैल मळायची होतीस मग जरा पातळ असे जास्त दिवस चिकटुन राहिले असते गोळे. सुकुन पडणारे गोळे फेकुन न देता ट्रॉली / कॅबिनेट च्या खाली, डब्यांच्या कोपर्‍यात वैगेरे सरकवुन ठेवा.

सर्वांना धन्यवाद! कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की ट्रॉलीमधले झुरळ जादू झाल्यासारखे गायब झाले आहेत Proud

थोड्या कणकेमध्ये बोरीक पावडर घालायची मग त्यात दूध घालून त्याचे चपातीच्या पिठाएवढच घट्ट मळून त्याचे गोळे करून टाकायचे. जर फट वगरे असतील तर फटींना प्लास्टर प्रमाणे लावायचे. हमखास झुरळ जातात. मी वर्षातून एकदा करते हे काम. त्यामुळे झुरळ नाही येत.

जागु सेम पिंच
तु सांगितलेला उपाय हमखास काम करतो. आणि तु घाई करुन न वाचता सल्ला दिला असलास तरीही नीट लिहिल्लं आहेस

>>१ नंबर , डेड बॉडीज सापडल्या ना झुरळांच्या ?

झुरळ पण गायब आणि डेड बॉडीज पण नाही मिळाल्या. लाश गायब! Happy You Guys Rock!

मला हा उपाय नेट वरुन पाठवलाय ( कस्स काय सौजन्य).

घरगुती उपायांनी पळवा घरातील ढेकूण, माशा, झुरळ आणि उंदीर
सर्वांत चांगली गोष्ट आहे की यामुळे कोणतेही इन्फेक्शन होत नाही. तसेच लहान मुलांसाठी हे उपाय खूप सुरक्षित आहेत.
१. उंदरांपारून मुक्ती
उंदरांना पेपरमिंटचा वास बिल्कूल पसंद नाही. घरात उंदीर थैमान घालत असतील तर कापसावर थोडे पेपरमिंट (अस्मंतारा) टाका, त्याने तेथे उंदीर येणार नाहीत, पळून जातील. या वासाने श्वास गुदमरतो, त्यामुळे ते मरून जातात.
२. झुरळांपासून मुक्ती
काळी मिरे, कांदे आणि लसूनची पेस्ट करून त्यात पाणी टाका आणि एक सोल्युशन तयार करा. ते झुरळ असलेल्या जागांवर स्प्रे करा. याचा वासाने झुरळ घर सोडून पळून जातील.
३. घरमाशांपासून मुक्ती
घरमाशांना घरापासून दूर ठेवण्यासाठी आपण घर स्वच्छ ठेवतो किंवा दरवाजे बंद ठेवतो. असे असूनही घरमाशा घरात येतातच. त्यावर उपाय म्हणून कापसाच्या बोळ्याला एका उग्रवास असलेल्या तेलामध्ये बुडवून दरवाज्याजवळ ठेवा. तेलाच्या वासाने घरमाशा दूर पळतात. हा उपाय करून पाहा माशा त्वरीत पळून जातील.
४. ढेकाणांना मारा
कांद्याचा रस ढेकणाला मारण्यासाठी नैसर्गिक औषधी आहे. याच्या वासाने त्यांचे श्वास बंद होतो आणि ते त्वरित मरतात.

संकलक : प्रमोद तांबे