तिथून थोड्याच अंतरावर काहीजण आज्ञाधारक मुलांसारखे बसले होते. समोर एक काळा कुळकुळीत एक्सरे अडकवला होता. (हा बहुतेक मघाच्या सेक्शन मधला असावा.)
त्यावर पांढर्या मार्करने
. ग = गझलच्या
. म = मात्रांची
. भ = भानगड
. न = नवी
असं लिहिलं होतं. सगळी प्रौढ मुलं कागदावर ल , गु , ल गु असं लिहीत बसली होती. समोर एक बाई काहीतरी शोधत होत्या. बहुतेक मुद्दा असावा.
एवढ्यात डॉ. ना बाजूला ढकलून "सरका सरका मी इथला गुरुजी आहे" म्हणत एक जण वर्गात दाखल झाला. हा मघाचाच तो विवेचक असावा अशी भीती डॉ. ना वाटून गेली पण सकाळपासून दोन टोले बसल्याने स्वतःच्या मेंदूवर त्यांना शंका घेववेना. ते नुसतेच बाजूला उभे राहून बघत राहिले.
अचानक एक विद्यार्थी "गुल ! गुल !" करत ओरडत उठला. बाईंनी डोळे वटारून "गुल नव्हे! ल | गु" असं दटावलं.
"अहो बाई , गुल म्हणजे मात्रा मोजताना कल्पनाच गुल झाली असं म्हटलं."
डॉ. पुन्हा गजनीटोला आठवून शहारले. हा विद्यार्थी आता छातीवर 'हू किल्ड माय कल्पना' असं गोंदवून घेतो की काय अशीही भीती चाटून गेली.
"अशी कशी गुल होईल ? शक्यच नाही. कल्पना घट्ट धरूनच ल गु मोजायला शिकवलं ना?"
"पण मी काय म्हणतो बाई, आहे तसं नाही का चालत? किंवा नाहीच लिहिलं तर?"
"आगाऊपणा नकोय उगाच . नाही लिहाय्चं तर शाळेत कशाला येता? लय, मात्रा कोण शिकवणार?"
"मी आहे ना , मी आहे ना.." बोलले गुरुजी !
हा प्राणी इथेच का पडून असतो इतर वॉर्डात का जात नाही असे मुक्तछंद अनेक विद्यार्थ्यांच्या मनात येऊन गेले असणार. कारण सगळ्यांनी मिळून विद्रोही कवितांचा एकच कल्ला सुरू केला. हीच ती वेळ असं म्हणून डॉ. गर्दीत घुसले.
"थांबा थांबा ! मला सांगा काय घोळ आहे"
"तुम्हाला समजेल असं सांगतो .माझी खाट तिकडे होती" कवितांच्या सेक्शनकडे हात दाखवत एक जण म्हणाला. "ह्यांनी इकडे नीटनेटकी खाट देतो म्हणून आणलं आता म्हणतात तू हिच्यात मावत नाहीस, दोन चार गोष्टी काप .आता मला तिकडचेही घेत नाहीयेत" रडकुंडीलाच आला एकदम.
"हे पहा हा आपल्या सगळ्यांचा वॉर्ड आहे , इथे सगळ्यांना भरपूर जागा आहे ज्याला जिथे जायचंय त्याने तिकडे जावं" असं म्हणताच सारे विद्यार्थी पसार झाले.
डॉ. नी बाईंकडे पाहिलं. "आता काय करायचं?"
"उत्तर वाचा" - बाई
"काय? अहो उत्तर तुमी द्यायचंय "
"मी दिलंय. भल मोठ्ठं ! हे घ्या" म्हणून बाईंनी साडेतीन पोस्ट्स डॉक्टरांच्या हातात खुपसल्या.
"म्हणजे काय? प्रत्येक प्रॉब्लेमवर आत्महत्या हाच एक पर्याय आहे?" डॉ.वाचता वाचता बोलले.
"थांबा ! तुम्ही प्रतिक्रियांचा कागद आधी वाचता आहात. हा एका भोचकाचा प्रश्न आहे, कथा ह्या पानावर आहे."
"अरेच्चा असं झालं होय "म्हणत डॉ. नी कथा वाचून काढली. "बरं मग?"
"बरं मग??? बरं मग???? म्हणजे गझल फेल गेली !"
("मी आहे ना , मी आहे ना , नीट करू " - विवेचक उर्फ गुरुजी)
"गझल??? अहो ही कथा आहे ना?"
"तुम्हाला ह्यात फक्त कथा दिसली? एक कविता, एक गझल नाही दिसली?" बाईंचा पारा चढला. "प्राचीनकालापासून आपण हे पहात आलेलो आहोत की कथेत कविता, कवितेत गझल, गझल मध्ये कथा असायलाच हवं. कालिदास, टागोर, जी.ए.,पु.ल. ,गालिब, ........"
"आं? अशी यादी ?"
"हाच तर प्रॉब्लेम आहे. का असू नये अशी यादी? गद्य पद्य असा फरकच का हवा? एका आकाशाखाली सगळे सारखेच ना? आपल्याला फरक दिसतो म्हणजे आहेच ही समजूतच मुळात चुकीची आहे. माझ्या तुमच्यात तरी काय फरक आहे? अजून कोण बरं.."
"मी आहे ना मी आहे ना ":- विवेचक
"तर कुणातच काही फरक नाही. आज मी आहे उद्या तुम्ही असाल , मी असले काय तुम्ही असलात काय मी आत्महत्त्या केली काय , तुम्ही केली काय " खण्ण खण्ण खण्ण खण्ण .. डॉ. जीव खाऊन पळत सुटले.
तासभर आराम करूनच त्यांनी वॉर्डच्या डाव्या अंगाला "अतीवाच्यता" विभागात प्रवेश केला तर एक रंगीबेरंगी कपडे मिरवणारी एक मुलगी बसलेली दिसली. मघाची ती थोर यादी बघून १५ मिन होऊन गेल्याने त्यांना हिचे नावच आठवेना. ऍप्रनच्या खिशात बधीरसारखा हात घालत त्यांनी पेशंटची लिस्ट काढली.यादीत नावाच्या ठिकाणी वाज्ज्वुका असं ठसक्यात लिहीलं होतं. "वाज्ज्वुका?" डॉ. स्वतःशीच उद्गारले.
"धन्यवाद . तू ग प. " त्या मुलीच्या दिशेने आवाज आला.
"डॉ. ना असं अरे तुरे बोलू नये "
"धन्यवाद. अहो नाही. ते वाज्ज्वुका माझं कालचं नाव. आज कनै आमी "तू ग प"."
"ही कसली नावं म्हणायची ."
"धन्यवाद . अशीच आहे " -मी.
"बरं मला सांग हे प्रत्येकवेळी धन्यवाद काय आहे?"
"धन्यवाद , धागा सुरू राहतो"
"धागा? कसला धागा?"
"धन्यवाद. धागा कशाचाही असू शकतो . चर्चेचा सुती , भांडणाचा सुतळी , कवितेचा रेशमी " रिपीट - मी
"आता हे रिपीट काय आहे?" एव्हाना डॉ. ना आपल्या ट्रीटमेंट वर शंका येऊ लागली होती.
"धन्यवाद - मी अधून मधून एक वाक्य दोनदा म्हणते. "
"का? आणि आधी हे धन्यवाद थांबव बघू"
"नको??? उडवलं. मला काय -मी"
"गुड गर्ल, आता सांग एक वाक्य दोनदा का?"
"चारदा का नाही - मी"
"अगं असं वाकड्यात शिरू नये"
"आज वाकड्यात नाही. तो बुधवारचा आयडी आहे-मी"
"आता हे प्रत्येक वाक्याच्य शेवटी "मी" मी" काय आहे?"
"शेवटी मीच आहे. दुसरं आहे कोण?"
"ह्म्म. काल काय केलंस सांग पाहू?"
"धन....अय्या ! काल एका चौकात माझ्या पुढच्या आठवड्यतल्या गोष्टींची प्रहारसभा घेतली . मग तीच सभा प्रत्येक चौकात कट पेस्ट केली."
"अर्रे वा.हुशार आहेस हो"
"इतकंच नाय काय . शेजारच्या दोन तीन दवाखान्यात पण जाऊन सभा घेऊन आले -मी"
"मस्तच. तिकडेही मित्रमैत्रिणी आहेत का आमच्या तू ग प ला ?"
"छ्यॅ ! प्रहारसभा घ्यायची असते तेव्हा जाते"
"छे छे ! ह्या वागण्याला काय अर्थ आहे? चांगल्या लिखाणाला या सगळ्याची काय गरज?"
"वाज्ज्वुका?"
"अं हं. आज 'तू ग प' बरोब्बर? डॉ. नी १४ व्या मिनिटाचे आभार मानले.
"हे नाव नाही . हा प्रश्न होता -मी"
डॉ. नी मान हलवत पुढच्या पेशंटकडे मोर्चा वळवला. ती २५-३० बाहुला बाहुलींना आळीपाळीने जेवायला वाढत होती. भरून वहायला आलेली ताटं पाहून डॉ. ना राहवले नाही . "अगं सीमा , हे काय चालवलं आहेस?" ह्या मुलीला खरंतर चांगल नाव आहे पण लहानपणी सीमा देवचे बरेच चित्रपट पाहिल्याने हिचं असं झालंय असं हिस्टेरियात लिहील्याचं डॉ.ना आठवलं.
"काय चाललंय म्हणजे काय? दिसत नाही तुम्हाला? सासू , नणंद, जाऊबाई, दीर हादडायला बसलेत आणि मी एSSSSSSकटी राबतेय " हातातला डाव नाचवत ओरडली ती.
"हे असं? समारंभाला जायचं असल्यासारखं तयार होवून?"
"गप्प बसा ! ही मला आजच मिळालेली पैठणी आहे " असं म्हणता म्हणता आवाज लागला."अरे मेल्यांनो कुणीतरी सांगा जेवण कसं झालंय ते. कौतुक करायची वृत्ती नाही , वर म्हणायला मोकळे त्याच त्याच जेवणाला रोज काय छान म्हणायचं म्हणून " म्हणत एका बाहुल्याची गचांडी धरून उचललन ! " तू रे आं ? निदान तू तरी , सांग की कसं झालंय ते , नाही त्या वेळी अगदी काय काय सुचत असतं 'संपवून टाक पेग' म्हणे! तोंड बघा! इथे एक घास हलला नाही ताटातला , उठ, कामाला जा " म्हणत त्याला शेजारी ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या डंपरमधे आपटलान.
इतक्यात एका बाहुलीचा हात तिच्या पैठणीला लागला. "खबरदार ! मघाशी चारचौघात काही बोलले नाही पण पाय मोडून ठेवीन पुन्हा इकडे फिरकलीस तर!" म्हणत त्या शशीकलेची वळकटी बांधून डंपरमधे टाकून दिली.
"सीमा, किती हा राग राग , नाही जमत एखाद्याला कौतुक , मला दे , काय बनवलं आहेस?"
"हं घ्या ! तुम्ही तरी गिळा " असं धुसफुसत तिने हिरव्या रंगाचा एक लगदा डॉ.च्या हातात ठेवला.
"अरे वा ! उंबर बर्फी का? अगदी अंजीरासारखी ...." पण डॉ.चे वाक्य पूर्ण झालेच नाही. स्टीलचा डाव सुध्दा एवढ्या जोरात बसू शकतो तर गजनी तो वजनदार रॉड का घेऊन हिंडत होता असा प्रश्न घेऊन डॉ. भेलकांडत पुढे निघाले.
तरीही त्यांच्या कानांवर सीमाचं कर्कश्श वाक्य आलंच - "मला माहित्ये, ही बर्फी खाल्ल्यावरसुद्धा तुम्ही मला miss करणार नाही!!"
...... क्रमशः ......
चला,
चला, 'कुजबूज' बंद झाल्याचे दु:ख जरा कमी झाले! छान चालले आहे. आणखी येऊ द्या.
की मेट्रन म्हणजेच हवा हवाई?
नि अजून तुमच्या लिखाणावर 'साहित्यिक' लोकांची प्रतिक्रिया कशी आली नाही? 'गण की मात्रा, की छंद की वृत्त, की कायतरी चुकले, इथे जरा वेगळा शब्द वापरायला हवा होता, ' वगैरे?
कार्यशाळे
कार्यशाळेत तुमच्या गझलेला चांगले मार्क मिळाले नव्हते वाट्टं
मेट्रन,
मेट्रन, तुमचा बाजी प्रभू होणार बहुदा! इतक्या आघाड्या एकदम उघडल्या आहेत की गनीम खिंडित गाठणार तुम्हाला!
(No subject)
अरे
अरे कवितावालों (वालियों) गज़ल़कारों(कारियों) जाग जाओ. आपल्या लेखनस्वातंत्र्यावर हल्ला सुरू झाला आहे. आणि तुम्ही गप्प बसला आहात? अरे उठा! आपल्या लेखण्या घ्या आणि लिहायला लागा:
उठा.... काव्यवीर हो,
स-पेन व्हा उठा चला,
सुसज्ज व्हा, उठा चला
उठा... काव्यवीर हो..........!
"एक लेखणी द्या मज आणुन
लिहीन कविता स्व-शाईने
किती जाहले अत्याचारी
फाडुन टाकू सारी पाने...
शरद
अफाट लिहुन
अफाट लिहुन राह्यले हो तुमी
------------------------
देवा तुझे किती सुंदर आभाळ
लै भारी,
लै भारी, अजून येउ द्या
(No subject)
अग आय गं!
अग आय गं! पोट दुखायला लागलं हसून हसून..
(No subject)
(No subject)
अगगगगग!
अगगगगग! जबरी हहपुवा!
-----------------------------------
शेवटी साथ नशीबाचीच!
फर्मास
***
"If a man does not keep pace with his companions, perhaps it is because he hears a different drummer. Let him step to the music which he hears, however measured or far away." - हेन्री डेव्हिड थोरो
(No subject)
जोरात आहे
जोरात आहे गाडी!
एकदम
एकदम फॉर्मात आहे गाडी.
खल्लास
खल्लास :d
मेट्रना,
मेट्रना, नवीन गाडीबद्दल तुझे हार्दिक अभिनंदन!
-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश
शरद
शरद
अरे
अरे काव्यवीरों,
जागते रहो! रात्र वैर्याची आहे. सरसावा लेखण्या पुढे! लिहा उद्रेकाच्या कविता! चला उठा! आपण सारे मिळून यांना आपल्या काव्यशक्तीची जाणीव करून देऊ.
.................................................................................................
खबरदार जर विरुद्ध अमुच्या ल्ह्याल पुढे सांगतो..
शेकडो कविता मी बनवतो! ||धृ||
कुण्या गावचे मेट्रन आपण काय चालले असे
आमुचे करता का हो हसे!
बघ लिहून सारे मुरलेला मी कवी
चवताळत आज बिथरलेला मी कवी
अन् पुरून तुम्हा उरलेला मी कवी
खैर नसे तुमची ह्या जागी ल्ह्याल किती पाहतो
शेकडो कविता मी बनवतो ||१||
.....................................................................................................
अरे बाकी कवी-कवयित्रींनो मला मदत करा. लिहा आणि चार जळती कडवी.
शरद
मेट्रन...
मेट्रन... जबरी

धन्स! छानच! मस्तच! एकदम खुसखुशीत!
तुमची राऊंड जरा लवकर लवकर होऊदे. नाहीतर सगळे पेशंट्स बघून कसे होणार?
(No subject)
,
जबरीच
जबरीच
-----------------------------------------
सह्हीच !
चालू दे
चालू दे चालू दे... पुढची राऊंड लवकर पूर्ण करा...
=========================
रस्त्याने जाताना वाटेत नाचत मासे पाहत थांबू नये...
हा भाग फार
हा भाग फार आवडला

वाज्ज्वुका? अन तू ग प ...
मस्तच!!
मस्तच!!
----------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/
भन्नाटच
भन्नाटच हायसा की !
झकास चाललया राव, येवुंद्या !!!
सस्नेह...
विशाल.
____________________________________________
रातराणीचा सुगंध पलंगावर पडल्या पडल्यादेखील घेता येतो. पण तुळस वृंदावनातच राहते, तिच्यापुढे आपल्याला उभंच राहावं लागतं.
http://maagevalunpahataana.blogspot.com
हं! छान!. पण
हं!
छान!. पण ब-याच पेशन्टसची ओळख नाही पटली मला. माझे राउंड्स कमी पडतात ना 
हे जे काही
हे जे काही आहे ते अशक्य धमाल आहे

मनापासून धन्यवाद!
-तू
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
Pages