प्रेम-पत्र

Submitted by प्रकाश काळेल on 25 February, 2009 - 05:14

असं म्हणतात कि,प्रेम पहिल्या नजरेत होतं
माझा तर यावर मुळिच विश्वास नाही
मला आपली पहीली नजरानजरच आठवत नाही !

तरीही माझं ह्रदय तुला पाहुन धडधडते
मी लाख प्रयत्न केला थांबवायचा तरी,
डोळे फक्त तुझ्या आस्तीत्वाचा वेध घेतात !

तु दिसलीस कि मग,रणरणत्या ऊन्हात
वळिवाची सर आल्याचा भास होतो.
जिवन-क्षीतिजावर,ईंद्रधनुचा साक्षात्कार होतो !

पण लगेच.....मी जागतो,मना समजावतो,
असे आभास,तो वळिवाचा,
अरे वास्तव ही ग्रिष्माची दाहकता

मी म्हनतो ,प्रेम म्हणजे "मृग-जळ"
मन म्हनते ,प्रेम म्हनजे " जिवन-सागर"
मी म्हनतो प्रेम म्हनजे ,खोट्या आशा !
मन वेडे सोडेना प्रेमाची अभिलाशा

संघर्ष मझा अन मनाचा, नित्याचा मला आहे
वेड्या मनाला, साथ तुझ्या प्रेमाची हवी आहे.

सार्‍या गणिताची बेरीज-वजाबाकी शुन्य आहे !
नियती पुढे मी एक शुन्य,अन तुही एक शुन्य आहे
कळले जर तुला काही तर,सारे काही सार्थ आहे
नाहीतर वेड्या माझ्या मनाचा, सारा अकांतच व्यर्थ आहे !

जगेन मीही तुझ्याविना,ध्येये सारी गाठेन...सारं काही विसरेन..!
पण हे मन जडलेले ईथेच असेल..तुझी वाट पहात....या नाजुक वळणावर !

-----------------------------------------------------
प्रकाश

आठ वर्षापुर्वी लिहिलेले हे पत्र(काव्य!)...ईंजीनिअरिंगच्या तिसर्‍या वर्षाला होतो तेव्हा !
बरेच दिवस डायरीत जपुन ठेवले होते. ज्यासाठी लिहीले होते ते कधी देणे झाले नाही !!

घरची परिस्थीती तशी बिकट.....डोक्यावर जबाबदारीचे होझे.....पुढची भविष्याची अंधारी वाट!
कठीन काळ होता तसा !

बाकी हे काहीच्या काही होते नक्कीच !!

आठ वर्षा नी प्रयत्न केला काही हरकत नाही. तोच आठवणीचा ठेवा आहे. जपून ठेवा.

बाकी हे काहीच्या काही होते नक्कीच !!>>>> हे काहीच्या काही असेल, पण कविता मात्र खुप छान, काहीच्या काही नाही Happy

सुमेधा पुनकर Happy
**************************************
पतंग्यानेच का जावं आगीजवळ ?
ज्योतीला सांग, नमन कर ना एकदा
**************************************

प्रकाश,
मनात आठवान्चा पाऊस दाटला,
पण, माझा इशारा तुला नाहीच कळला ?
------------------------------------------------
मी मराठी असण्याचा मला अभिमान आहे.