वेंटीलेटर - मराठी चित्रपट - कोणी पाहिला आहे का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 9 November, 2016 - 11:09

पाहिला असल्यास कसा आहे ते सांगा.
नको नको ते रिव्यू कारणा शिवाय येतात, आणि एक मराठी चित्रपट चांगला निघालाय असे ऐकतोय तर अजून कोणी काही लिहिले नाही, म्हणून हा धागा.

चारच दिवसात दहा करोडचा धंदा झाला आहे असे ऐकलेय. या दहा करोडमध्ये ईथल्या कोणाचा हातभार असेल, कोणी पाहिले असेल तर प्लीज टंका - दोन्ही घरातून दाखवायची फर्माईश झाली आहे. तर फॅमिली सोबत बघण्यासारखा आहे का हे प्लीज सांगा Happy

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन्ही घरातून दाखवायची फर्माईश झाली आहे >>> लेका लग्नाआधीच दोन दोन फॅमिल्या , काय खरं नाही तुझं Lol

अरे घर म्हणजे सासूसासरे नाही, तर ती आणि तिच्या बहिणी, जमल्यास तिच्या जवळच्या मैत्रीणी.
तसेच ईथून आमच्या मातोश्री.
दोघांना वेगळे वेगळे कसे डबल खर्च करत न्यायचे हा एक प्रश्न. तसेच कामाच्या धबगाड्यातून वेळ कसा काढायचा हा दुसरा. आणि तिकिटं काढायला पैसा कुठल्या ब्यांकेतून काढायचे हा तिसरा.
असो, कोणी ईथे सांगितलेच पिक्चर वाईट आहे, उगाच हवा आहे तर तेच त्यांना सांगून यातून सुटता येईल.

ventilator खूप छान सिनेमा आहे. दोन्ही कुटुंबांबरोबर बघू शकतो. बिनधास्त बघू शकतो.

चांगला आहे.
वॉर्निंग - जितेंद्र जोशी जर क्षणभरही सहन होत नसेल (काहींना नाही होत) तर पाहू नका. लीड रोल आहे. मला सहन होतो, मी पाहिला. मस्त काम केलंय.
जोशीसह गोवारीकर लीड रोल. एन्सेम्बल का काय म्हणतात, तशी स्टार कास्ट आहे आणि सगळ्यांचीच कामं भारी आहेत.
डिसेंट मूव्ही, पण जरा लांबलेला. सव्वा दोन ताससुद्धा जास्त वाटतात आजकाल.. साहजिकच आहे, कारण आजकाल मूव्हीचा रनिंग टाईम 'नेट' असतो. पूर्वी ७-८ गाणी असायची. आता एकही नसतं किंवा अगदीच एखादं वगैरे. त्यामुळे सव्वा दोन तास खूपच होतात. विदाउट गाणी फार तर शंभर मिनिटं किंवा लेट्स से, दोन तास पुरेसे असायला हवे.
असो. एकदा पाहाण्यासारखा नक्कीच आहे. फ्रेश लूक आणि सगळ्याच फ्रेम्स खूप अर्थपूर्णही वाटल्या. कहाणी छोटीशी आहे, ती बुकमायशोवर सिनॉप्सिसमध्ये समजेल. वाचू शकता. स्मित

तर फॅमिली सोबत बघण्यासारखा आहे का हे प्लीज सांगा >>> तु ट्रेलर नाही बघितलास का? सतत भणाणत होता झी मराठीवर. निदान मला तरी ट्रेलरमध्ये काही आक्षेपार्ह सापडल नाही फॅमिलीला न घेऊन जाण्यासारख. Lol

हायला शब्दखुणात नो सैराट प्लीज काय टाकले एका मराठी चित्रपटावर फारसे कोणी बोलायलाच तयार नाही. या विकांताला तरी कोणाचा जाण्याचा पिलान आहे का?

@ सुलू,
अहो त्या अर्थाने नाही म्हणायचे होते हो. म्हणजे त्या मालिकांसारखा नाही ना ज्यात कारस्थानी बायका असतात. सतत कुटुंबियांविरोधातच कट शिजत असतात. अश्या चित्रपटाला सर्वांना घेऊन जायचो आणि उगाच बाईमनावर परीणाम होत फॅमिलीस्वास्थ बिघडायचे. म्हणून म्हटले.

@ रसप धन्यवाद,
मला पण पिक्चर छोटासाच आवडतो. त्यात ईण्टरवल सुद्धा नको वाटतो. उगाच त्या नादात आपला पिक्चरचा खर्चा डबल होतो.

आपल्याकडे मायबोलीवर अशा प्रश्नांसाठी एक स्वतंत्र धागा आहे सरजी
फॅन क्लबात असुन पण टिका केल्याबद्दल क्षमा असावी

रीया, कोणता धागा? चित्रपट कसा वाटला तो का? पण त्यात लोक जगभरातले सर्व भाषांतले, जुनेपुराने, सीडी डिव्हीडी केबलवर पाहिलेल्या चित्रपटांबद्दल देखील लिहित असतात. किंवा नवीन चित्रपटाबद्दल लिहा असा धागा असला तरी कोणी मुद्दाम तिथे जाऊन या चित्रपटाबद्दल लिहिलच असे नाही. किंवा अश्या धाग्यांवर नेहमीचे लोकं सोडल्यास कोण वरचेवर हजेरी लावतच असेल असे नाही. जे साहजिकच आहे. कारण बहुतांश लोकं लिमिटेड वेळेसाठी माबोवर येतात. सर्वच ठिकाणी बागडणे अशक्य असते.
त्यामुळे अश्यापैकी कोणी हा चित्रपट पाहिला असेल तर त्याला आपण ही आठवण वेगळा धागा काढून शीर्षकात करून द्यायला हवी. तसेच ज्या कोणाला बघायची इच्छा आहे त्याला या चित्रपटाचे पब्लिक रिव्यू एकाच जागी वाचता येतील फॅसिलिटी द्यायला हवी. शेवटी हा मराठी चित्रपट आहे आणि मायबोली मराठी आहे म्हणूनच हे लाड आणि हे हट्ट. Happy

सुंदर सिनेमा आहे. भरपूर मोठी स्टारकास्ट असली तरी प्रत्येकाचा रोल व्यवस्थित लिहीला आणि सादर केला आहे. जितू, आशुतोष गोवारीकर दोघांची कामं मस्त. जितू नेहमीच आवडतो ( "प्राण जाये पण शान न जाये " सारख्या टाकाऊ सिनेमातल्या छोट्या भूमिके सकट). इथेही तो अजिबात निराश करत नाही. आशुतोष गोवारीकर बद्दल अनेक ठिकाणी वाचलं की सुरुवातीला तो अवघडल्यासारखा वाटतो. मला अजिबात नाही वाटलं. संपूर्ण सिनेमातला त्याचा वावर आवडला. त्याचा आणि सतीश आळेकरांचा शेवटचा बसमधला प्रसंग एकदम हृदयस्पर्शी !
अनेकांच्या वाटेला छोटे-छोटे रोल आले असले तरी त्या त्या भूमिकेत प्रत्येक जण लक्षात राहण्यासारखी कामगिरी करतात. उषा नाडकर्णी, तात्याची व्यक्तिरेखा सादर करणारे ज्येष्ठ कलाकार (नाव माहित नाही), दिपक शिर्के, विजू खोटे ही त्यातली काही नावं . इतकंच नाही तर त्या छोट्या पॅट च्या फॉरेनर वडिलांच्या भूमिकेतल्या कलाकाराला च्या वाटेला फक्त एकच संवाद आलाय, तोही सुंदर.
अनेक ठिकाणी आतापर्यंत सिनेमाचे रिव्ह्यू आले आहेत. काही मला आवडलेल्या गोष्टी/प्रसंग..
बारीक सारीक गोष्टी सुंदर रीत्या सादर केल्या आहेत. उदा . सुरुवातीला आशुतोष गोवारीकर हॉस्पीट्ल च्या लिफ्ट मधून जात असताना, कोणीतरी कोणावर 'अरे नहीं चाहीये यार' असं काहीसं खेकसतो. त्या वेळी त्याचा संदर्भ समजत नाही. तो ज्यावर खेकसतो, तो सरदार सिनेमाच्या शेवटच्या काही मिनिटांत दिसतो.. आणि आपली प्रेक्षकांची पण काहीशी तीच रिएक्शन होते जेव्हा तो आपल्या कामाचं स्वरुप सांगतो.
अजून एक उल्लेख करावा वाटतो तो सुलभा आर्या यांचा. गजा काका म्हणजे त्यांचे पती अ‍ॅडमिट आहेत. प्रत्येक नव्याने भेटायला येणार्‍या नातेवाईकाला त्याच हताशभावनेने त्या कसं झालं , काय झालं हे सांगत राहतात.
निखील रत्नपारखीच्या भूमिकेबद्दल कुठे जास्त वाचायला मिळालं नाही. अतिशय अंडररेटेड कलाकार आहे हा माणूस. तात्यांना सांभाळताना होणारी त्याची कसरत / कुचंबणा कमालीच्या सहजतेने सादर केली आहे. विशेषतः तो घाटात गाड्या बंद करुन थांबायचा प्रसंग !
सिनेमाचा विषय गंभीर असला (सिनेमाच्या नावातंच ते स्पष्ट असलं) तरी शेवटच्या अर्ध्या तासापर्यंत मांडणी एकदम खुसखुशीत आहे. त्यामु़ळे फॅमिलीसकट पहायला अजिबात हरकत नाही.

@ मित छान लिहिलतं..
मी पण पाहिला ..खूप आवडला.
सिनेमाचा विषय गंभीर असला (सिनेमाच्या नावातंच ते स्पष्ट असलं) तरी शेवटच्या अर्ध्या तासापर्यंत मांडणी एकदम खुसखुशीत आहे +१

मागच्या रविवारीच बघितला. पहिला दीड तास कसा गेला कळलंच नाही. अनेक पात्रांच्या भोवती गुंफलेले छोटे छोटे प्रसंग गर्दीतल्या प्रत्येकाचे स्वभाववैशिष्ट्य दाखवतात. इतक्या अल्प फुटेजमधूनही सगळी कॅरॅक्टर्स मस्त उभी केली आहेत. हाताळणी वेगवान आहे. गालातल्या गालात हसू तर कुठेच गेले नाही, एक दोन ठिकाणी चक्क स्फोटक हसूसुद्धा येते. नंतरच्या अर्ध्या तासात चित्रपट मूळ विषयावर येतो. चित्रपट चाम्गला असला तरी थोडी काटछट चालली असती. अर्थात सर्वच सीन्स चांगले असल्यामुळे कोणते सीन्स कापावे हा प्रश्नच आहे. एडिटरची पंचाईत झाली असणार.

अतिशयच आवड्ला हा चित्रपट!
वर सर्वांनी लिहिलंय तसं छोट्या छोट्या भूमिकेत अनेक माहितीचे/अनोळखी कलाकार आहेत. एकूणात चित्रपट भराभरा पुढे सरकतो , इतके लोक, इतके सीन्स- बोअर होत नाही. एकदा तर जरुर बघावा. हीरांनी लिहिलंय तसं हसू येण्याचे बरेच प्रसंग आहेत..धमाल आहे. इतक्या सिरियस विषयावर इतका मस्त हलकाफुलका चित्रपट बनू शकतो हेच अविश्वसनीय पण खरं आहे.

********स्पॉयलर अलर्ट****************************

गणपतीचा फोटो सर्वांना एकदम व्हॉट्सअपवर येणे आणि सर्वांनी तो चेक करणे, करणने मॅरेज ब्यूरोवाल्या काकांना टाळणे पण नंतर इंटरेस्ट दाखवणे, सुलभा आर्यंचं सर्वांना तीच स्टोरी परत परत सांगणे, कोल्हापूरच्या भाच्याने कारमध्ये झोपलेल्या आईचा श्वास चालू आहे ना ते बघणे, कॉईन गिळण्याचा सीन - छोटे छोटे सीन्स पण काय सही घेतलेत. हा झाला विनोदी भाग पण गंभीर सीन्सपैकी गजूकाकांच्या भावंडांचं आयसीयूमध्ये एकत्र जमणं, शेवटचा आळेकर- जितू सीन, सारिका बोमन इराणीकडे एक चान्स मागते तो सीन- सॉल्लिड.
सतीश आळेकर, तात्या (कलाकार नाव माहीत नाही पण या आजोबांनी खूप हसवलं), तात्यांना सांभाळताना हैराण होणारा प्रितम, बापावर जिवापाड प्रेम करणारी सारिका (सुकन्या मोने) आणि इतर सर्वच कलाकार- सगळेच मस्त.

******************************एन्ड*********************************

गुड जॉब राजेश मापुसकर, प्रियांका चोप्रा व पूर्ण टीम.

भारत ईण्ग्लड 20-20 सामन्यामुळे हा टीव्हीवर असून बघता आला नाही. अर्थात एकदा लागला तर परत लागेलच. घरच्यांना असेच सांगून मॅच लावली. तसेच पुढच्यावेळी जाहीराती कमी असतील असेही सांगितले. त्यांना पटले.

रेकॉर्डींग सुविधा घे रे. खुप उपयोगी पडते, पैसे वसूल होतात.
सामना बघायचाय तर चित्रपट रेकॉर्डिंगला टाकायचा आणि कोणी काय ते मेलं क्रिकेट सारखं सारखं म्हणत असेल तर एखाद्यावेळी त्यांना दुसरे काही बघु देऊन मॅच रेकॉर्डिंगला टाकावी.

म्याच लाईव्हच बघावी लागते. पर्याय नाही. चित्रपटासाठी रेकॉर्डीण्ग सुविधा वापरणे चांगला मार्ग आहे. पण एकदा ही सुविधा आईल दाखवली तर ती आणि तिच्या मालिका. कमालीचा गैरफायदा घेऊन आमचे आयुष्य खडतर होईल.

मला खूप आवडला चित्रपट.

कमालीचा गैरफायदा घेऊन आमचे आयुष्य खडतर होईल.>>>:D
यावरून मला आठवलं आम्ही आईला गुजराथी channels कुठे आहेत टीव्हीवर ते दाखवत नाही, ती बडोद्याची असल्याने मराठीबरोबरच सर्व गुजराथी सिरियल्स बघाव्या असं तिला वाटतं. मग बाबा वैतागतात, केबलवाल्याने ती channels बदलल्याने बरं झालं. नाहीतर नं पाठ होते तिला आधीचे. आता शोधत नाही स्वतः ते बरं झालं.

>>>> तुम्ही दोघंही आयांवर अन्याय करताहात ऋन्मेष, अन्जू! हे बरे नव्हे हो. <<<<<
नाय थ काय ..... येवढा कस्ला तो सोस ...... अन हेच्च करायच, तर तो व्हेंटिलेटर बघुनही काही उपयोग नाही यांना... Proud

तुम्ही दोघंही आयांवर अन्याय करताहात ऋन्मेष, अन्जू>>> आईवर अन्याय नाही केला तर बाबांवर होईल आमच्याकडे ;( एकूण एक हिशोब सारखाच. बाबा कंटाळतात गुज्जु सिरीयल्सना आणि रेकाँर्डींग सोय नाहीये.

माझ्या पोस्टवर स्मायलीज का येत नाहीत?

अन हेच्च करायच, तर तो व्हेंटिलेटर बघुनही काही उपयोग नाही यांना. >>> अगदी अगदी. Lol

आईवर अन्याय केलं की असं होतं म्हणे >>> Happy

पण आईने कमी सिरेली बघितल्या तर त्यातच तिचे भले आहे. नेहमीच का आईच पोरांचा विचार करणार. कधी पोरांनीही आईचा विचार करायला नको का?

लहानपणी आई बाबा डोळे बिघडतात, व्यायामकडे दुर्लक्ष होतं, चांगले संस्कार होत नाहीत म्हणून मुलांना टीव्ही पासून लांब ठेवायचे ना ?

म्हातारपण हे दुसरं बालपण असतं..…

म्हणून त्यांना टीव्ही पासून लांब ठेवत असतील. Wink