flat भाड्याने द्यायचा असेल तेव्हा ?

Submitted by मया on 28 June, 2016 - 04:13

मला यातील काही माहिती तुमच्या कडून हवी आहे काही प्रश्न तुम्हाला विचारतो तसेच तुम्ही आजून काही सुचवलात तरी चालेल जेणे करून पुढे त्रास होणार नाही

१) मी फ्लॅट १ वर्षांसाठी भाड्याने देत आहे त्याचा कागद बनवून घेत आहे तो मी देईन त्यात काही खास गोष्टी नमूद करू तर सांगा.
२) माझ्या बिल्डिंग च्या आजू बाजूवाल्यानी माझ्या कडून NOC मागितली आहे पोलीस स्टेशन मधून या बाबत मला काही माहिती नाही कोणाला माहीत असल्यास सांगावे
३) बिल्डिंग चा maintenance मालक भरतो की भाडोत्री ते सांगावं
४) तुम्हाला आजून काही सुचवायचं आहे तरी सांगा म्हणजे मी काळजी घेईन

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी फ्लॅट भाड्याने दिला तेव्हा खालील गोष्टी केल्या :

१. ११ महिन्याचा भाडेकरार
२. पोलिस स्टेशन मध्ये भाडेकरूची माहिती अर्ज सबमीट केला : हिच्या बदल्यात NOC मिळते
३. बिल्डिंग चा maintenance मालक भरतो की भाडोत्री ते सांगावं >> हे तुमच्या भाडेकरारामध्ये ज्याप्रमाणे ठरलं असेल तसं.
४. भाडेकरूची माहिती बिल्डिंग च्या सोसायटीमध्ये हि दिली.
५.. भाडेकरूचे आय-कार्ड (नोकरीच्या ठिकाणचे), आधारकार्ड, गावचा पत्ता, फोन नंबर अशी माहिति हि घेतली.

अजून काही आठवेल तसे लिहिते.

आमच्या सोसायटीमध्ये ज्या फ्लॅटमधे भाडेकरू राहतात त्या फ्लॅटचा मेंटेनन्स रुपये २००/- ने अधिक आहे.
काही मालक लोक पुर्ण मेंटेनन्स स्वत: भरतात, काही जण अर्धा अर्धा आणि काहीजण पुर्णपणे भाडेकरूवर सोपवतात.
माझ्या मते मालकाने भाड्यातून मेंटेनन्स आकारावा आणि स्वतः सोसायटीत भरावा.
जेणेकरून भाडेकरू कडून मेंटे. भरण्यात हलगर्जीपणा व्हायचा प्रश्न उरणार नाही. मेंटे देण्याच्या निमित्ताने सोसायटीच्या चेअरमन, सेक्रेटरीशी टच राहिल. भाडेकरूबाबत अधिक माहिती मिळेल.

चित्रा : तू दिलेली माहिती लाख मोलाची होती त्याबद्दल धन्यवाद आजून काही सांगायचं असेल तर सांग
दक्षिणा : मेंटेनन्स मध्ये कुठल्या गोष्टी नमूद केल्या आहेत ते बघतो आणि ठरवतो.
सोन्याबापू : झालं सगळं इथ्ये माहिती मिळवायची आणि नंतर कामाला लागायचं

भरपूर फायदा होतो मात्र मायबोली चा

लीव्ह लायसन्सला काहीही नियम नाहीयेत हो.
तुम्ही हवे तेवढे पैसे हापसा भाडेकरूकडून कोण तुम्हाला विचारणार नाहीये.
टॅक्स भरायचा नसेल तर अर्धे भाडे चेकने आणि अर्धे भाडे कॅश (संपूर्ण वर्षाचे एकदमच) असे घ्या.
गरजवंताला अक्कल नसते त्यामुळे तो हे ही मान्य करतोच.
अव्वाच्यासव्वा भाडे घेऊन वर परत मेंटेनन्स चार्जेस, घर सोडताना क्लिनिंग चार्जेस, सगळी बिले भरली जाईपर्यंत डिपॉझिटची अर्धी अमाऊंट अडकवणे काहीही क्लॉजेस घाला तुम्हाला कोणी अडवलेले नाही.
रजिस्ट्रेशनचा खर्चही घ्या भाडेकरू कडून.

घराला ग्रिल नाही, घरात पाणी गळतं, अमुक तमुक दुरूस्ती.. भाडेकरूला हवे तर करून घ्यावे त्याने नाहीतर रहावे तसेच. तुम्ही बोटही उचलायला बांधील नाहीत कायद्याप्रमाणे. तसा क्लॉजही घालू शकता हवा तर रजिस्ट्रेशनमधे.

परत तुम्हाला नवीन आणि मोठा भाडेकरू मिळाला कापायला आधीचे अ‍ॅग्रीमेंट संपायच्या आत तर द्या ३० दिवसांची नोटीस. ३० च दिवसांची नोटीस असंही लिहून घ्या अ‍ॅग्रीमेंटमधे. हवंतर १० च दिवसांची नोटीस असा क्लॉज लिहा. मग अजूनच सोप्पं.

लक्षात ठेवा ४ भिंतीच्या आतली जागा तुमची आहे आणि भाडेकरू हा गरजवंत आहे. त्यामुळे काहीही करा सगळं कायदेशीरच आहे.