श्रीकृष्ण नारद संवाद

Submitted by Mandar Katre on 17 June, 2016 - 00:59

महाभारत घडून गेल्यावर भगवान श्रीकृष्णाच्या वृद्धावस्थेत नारद त्यांना भेटायला आले होते . त्याचे सविस्तर वर्णन बहुधा भागवतात आहे. त्यावेळी श्रीकृष्ण व नारद यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली . त्यामध्ये कृष्णाने आपले मुलगे आपले ऐकत नसल्याबद्दल व बहुधा pradyumn या कृष्णपुत्राच्या उच्छृंखल पणा बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती . त्यावर नारदानी आता आपले अवतारकार्य संपत आलेले असून पृथ्वीवरील मानवासारखे आपण पुत्रादिकांची चिंता करणे सोडून निजधामी गमन करण्याची तयारी करावी असा उपदेश केला . हा बहुधा कलियुगाच्या प्रारंभीचा काल असावा .

या सर्व प्रकाराबाबत मराठी वेबसाईट वर अथवा साहित्यात कुठे उल्लेख /चर्चा झालेली आहे का ? माबोकरांपैकी कोणास याबाबत काही माहिती असल्यास जरूर चर्चा करावी . केवळ जिज्ञासेपोटी हा प्रश्न विचारला आहे.

धन्यवाद

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

*

कथेमध्ये श्रीकृष्ण यांचा मुलगा बहुधा सांब हा त्याच्या भावंडाबरोबर ऋषिमुनिंची टिंगल करतो.ते रागावुन शाप देतात आणि त्यामुळे यादव वंशिय आपापसात हाणामारी करून नष्ट होतात। व श्रीकृष्ण पारध्याच्या बाणाचा बळी ठरतो. अशी कथा आहे.

सविस्तर कथा कुठे मिळेल?
<<

कात्रे तुम्ही शिवाजी सावंत यांची 'युगंधर' कादंबरी वाचा,
त्यामध्ये वर विजय टी यांनी उल्लेख केलेली कथा सविस्तर पणे लिहिली आहे.