११:११

Submitted by बन्या on 30 June, 2016 - 01:54

गेल्या काही वर्षांपासून मी बघतोय दिवसभरात जेंव्हा ११ : ११ वाजतात ( दुपारी /रात्री/)तेंव्हा माझे लक्ष अपोआप घड्याळाकडे , मोबाईल कडे , बाहेर असेन तर तिथे एखाद्या दुकानात जाते. तेंव्हा तिथे ११:११ वाजलेले असतात
असेच १:११ . ४ :४४ वाजतात तेंव्हाही होते

काय कारण असू शकेल यामागे ?

इतर कुणाला असे अनुभव आले आहेत काय ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या प्रश्नात काहीतरी वेगळे वाटले म्हणून मी गुगल करून पहिले, आणि चक्क अशी केस असणारी बरीच लोक सापडली कि

http://www.collective-evolution.com/2015/10/31/have-you-been-seeing-1111...

हि लिंक वाचून बघा

पण भारतीय ज्योतिष काय म्हणते तेही वाचायला आवडेल

3:13

माझी फार फेवरेट वेळ आहे.
११:११ मोबाईलवर हटकून बघितले जातातच बर्‍याचदा.
आणि ज्यादिवशी बघते तो दिवस अतिशय धावपळीचा /स्ट्रेसफुल /फुल्ल ओपिडी असणारा जातो.

एखाद्या दिवशी हे नको असं वाटत असेल तर मुद्दाम मोबाईल अवॉईड करायला जावं तर हटकून कुठला तरी फोन येतो ११:१० ला की ठेवताना बरोबर ११:११ वाजलेले दिसतात.

मलापण वाटत होतं, मलाच असं होतं का म्हणून!
Happy

आपलं लक्ष बर्याच वेळा जात असतं घड्याळ/ मोबाइलकडे, पण आपल्या लक्षात अशा वैशिष्ट्यपूर्ण वेळा राहतात, हेही कारण असू शकेल

मी गेले तीन सव्वातीन महिने माझ्या घड्याळात पावणेबारा वाजलेले बघतोय.

कारण घड्याळ्याचेच बारा वाजललेत. सेल संपल्याने बंद पडलेय.

पण तरीही दरवेळी, अगदी संध्याकाळची वेळ का झाली असेना, घड्याळ पाहताच आईग्ग बारा वाजत आले म्हणून दचकतोच.

हल्ली हली तर हे दचकणे ईतके सवयीचे झालेय की ते मी स्वप्नातही घेऊन गेलोय. म्हणजे बघा हं असे स्वप्न पडते की माझी बाराची ट्रेन आहे आणि मी स्टेशनपासून लांब कुठेतरी अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. अचानक घड्याळ बघतो तर आईचा घो पावणेबारा.. मग समोर ट्राफिकच ट्राफिक आणि मी हतबल..

कधी ट्रेनच्या जागी बाराचा शाहरूख नाहीतर सईच्या पिक्चरचा मॅटनी शो असतो ज्याची मला सुरुवात चुकवायची नसते, तर कधी गर्लफ्रेंडला बाराला भेटायचा टाईम दिलेला असतो.. काही नाही तर ते आपले ईंजिनीअरींगच्या पोरांचे फेमस स्वप्न, नऊ ते बाराचा पेपर.. लिहून लिहून हातात गोळे आलेत आणि मध्येच हातातल्या घड्याळावर नजर जाताच आईच्या गावात.. अर्धा पेपर अजून बाकी आहे.. आता लागली केटी.. दचकून जागा होतो..

घड्याळात सेल टाकताच ते चालू लागेल वेळ धावू लागेल आणि माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल याची कल्पना आहे मला.. पण तो माझा मानसिक पराभव होईल म्हणून तसे करत नाहीये.. आणखी काही उपाय

मनगटावरचेच आहे. सेल घालायचा आळस नडला आधी. आणि आता चालू घड्याळ बघायची इच्छाच मरून गेलीय. वेळ पावणेबाराला थांबलेली बघून बरे वाटते. आपले बारा कधीच वाजणार नाहीत असा सकारात्मक विचार करायचा प्रयत्न करतोय. पण अजून तितकेसे ते जमत नाहीये. बाकी घड्याळ हाताला शोभते छान म्हणून रोज न चुकता घालतो. वेळ तसाही घरी भिंतीवरच्या घड्याळात, ऑफिसात डेस्कटॉपवर आणि येता जाता प्रवासात मोबाईलमध्ये समजतोच.

बरं झालं सांगितलंस.
म्हणजे तुझा मानसिक पराभव व्हायला नको म्हणून मी फ्लो चार्ट काढायला घेतला होता.
घड्याळ- मग तीन पर्याय- मनगटी, भिंतीवरचे, टेबलावरचे.
मग भिंतीवरचे असेल्तर - दोन पर्याय. इ. इ.
तर आता काम सोपं झालं.
मनगटी घड्याळाच्या पुढचा फ्लोचार्ट तयार करते.

फॉस्सिल की काहीश्या ब्रांडचे आहे. गिफ्टेड घड्याळ आहे माझ्यासारखेच. मुद्दाम सांगणार नव्हतो मी तुम्हाला हे की गर्लफ्रेंडने दिलेली गिफ्ट आहे. नाहीतर अच्छा तरीच म्हणत बंद घड्याळही मी तिच्या भितीने घालतो असा निष्कर्श तुम्ही काढला असता. पण शेवटी तुम्ही बोलण्यात फसवून माझ्याकडून ही माहीती काढलीच Sad

१:११
असं माझ्याही बाबतीत बर्याचदा होतं............पण म्हणलं कशाला उगीच कोणाला सांगायला जा...
हा धागा पाहुन गम्मत वाटली...

ऋ, अरे काय लिहितोस काय?
आपले बारा कधीच वाजणार नाहीत असा सकारात्मक विचार करायचा प्रयत्न करतोय>> Lol
मानसिक पराभव>> अरे ए
गिफ्टेड घड्याळ आहे माझ्यासारखेच>>> म्हणजे काय? तु गिफ्टेड आहेस?

सस्मित हो.. माझ्यातले सारे गुण, टॅलेण्ट वगैरे जे काही थोडेफार आहेत ते गॉड गिफ्टेड आहेत. त्यात माझी स्वताची काही मेहनत नाही Happy