विझिटर विसा (अमेरीकेचा)

Submitted by झंपी on 20 October, 2016 - 05:02

इथे एका नातेवाईकाला अमेरीकेत आपल्या फॅमिलीला फिरायला बोलवायचे आहे.

तो स्वतः मात्र सध्या मेक्सिको मध्ये आहे.

तर तो दुसर्‍या एका त्याच्या नातेवाईकांकडून आमंत्रण पत्र (इन्विटेशन लेटर) मागतोय( मागेच पडलाय).
खर्च वगैरे तो स्वतःच करणार आहे पण त्याचे म्हणणे आहे की त्याच्या दुसर्‍या नातेवाईकाने आमंत्रण पत्र द्यावेच.
कारण तो मेक्सिकोत असताना, जर अमेरीकेतील ह्या नातेवाईकाने आमंत्रण पाठवले तर बरे होइल विसा प्रोसेस काताना.

तर प्रश्ण आहे की,

१)जर स्वतः स्पॉन्सर करणार असेल, तर आमंत्रण पत्राची गरज असते'च' काय?
२) अमेरीकेत कुठे उतरणार ह्याचा अ‍ॅड्रेस जर आमंत्रण पत्रात जो दिलाय, तिथेच उतरावं लागतं का?

३) आमंत्रण दिलेलेया माणूसाची जबाबदारी काय काय असू शकते? आमंत्रण दिलेल्याची काय काय माहिती नोंद होते?

(हि सर्व माहिती नक्की नेट मिळाली नाही आणि बरेच विव्वाद होते म्हणून हा धागा उघडायचा प्रपंच). कोणाला अलिकडचा अनुभव असल्या , कृपया उत्तर द्यावे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जर स्वतः स्पॉन्सर करणार असेल, तर आमंत्रण पत्राची गरज असते'च' काय?

नाही विसिटरला स्वतः ची Financial documents submit करावी लागतात.
२) अमेरीकेत कुठे उतरणार ह्याचा अ‍ॅड्रेस जर आमंत्रण पत्रात जो दिलाय, तिथेच उतरावं लागतं का?
नाही. ह्या गोश्टी पडताळल्या जात नाहीत

३) आमंत्रण दिलेलेया माणूसाची जबाबदारी काय काय असू शकते? आमंत्रण दिलेल्याची काय काय माहिती नोंद होते?
आमंत्रण दिलेल्या माणसाची जबाबदारी जर विझिटर अडचणित आला तर एक contact म्हणून उपयोगी पडते आणी of course terrorist connections वगैरे नाहीत ना याच्या पडताळणीसाठी उपयोगी पडते. काय काय माहिती नोंद होते याची मात्र कल्पना नाही.

Affidavit of Support नामक एक फॉर्म असतो.. तुम्हाला नेटवर मिळेल.
जर गरज असली (म्हणजे येणार्‍या लोकांची जबाबदारी घ्यायची असेल) तर हा भरून Notorize करून पाठवावा लागतो.
त्यात तुमची एकंदरीत मालमत्ता, पगार इत्यादी गोष्टी भराव्या लागतात. येणारे नातेवाईक जवळचे असतील पण तुम्हाला तुमची मिळकत त्याना दाखवायची नसेल तर थोडी पंचाईत होते . अश्यावेळी हा फॉर्म भरून एका बंद लखोट्यात घालून पाठवावा... आणि

"अमेरिकन व्हिसाच्या वेळी विचारले, तर हे सील त्यांच्या समोर उघडुन कागद लगेच त्यांच्या हातात द्या," असे सांगा.
..
व्हिसावाले बंद लखोटा स्वतः उघडत नाहीत (त्यात लाच वगैरे देण्याचा प्रकार होईल म्हणून).
..

Affidavit of Support जो भरतो तो लीगली बाऊंड असतो.

ऑफिसमधल्या एकाने त्याच्या आई साठी भरला होता. त्यांना इथे आल्यावर हार्ट चा त्रास झाला. insurance घेतला नसल्यामूळे भले मोठे बिल झाले. ह्यांनी तीच्याशी आमचा संबंध नाही वगैरे सांगून हात झटकायचा प्रयत्न केला होता जो अंगाशी आला Affidavit of Support भरून दिलेले असल्यामूळे.

मेक्सिको मध्ये असला म्हणून बोलवायला बंदी असं (अजूनतरी) नसावं. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर प्रोसेस करणारेत का? Wink

एकदम चिकट नातेवाईक आहे. तो म्हणतोय की खर्चाची जबाबदारी तो स्वतः घेणार आहे. पण सकाळ दुपार संध्याकाळ सारखे फोन करून आम्हाला सांगतो की, सांगा ना तुमच्या नणंदेला( जिच्याकडून आमंत्रण हवे आहे आणि जी आता अमेरीकेत आहे) की सर्व कागदपट्रे ( ग्रीन कार्ड, पासपोर्ट आणि युटीलीटी बिल वगैरे).

नणंदेला हा फुकटचा त्रास नकोय. कारण त्याचा प्लॅन असा वाटतेय की तो मेक्सिकोला असल्याने सगळी गँग हिच्याकडे उतरेल. आणी हा आरामात येइल.

हा दूरचा नातेवाईक आहे.

एकंदरीत नुसते आमंत्रण देवून काही त्रास नाही ना होणार"? म्हणजे कुठली जब्बादारी घ्यावी लागेल का?

आणि वरची कागदपत्री देवून काही प्रॉबलेम नाही ना होणार.

विजिटर विसासाठी स्पॉन्सर करणे म्हणजे येणार्‍या पाहुण्यांची जबाबदारी उचलणे. सपोर्ट अफेडेविट करुन तुम्ही आर्थिक जबाबदारी उचलायला तयार आहात असे सांगता. पाहुण्यांच्या इथल्या वास्तव्यात सर्व सुरळीत झाले तर ठीक अन्यथा काही प्रॉब्लेम झाल्यास तुम्ही जबाबदार. तेव्हा अशी जबाबदारी घ्यायची आर्थिक, मानसिक तयारी नसेल तर स्पष्ट नाही सांगावे.

मी जीसी, पासपोर्ट, युटीलीटी बिल जवळच कोणी असेल तर ठीक आहे पण बाकी कोणाला दिलं नसतं.
आमंत्रण देऊन त्या माणसाचे नाव त्या आमंत्रणात घालणार का की हा माणूस सगळं करणारे म्हणून? मी फक्त अमेरिकेत आहे म्हणून आमंत्रण देतेय पण मी या माणसांना ओळखत नाही म्हणून? त्या माणसाचं अमेरिकेत घर वगैरे काही नाही का? आमंत्रण काही अत्यावश्यक नाही, त्याशिवायही विसा होतोच. आणि आमंत्रण दिलेल्या व्यक्तीला संपर्क केलेली केस मला माहित नाही, त्यामुळे तो त्याचं नाव ही घालू शकतोच. (अर्थात मी काही सर्वे केलेला नाही सो statistically या वाक्याला काही अर्थ नाही याची जाणीव आहे)
आमंत्रण देताना दिलेली व्यक्ती तुमची कोण हे लिहिणे अपेक्षित असते.
भरीला पाडत असेल तर सावधान इतकंच सांगेन.
द्यायची वेळ आलीच तर ते जे कोणी येणारेत त्यांचा आत्ता इन्शुरन्स काढ आणि पेपर आधी दे असं सांगा. नंतर ते जे दिवस राहणार आहेत त्या हॉटेलचे रिजर्वेशन पेपर दे सांगा. त्याला ही समजेल की फसवा फसवी करायची असेल तर ह्या लोकांना ही समजतंय म्हणून.

<<आमंत्रण काही अत्यावश्यक नाही, त्याशिवायही विसा होतोच. >>
----- सहमत....

हॉटेलचे बुक केल्याचे कागद, सम्पर्क, अमेरिकन वास्तव्याच्या काळात घेतलेली विमा सुरक्षा, आणि अमेरिका सोडण्याचे (निव्वळ परतीचे विमान तिकीट खुप कामाचे नाही आहे - कोणालाही दाखवता येते) ठोस कारण.

प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळी हे सर्व कागदे दाखवायचे, विसा द्यायचा तर द्या नाही दिला तरी चालणार आहे हा attitude वृत्ती महत्वाची आहे, अशी वृत्ती दाखवुन दोन वेळा मला विसा मिळाला आहे (विसा नसता मिळाला तरी माझे कुठलेही दमडीचे नुकसान झाले नसते).