खांदेरी उंदेरी किल्ल्यावर जाण्यासाठी माहिती हवी आहे (अर्थात हा उपदव्याप पावसाळा संपल्यावरच करणार आहे)

Submitted by नानुअण्णा on 15 July, 2016 - 09:02

खांदेरी उंदेरी किल्ल्यावर जाण्यासाठी माहिती हवी आहे

कुणाकडे स्थानिक बोट वाल्याचा दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनी आहे का? थळच्या

दीपगृह बघण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट ची परवानगी घ्यावी लागते असे काही लेखामध्ये लिहिले आहे. ती कुठे घ्यायची यह बद्दल सुद्धा माहिती हवी आहे.

अर्थात हा उपदव्याप पावसाळा संपल्यावरच करणार आहे.. धन्यवाद

जालावर शोधले.... सापडले नाही ...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद ..

"दुर्गवीर" हा भ्रमणध्वनी क्रमांक फिशरमेनचा, बोटवाल्याचा आहे की ट्रेक आयोजित करतात त्यांचा आहे ?

दुवे बघतो ......

हे दुवे पुन्हा पालथे घातले ...
परंतु , प्रश्न टाकण्यामागे हाच हेतु होता की खांदेरी आणि उंदेरीला जाऊन आलेल्या शिलेदारांकडून
बोटवाल्यांची किंवा कोळी बांधवांची माहिती म्हणजे भ्रमणध्वनी मिळाले तर शोधाशोध करावे लागणार नाही .
तसेच मुंबई पोर्ट ट्रस्टची परवानगी देखील कुठून मिळते ते कळाले तर अर्धे काम झालेच, मग मोहीम ..

जे भ्रमणध्वनी मिळाले आहेत तिथे संपर्क करून बघतो

पुन्हा धन्यवाद