ढेकणावर औषध

Submitted by प्रविण राऊत on 27 June, 2016 - 16:07

पुण्यात आल्यावर समजले ढेकूण म्हणजे काय।
लैच बेक्कार हाय हे सगळंच
काही केल्या कमी होत नाहीयेत ।
काहीतरी औषध सांगा ।।

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तीन वर्षांपुर्वी आमच्याकडे तर इतके झाले होते की आम्हीच गेस्ट होतो घरात. फाडून खायचे. शेवटी एका एक्सपर्ट केमिस्ट्रीच्या पोस्टग्रॅच्युएट मैत्रिणीने उपाय दिला आणि सर्व च्या सर्व ढेकूण एक महिन्यात गायब झाले. मग पेंटिंग केले आणि घर नॉर्मल परिस्थितीत आले. बाहेरून कुणी आले ना की मी आधी त्यांच्या शरीरावर ढेकुणसदृश बारीक हालचाल दिसत तर नाही हे नकळत पहात असते.

उपाय पाहिजे असेल तर मेसेज करा.

परेलला एक इफेक्टीव औषध मिळते. माझ्या घरी वापरलंय. वास वैगेरे आजिबात नाही त्यामुळे लहान मुलांसाठी पण सेफ आहे. आम्ही घरी वापरलं तेव्हा माझा मुलगा दीड महिन्याचा होता. औषध वाल्या काकांनी सांगितलं की त्याला कुठेही नेण्याची गरज नाही. काहीही त्रास होणार नाही. आणी ते खरंच होतं.
२ वर्षात अजुनही ढेकुण नाहीत.

ही जाहिरात नाही. स्वानुभव आहे.

बरोबर! परेलला औषध मिळते...
नो साइड इफेक्ट...
परेल नाक्यावर रेनबो नावाचे कपड्याचे दुकान आहे त्याचे बाजूला स्वप्नपूर्ती सोसायटी आहे.
त्याच्या 2nd floor ला हे औषध मिळते... पाहिजे असेल तर मेसेज करा.
शोधून नंबर पाठवून देईन..

धन्यवाद सस्मित आणि नितिन,
त्यान्च्याकडे उन्दिरान्साठि औषध मिळते का?

धन्यवाद निधीजी,
आपण दिलेला दुवा वाचला पण तो एक मनोरन्जन करणारा धागा आहे त्यात माझ्या प्रश्नाचे उत्तर नहि मिळाले,असो धागा सुचव्ल्याबद्दल धन्यवाद.

कोल्हटकरांच्या सुदाम्याचे पोहे यात उपाय आहे.

अफू , बचनाग व कुचला यांची पूड सापाच्या विषात खलून ढेकणाना चमच्याने भरवावी.

हो त्यांच्याकडे उंदीर तसेच पुढील प्रकारची औषधे मिळतात उदा. उंदीर झुरळ, डायबेटिस, पाइल्स, वात, उवा असे अनेक प्रकार...

चमच्याने नाही भरवायची.:हाहा: तर तोंड उघडुन त्यात भरायची. भयानक विनोदी धडा होता तो.

बाय द वे, ढेकणांचे औषध फवारताना ही खालील कविता म्हणावी, औषध जास्त प्रभावी ठरेल.

या ढेकणाने मजला पिसाळले
ढेकूण झाले घरात म्हणून गेलो मी रानात
तिथे जाऊन बघतो तर ढेकूण माझ्या कानात
या ढेकणांनी...
ढेकूण झाले घरात म्हणून गेलो मी वेशीत
तिथे जाऊन बघतो तर ढेकूण माझ्या मिशीत
या ढेकणांनी...
ढेकून झाले घरात म्हणून गेलो मी वाडीत
तिथे जाऊन बघतो तर ढेकूण माझ्या दाढीत
या ढेकणांनी...

रश्मी, Lol

बर्‍याच दिवसांनी ही कविता ऐकली. पूर्वी आमच्या आऊसाहेब अ‍ॅक्टींग करून म्हणून दाखवायच्या. बहुतेकदा आम्हा भावंडांपैकी कोणी काही कारणाने फुगून बसले असेल, तर त्याला हसवण्यासाठी. हहपुवा नुसती.

अरे ही कविता मला सातीने लिहुन दिली होती.:फिदी: आमच्या शेजारची लहान मुले हे गाणे आणी कुठले तरी बाबू-बेंबीचे गाणे म्हणायचे ते आठवल्यावर मी इथे विचारले तेव्हा सातीने माबोवर ही कविता टाकली होती.:स्मित:

तीन वर्षांपुर्वी आमच्याकडे तर इतके झाले होते की आम्हीच गेस्ट होतो घरात. फाडून खायचे. शेवटी एका एक्सपर्ट केमिस्ट्रीच्या पोस्टग्रॅच्युएट मैत्रिणीने उपाय दिला आणि सर्व च्या सर्व ढेकूण एक महिन्यात गायब झाले. मग पेंटिंग केले आणि घर नॉर्मल परिस्थितीत आले. बाहेरून कुणी आले ना की मी आधी त्यांच्या शरीरावर ढेकुणसदृश बारीक हालचाल दिसत तर नाही हे नकळत पहात असते.
उपाय पाहिजे असेल तर मेसेज करा.
Submitted by डीविनिता on 28 June, 2016 - 01:3 pls mala hya saathi tumi konta upay kela te saana aami gele 10 varsh ya trasat aahot pls mala upay saanga email - swatisawant3031@gmail.com

वरिल बर्‍याच प्रतिसादात उपाय पाहिजे असेल तर मेसेज करा. हे वाचले
जर उपाय किंवा औषध ईथे दिले तर त्याच्या उपयोग बाकीच्यांनापण होऊ शकतो.
काही वर्षांपुर्वी आमच्या कडे पण हे अतिथी आले होते. जाता जाईना. सासरेबुवांनी मग खटनील आणून दिले. अजूनतरी परत पाहूणचाराला आले नाहीत. (*टच वूड )

Dhekanasathi che aushadh pahije urgent ani strong parel madhe konakade bhetate tyancha kahi contact number milala tr khup upkaar hotil. Ratriche ३ vajale ahet tyaveli message kartoy mhanje kiti adchan asel bagha tumhi

Cypermethrin पाण्यात टाकून फवारा आणि २ तास घर पॅक करून ठेवा. खाद्यपदार्थ झाकून ठेवा.

ढेकूण जाण्यासाठी बेकिंग सोडा बेडला, लाकडी सामानाला लावून ठेवावा असे वाचलेय.
पण तो काही काळाने परत लावावा. पेशन्स ठेवून करायचा उपाय आहे हा!

पंचवीस वर्षांपूर्वी पुणे येथे माझ्या सासुरवाडीला पुष्कळ ढेकूण झाले होते. कोणत्याही उपायाने ते जात नव्हते. त्याकाळी नुकतेच 'लक्ष्मणरेखा' हा झुरळ घालवण्यासाठीचा खडू बाजारात आला होता. मी सहज ढेकणांवर प्रयोग करून पाहू म्हणून तो सर्व घरभर, पलंगावर, गाद्यांवर मारला. आणि काय आश्चर्य संपूर्ण घरातूनच ढेकणांचा पत्ता कट झाला. ढेकूण अगदी औषधालाही उरला नाही. त्यांच्या शेजाऱ्यांनाही ही युक्ती सांगितली. तिथूनही ढेकूण पसार झाले. Lol

गेल्याच महिन्यात माझ्या घरात घरभर लाल मुंग्याच मुंग्या झाल्या होत्या. दोन चार कोपऱ्यात छिद्रे करून त्यांनी वारूळ केले होते. मुंग्या फरशीखालून रोज सिमेंट वाळूचे कण बाहेर काढून ढीग करत होत्या. मी परत 'लक्ष्मणरेखा'चा खडू घेऊन आलो आणि जमिनीच्या सर्व सांधी कोपऱ्यात आणि मुंग्यांच्या वारूळावर खडू मारला. दोन दिवस मेलेल्या मुंग्यांचा खच्चून ढीग पडत होता. बाकीच्या ज्या सैरभैर पळाल्या त्या सर्व गादी पलंगावर, भिंतीवर, वॉर्डरोबमध्ये चढून बसल्या. पुढील तीन दिवस आम्ही घरातले (पाहुणे पकडून) पाच सहा जण एकमेकांच्या अंगावर फिरणाऱ्या मुंग्या वेचून वेचून चिमटीत पकडून काढत होतो. आणि शेवटी सात दिवसांनी सर्व शांत झालं. आता पुन्हा घरात मुंगी औषधालाही उरली नाही. भीती वाटते, ही वादळापूर्वीची शांतता आहे की काय कोण जाणे? कदाचित मुंग्या परत सर्व सज्जतेने आक्रमणाची तयारी करीत असतील. मी माबोवर जास्त दिवस फिरकलो नाही तर मला शोधत घरी या. मुंग्यांनी आम्हाला धारातीर्थी पाडलेले असू शकेल!
Lol

तर तुम्हीही 'लक्ष्मणरेखा'चा खडू वापरून पहा. मला दुवा द्याल. पण लक्ष्मणरेखा हं! त्याच्यासारखाच मिळणारा 'Crazy lines' नाही.

माझ्या घरात शिरलेल्या विविध पशु, पक्षी आणि किटकांशी मी दिलेली झुंज खाली वाचा.

http://sachinkale763.blogspot.com/2018/01/blog-post_14.html?m=1