जातेस ना? तर...

Submitted by ravi143 on 24 February, 2009 - 23:32

जातेस ना...
तर देवून जा
एक सोम्य नजर
शा॑त करीत राहीन
त्यात आठवणि॑चा सागर.

जातेस ना...
तर देवून जा
एक मधूर हास्य
ठेवीन मी लपवून त्यात
विरहाचे रहस्य.

जातेस ना...
तर देवून जा
तुझी ती ओढणी
घेईन शेवटी लपेटून
मी तीचीच कफनी.

जातेस ना...
तर देवून जा
रेशमी बटा॑चा ग॑ध
चितेतही जळताना
होईल त्यात धुन्द.

पण जाताना...
तू जावू नकोस
ती आसव॑ देवून
आसवा॑च्या महापूरात
मी जाईन गडे वाहून.

गुलमोहर: 

सुंदर कविता! खुप आवडली. सगळी कडवी,सगळे शब्द आवडले .
पण कवितांच्या बी.बी वर का नाही टाकली?

*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************

जातेस ना...
तर देवून जा
एक मधूर हास्य
ठेवीन मी लपवून त्यात
विरहाचे रहस्य

हे सगळ्यात आवडलं!


-योगेश

छान

सुरेख आवडल Happy
------------------------
देवा तुझे किती सुंदर आभाळ

शेवटाचे कडवे

जातेस ना.. तर जा
पण जाऊ नकोस
आसवे देऊन
महापुरात त्यांच्या
मी जाईन गडे वाहून.

असे केले तर..?

कविता छान आणि भावपूर्ण आहे.
-सविनय.

अप्रतिम कविता आहे. मला फार आवडली.

सुमेधा, योगेश, छाया, अलका, केदार, स्रुष्टी तुम्हा॑ सर्वा॑चे मनापासून आभार!

रवी १४३.....

रवी
कवीता छान आहे.
पण शेवट करतांना.............असा का नाही केलास....
पण जाताना...
तू जावू नकोस
ती आसव॑ घेउन
आसवा॑च्या महापूरात
तु नको जाउ वाहून !

कसा वाटला समारोप...........
अर्थात तु़झी कवीता आहे ती मी आपलं सांगीतलं येवढ्चं
बाकी उत्तमच

शेवटच्या कडव्यात 'गडे' वापरल्याने लाडे लाडे बोलल्यासारखं वाटतंय..