Submitted by प्रकाश घाटपांडे on 25 May, 2016 - 00:35
कुणाच्याही आयुष्यात विवाह ही मोठी घटना असते. एखादे स्थळ आल्यावर हा निर्णय घेताना ती व्यक्ती व कुटुंब अनेक बाबी विचारात घेते. त्यापैकी पत्रिका जुळणे हा एक मुद्दा असतो. आपण स्वत:च्या किंवा मुलामुलीच्या नातेवाईकांच्या लग्नात पत्रिकेला किती महत्व देतो हे जाणुन घेणे हा उद्देश या कौलाचा आहे.पोल ची सुविधा इथे अस्तित्वात नाही. पण खालील पर्याय निवडू शकता
१) पत्रिका पहायचीच आहे
२) आम्हाला पत्रिका पहायची नाही.परंतु समोरच्यांना पहायची असल्यास आमची ना नाही
३) आम्हाला पत्रिका पहायची नाही व समोरच्यांनाही पहायची नाही असे स्थळ हवे आहे.
४) आम्हाला जुजबी पत्रिका पहायची आहे.
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एखादे स्थळ आल्यावर म्हणजेच
एखादे स्थळ आल्यावर म्हणजेच ठरवून लग्न करताना
१) पत्रिका पाहून लग्न करावे
पुढील चार पर्यायांवर क्लिक
पुढील चार पर्यायांवर क्लिक करता येइल.
पत्रिका पहायचीच आहे
आम्हाला पत्रिका पहायची
आम्हाला पत्रिका पहायची नाही.परंतु समोरच्यांना पहायची असल्यास आमची ना नाही
आम्हाला पत्रिका पहायची नाही व
आम्हाला पत्रिका पहायची नाही व समोरच्यांनाही पहायची नाही असे स्थळ हवे आहे.
आम्हाला जुजबी पत्रिका पहायची
आम्हाला जुजबी पत्रिका पहायची आहे.
प्रकाश, पोलची सोय नाही पण
प्रकाश,
पोलची सोय नाही पण असे चार पर्याय दिले तर लोक हवे त्या पर्यायावर क्लिक करु शकतात. आणि तुम्हाला तो "काउंट" दिसेल.
मी चायनीज पत्रिका पाहीन. माझा
मी चायनीज पत्रिका पाहीन. माझा चायनीज पत्रिकेवर विश्वास आहे आणि ती क्षणान ऑनलाईन पहाता येते ये उत्तम.
चायनीज वस्तू टिकत नाहीत,
चायनीज वस्तू टिकत नाहीत, चायनीज पत्रिकेवरून केलेले विवाह टिकतील का?
काहीही.. १०० रुपयात तुम्हाला
काहीही.. १०० रुपयात तुम्हाला महाल हवा असतो तो जर मिळाला तर कागदी पत्त्यांचा असेल. ज्या चानी वस्तू तुम्ही बाहेर विकत घेता त्या फार स्वस्त असतात. तशी त्याची लाईफ असते.
चायनीज पत्रिका मी अनेकांच्या पाहिल्या आहेत आणि मी ते जोडीदार बघत आहे.
मनस्मि म्हणतात तसच करा...वरचे
मनस्मि म्हणतात तसच करा...वरचे चार पर्याय देऊन काउंटर क्लिक करायला सांगा
विश्वास नाही म्हणून आजपर्यंत
विश्वास नाही म्हणून आजपर्यंत आमच्या घरात कोणाचीही पत्रिका पाहून लग्न ठरविले गेले नाही, माझे सुद्धा ......
काहीही फरक पडत नाही हा स्वानुभव आहे , माझ्या लग्नाला ८ वर्षे झाली आहेत , एक छानसे लेकरु आहे. एकदा मने जूळली कि पत्रिका हा निव्वळ कागद आहे .
कुणाच्याही पत्रिकाबद्दलच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही पण उद्या मुलांची पसंती पत्रिकेमुळे बदलावी लागत असेल तर तो कागद काही कालावधीसाठी बाजूला ठेवणे उत्तम
हर्ट ते विधान गंमतीने केले
हर्ट ते विधान गंमतीने केले होते. तुम्ही भलतेच हर्ट झालात बुवा.
मी प्रत्येकी प्ल्स १ दिलेत हो
मी प्रत्येकी प्ल्स १ दिलेत हो
त्यातच काय समजून घ्यावे 
कृपया मनस्मी ने दिलेल्या
कृपया मनस्मी ने दिलेल्या पर्यायांवर क्लिक करावे व अधिक भाष्य स्वतंत्र करावे.
आम्हाला पत्रिका पहायचीच
आम्हाला पत्रिका पहायचीच नाही आणि म्हणूनच द्यायची सुद्धा नाही.
कारण ते विरोधाभासी वागणं असेल.
जिथे विचारच जुळत नाही तिथली सोयरीक कशाला हवी?
इथूनच आपल्या विचारांशी तडजोड म्हणजे कायमच तडजोड.
हे. आ. म.
सगळे तीसरा पर्याय निवडतात
सगळे तीसरा पर्याय निवडतात प्रत्यक्षात परिस्थिति वेगळी असते...
झंपी आपण ज्याला विरोधाभास
झंपी आपण ज्याला विरोधाभास म्हणता तो समोरच्याचा मताचा आदर किंवा लवचिकता असेही म्हणता येते.
मताचा आदर हा इथे लागू होत
मताचा आदर हा इथे लागू होत नाही. किंवा मताचा आदर आहे म्हणूनच नकार द्यावा.
इथे लग्न ह्या संदर्भात विचारांशी सहमती लागते.
तुमचे जीवनाविषयी काही ठाम विचार आहेत आणि एक नवीन जीवन वाटचाल सुरु करतानाच
पत्रिका ह्या विचारांना फाटाच देत असेल तर हि तडजोड असेल.
म्हणजे तुम्हाला लग्न जुळवताना, व्यक्तीचे विचार महत्वाचे वाटतात तर समोरच्याला पत्रिका मिलन. मग हि तफावत बरेच काही सांगून जाते.
तसेही, आपल्या इथे पत्रिकाचा गैर वापरच ज्यास्त होतो.
"विवाह ठरविताना" असे
"विवाह ठरविताना" असे म्हणण्या ऐवजी, "प्रेम करताना/करु पहाताना" किंवा "सैराट बनताना" समोरच्या ऑपोजिट सेक्स वाल्या व्यक्तिची पत्रिका पहावी वा नाही.... असा काहिसा प्रश्न विचारला अस्ता तर तो "वास्तवाच्या" अधिक जवळ गेला अस्ता, नै?
पत्रिका फुकटात कोणी बनवुन देत
पत्रिका फुकटात कोणी बनवुन देत असेल तर गंमत म्हणुन बघेन पण त्यावर विश्वास ठेऊन निर्ण्य घेणार नाही.
पर्याय ३ शी सहमत.
प्रेमविवाहात पत्रिकेचा नियम
प्रेमविवाहात पत्रिकेचा नियम लागू होत नाही असे काही ज्योतिषी म्हणतात.
बाळ ऋन्मेष चा पोळ हक्क
बाळ ऋन्मेष चा पोळ हक्क हिरावून त्याच्या आवडीच्या विषयावर धागा काढल्याबद्दल निषेध
>>>> प्रेमविवाहात पत्रिकेचा
>>>> प्रेमविवाहात पत्रिकेचा नियम लागू होत नाही असे काही ज्योतिषी म्हणतात. <<<<

नै, पण कायेना प्रकाशराव, आमच्याकडे बहुतेक पालक लोक विचारतातच, की काय हो आमचा बाळ्या / बाळी अॅरेंज्ड म्यारेज करणार की लव्ह म्यारेज (म्हणजे कुठ लफड तर करणार नाही ना इतके स्पष्ट देखिल विचारतात)
पण अजुनपर्यंत तरी कोणी व्यक्ति, अमक्या मुलिबरोबर वा तमक्या मुलाबरोबर प्रेम करु का, असे विचारायला नै आलेत.....
नि:ष्कर्ष असा की, प्रेमात पडताना कोणीही "कुंडली" बघुन प्रेमात पडत नाहि. तिथे कुंडलीवाले कुडमुडे ज्योतिषी (आमच्यासारखे), कसलाही "अडथळा" आणत नाहीत.
रहाता राहिला प्रश्न अॅरेन्ज्ड म्यारेजेस चा......
तर तिथेही स्थळे बघताना, आधीच, वर वा वधु चे उत्पन्न किती/घरदार आहे वा नाही/अवलंबुन किती, उंचि किती इंच कमी वा जास्त, लग्नाच्या बहिणी किती, शिक्षण किति, रहातो कुठे, नातेवाईक कोण कोण, अशा असंख्य बयादी तपासुन मगच बघण्याचे कार्यक्रम आधी होतात. नंतर कुंडली बघायचे बहुतेक वेळेस "सोपस्कार" उरकले जातात. आता आधीच्या इतक्या बाबी तपासतात, हल्ली तर त्यासही खाजगी गुप्तहेरांची मदत घेतली जाते म्हणे, तर तिथे बिचारे आमच्यासारखे ज्योतिषी कुठुन काय काड्या घालणार? नै का?
तेव्हा साप साप म्हणून भूई धोपटण्या ऐवजी, स्थळाची आधीची चौकशी नीट साग्रसंगित करावी हे उत्तम.
एक आहे, की अशा गाळिव चाळण्यांमधुन सुटू न शकलेले, लटकत राहिलेले ठोकळे बाळ/बाळ्या व त्यांचे पालकच, याचे (म्हणजे लग्न न जमु शकल्याचे) खापर मात्र सर्रास ज्योतिषावर फोडताना दिसतात.
तसेही कुंडली मेलना करता आजवर मला जास्तित जास्त दक्षिणा रुपये पन्नास इतकीच मिळालि आहे, एरवी तर दहाच्या दोन तिन चुरगळलेल्या नोटा हीच त्या सल्ल्याची किंमत अस्ते..... तर आयुष्याचा जोडीदार निवडण्याकरता दहावीस रुपड्या फेकुन घेतलेल्या सल्याला यजमान तरी कितीक गंभिर पणे घेत असतो याबद्दल मला शंकाच आहे.... उगाचच आपले कुडमुड्यांना वेठीस धरुन धोपटत सुटायचे....
इथे मी मुद्दामहुन "ब्राह्मण" हा शब्द टाळला आहे हे सांगणे आलेच ओघाने.... कारण हल्लीच काय, पूर्वापार कुडमुड्या ज्योतिषात निव्वळ ब्राह्मणांची मक्तेदारी कधीच नव्हती......
हां, आता एका प्रश्नाला किमान हजार रुपये असे दर लावणार्यात कुणाची मक्तेदारी आहे ते स्वतंत्रपणे शोधावे लागेल बर्का.....
>>> तसेही, आपल्या इथे
>>> तसेही, आपल्या इथे पत्रिकाचा गैर वापरच ज्यास्त होतो. <<<
ते कसे? याची उदाहरणे द्याल का? जरा विस्कटून सांगा की.....
गैरवापर काय स्वरुपात होतो, कोणाकडून होतो, का होतो, कितीवेळा होतो, कितीवेळा झालेला अनुभवलाय वगैरे.....
लिंबुटिंबू.. तुम्हाला
लिंबुटिंबू.. तुम्हाला संपर्कातून एक मेल केली आहे. पाहाणार का प्लीज?
आमच्यात पत्रिका बनवत नाहीत.
आमच्यात पत्रिका बनवत नाहीत.
तसेही, आपल्या इथे पत्रिकाचा
तसेही, आपल्या इथे पत्रिकाचा गैर वापरच ज्यास्त होतो >>> गैरवापर एका अर्थाने माहिती आहे. मुलगा/मुलगी आवडली नसेल किंवा स्थळ रिजेक्ट करायचं असेल तर हे हुकमी कारण म्हणून वापरलं जातं.
लिंबुजी व्यावहारिक गोष्टी
लिंबुजी
व्यावहारिक गोष्टी सर्वच लोक विचारात घेतात त्यात पत्रिकाचा प्राधान्यक्रम किती? हा प्रश्न पत्रिका पाहून लग्न करणार्यांमधे येतोच.
मुलगा/ मुलगी क्लिक झाली नाही असे सांगण्यापेक्षा पत्रिका जुळत नाही असे सांगणे नम्र वाटते. लोक समजून जातात. कधी कधी आमचे गुरुजी म्हणतात पत्रिका जुळतीये असे म्हटले जाते. त्यावर पण आमचे गुरुजी म्हणतात जुळत नाही असे उत्तर देउन वाट लावली जाते
मला गर्लफ्रेंड नसती आणि मी
मला गर्लफ्रेंड नसती आणि मी ठरवून लग्न करायच्या भानगडीत पडलो असतो तर आवर्जून पत्रिका बघितली असती.
आणि हट्टाने जिथे जुळत नाही तिथेच लग्न केले असते. मला अशी बंडखोरी करायला खूप आवडते. अर्थात समोरून त्या मुलीचीही तशी तयारी असली पाहिजे.
किंवा मग मंगळ असलेल्या मुलीशी लग्न करायला आवडले असते. माझ्या काही चांगल्या देखण्या सुस्वरुप मैत्रीणी आहेत ज्या केवळ या टंगळमंगळमुळे थांबून राहिल्या आहेत.
अवांतर - माझ्या जन्मपत्रिकेत लिहिलेय की माझ्या नशिबी दोन लग्नांचा योग आहे. आता ते एकाच वेळी की एक तुटल्यावर दुसरे हे लिहिले नाही. पण हे सांगून मी अधूनमधून माझ्या गर्लफ्रेंडला घाबरवत असतो
:हहगलो:
ऋन्मेष तुमच्या गफ्रे ला
ऋन्मेष तुमच्या गफ्रे ला पत्रिका बघायची असल्यास मग काय करणार?
गफ्रेला कशी पत्रिका बघायची
गफ्रेला कशी पत्रिका बघायची असेल? म्हणजे प्रेमविवाहात ज्यांना प्रेमविवाह करायचा आहे ते कधीच पत्रिका बघायच्या भानगडीत पडत नाहीत.
हा एक होऊ शकते, पत्रिका बघून त्यात काही निघाले तर त्यावर आधीच तोडगा शोधूया अश्या विचारांचे कोणी असू शकते. तसे असल्यास ज्याची त्याची श्रद्धा, आपण काय करणार. यात काही नुकसान नसल्यास करू द्यावे जे करायचे ते.
ऋन्मेष तुमच्या गफ्रे ला
ऋन्मेष तुमच्या गफ्रे ला पत्रिका बघायची असल्यास मग काय करणार?>>>
गफ्रेला कशी पत्रिका बघायची असेल? म्हणजे प्रेमविवाहात ज्यांना प्रेमविवाह करायचा आहे ते कधीच पत्रिका बघायच्या भानगडीत पडत नाहीत.>>>
काहीही सांगतो हा तुम्हाला
त्या दोघांनी बाहेरच्या बाहेर पत्रिका कधीच चेक केली आहे.
हा --http://www.maayboli.com/node/58748 धागा वाचा. तिथे त्याने तसे लिहिले देखिल आहे.
सोनाली - सही पकडे है,पण तो
सोनाली - सही पकडे है,पण तो येईलच काहीतरी भुक्कड स्पष्टीकरण घेऊन
गिरे मियाँ तो भी टांग उपर वाला आहे तो
विवाह जुळवताना पत्रिकेला किती
विवाह जुळवताना पत्रिकेला किती महत्व देता? >> शून्य....
शून्य महत्व देतो...
जर एखादी मुलगी आवडली तर ..पत्रिका जुळली नाही म्हणुन नकार नाही देनार..
माझ्या मते मुलगी महत्वाची, पत्रिका नाही...!!!
गिरे मियाँ तो भी टांग उपर
गिरे मियाँ तो भी टांग उपर वाला आहे तो
>>>
तुम्ही लोकं फार छळता त्याला... तो कित्ती तरी थापा मारतो एका दिवसात... सगळ्याच कशा लक्षात रहाणार त्याच्या?
पत्रिका किति बरोबर आहे त्यवर
पत्रिका किति बरोबर आहे त्यवर आहे... जन्म्वेल चुकिचि असेल धर्लि तर कय फयद...
विवाह मंडळात पत्रिका पहायची
विवाह मंडळात पत्रिका पहायची नाही असे जेव्हा लिहितात त्यावेळी ते विचारातूनच लिहिले असते असे नाही तर अगोदरच लग्न जुळवताना एवढ्या अडचणी येत आहेत / आल्या आहेत त्यात या पत्रिकेची भर कशाला? हा व्यावहारिक विचार देखील असतो.
तुम्ही लोकं फार छळता त्याला..
तुम्ही लोकं फार छळता त्याला... तो कित्ती तरी थापा मारतो एका दिवसात... सगळ्याच कशा लक्षात रहाणार त्याच्या?
मी खोटं बोलत नव्हतो. फक्त
मी खोटं बोलत नव्हतो. फक्त लपवत होतो. पण माझ्या लक्षात आले नाही की मागेच मी हे कबूल केलेले की आम्ही पत्रिका बघितली आहे. आता माझा नरो वा कुंजरोवा होईल. आणि मला स्वर्गात गर्लफ्रेंडसह प्रवेश मिळणार नाही. काही हरकत नाही. ज्या पोरांचे बालपण दक्षिण मुंबईत गेले असते त्यांना स्वर्गाचे कौतुक नसते. पण सोनाली आपले मात्र कौतुक. आपण मराठी मुलामुलींच्या अडचणी वाचून सोडून देत नाहीत तर त्या लक्षातही ठेवता
अगोदरच लग्न जुळवताना एवढ्या
अगोदरच लग्न जुळवताना एवढ्या अडचणी येत आहेत / आल्या आहेत त्यात या पत्रिकेची भर कशाला?
.>>>>
याचाच अर्थ ते लोकं पत्रिकेला जास्त महत्व देत नाहीत.
गफ्रेला कशी पत्रिका बघायची
गफ्रेला कशी पत्रिका बघायची असेल? म्हणजे प्रेमविवाहात ज्यांना प्रेमविवाह करायचा आहे ते कधीच पत्रिका बघायच्या भानगडीत पडत नाहीत
>>
हे लपवणे कसे ते पण सांगा ना प्लिज गुरूमाऊली
मी खोटं बोलत नव्हतो. >>> :P
मी खोटं बोलत नव्हतो. >>> बरं
रीया, त्याला प्रतिप्रश्न प्लस
रीया, त्याला प्रतिप्रश्न प्लस जनरल स्टेटमेंट थिअरी म्हणतात.
आणखी एक उदाहरण देतो,
समजा तू मला दुपारी दोन वाजता फोन केलास आणि विचारलेस,
हेल्लो, झोपलेलास का?
मी - हि काय झोपायची वेळ आहे का? मुंबईत एक ते चार झोपत नाहीत.
यात आता तुझा असा भास होण्याची शक्यता आहे की तुला माझ्याकडून "नाही" असे ऊत्तर मिळाले. पण प्रत्यक्षात मी तसे कुठेही स्पष्टपणे म्हटलेले नाहीये.
Kalale ka g? To khota bolat
Kalale ka g? To khota bolat navhata bare
हो हो कळालं..
हो हो कळालं..
धन्य धन्य गुरू महाराज
>>याचाच अर्थ ते लोकं
>>याचाच अर्थ ते लोकं पत्रिकेला जास्त महत्व देत नाहीत.<<
अस असून देखील पत्रिका पहाणार्या लोकांचे प्रमाण ७५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे
प्रकाशजेंच्या मताशी सहमत.
प्रकाशजींच्या मताशी सहमत. स्थळं जास्तीत जास्त यावीत म्हणून तशी पत्रिकेची अट घालत नसतील, नंतर मात्र न जुळणार्या, आवडलेल्या कोणत्याही स्थळाची पत्रिका बघितली जातेच... जिथे पहिल्या फटक्यात तन-मन-धन सगळं जुळून येतं तिथे पत्रिका मागे पडत असेल पण जिथे तडजोडीची परिस्थिती येते तिथे पत्रिका बघून घेण्यावर भर असावा....
>>> अस असून देखील पत्रिका
>>> अस असून देखील पत्रिका पहाणार्या लोकांचे प्रमाण ७५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे <<<

जिथे शारिरीक व्याधीबद्दल ही स्थिति, तिथे लग्नबिग्न बाबीत कोण हो तुमच्या त्या पुरातन ज्योतिषबितिष बाबी बघणार?
ही आकडेवारी कुठुन काढलीत?
तस अस्त, तर आमच्यासारख्या "कुडमुड्यांच्या" दाराशी रीघ लागली अस्ती.....
पण तसे होत नाही.
लग्नाच्या गाठी वरतीच जुळलेल्या अस्तात, यावरही लोकांचा विश्वास असतो.
माझ्या मते भारतातील एकुण लग्नांपैकी फार तर फार १० टक्के लोक (ती देखिल बव्हंशी उच्चवर्णियातील) कुंडली वगैरे बघुन लग्न ठरवतात.
बाकीचे जण, गोत्र (सगोत्र नको) इतकेच बघुन स्वजातीय बघुन, बाकी सर्व भर दिसणे/आर्थिक स्थिती/घरदार वगैरे वर अवलंबुन असतात. कुंडली बघणे वगैरे किस झाड की पत्ती.
बाकी जे हिंदू नाहीतच, वा हिंदू देवधर्म मानित नाहीत वा हिंदू धर्म विरोधक आहेत, ते तर कुंडलीच्या वाटेसही फिरकत नाहीत. अशांची संख्याही वारेमाप आहे.
अहो धर्म/ज्योतिष वगैरे बाजुला राहूदे, आमच्या येथिल एका किरिस्ताव स्त्रीस, पायात पेटगे/गोळे येतात म्हणून स्वानुभवसिद्ध, "बैद्यनाथचे आयुर्वेदिक महानारायण तेल" चोळून लावायला सुचवले, तर तिनी "नाक मुरडले", आमी नै असल्या (देशी औषधांच्या) फंदात पडत" असे सांगितले.
माझ्या मते भारतातील एकुण
माझ्या मते भारतातील एकुण लग्नांपैकी फार तर फार १० टक्के लोक (ती देखिल बव्हंशी उच्चवर्णियातील) कुंडली वगैरे बघुन लग्न ठरवतात.
ही आकडेवारी कुठून घेतली? की आपले वैयक्तिक मत म्हणुन सोडून द्यावे?
ती देखिल बव्हंशी उच्चवर्णियातील
तो ७५ % आकडा बव्हंशी उच्चवर्णियांतील लोकांपैकीचा असावा... =))
Pages