शिवांबु थेरपी

Submitted by सख्या on 23 May, 2016 - 03:22

दोन दिवसां<पुर्बी आनंद्कुंज कोल्हापुर नॅचरोथेरपी सेंटरला जाण्याचा योग आला. तिथल्या काही रुग्णांशी बोलणे झाले पण थेरपी मधे जे शिवा<बु घेण्याबद्दल सांगितले आहे त्या बद्दल कनफर्म काही माहीती नाही. इथे कुणी आहे का ज्यांना खरेच काही फरक फ्डलाय. तिथले रुग्ण पॉजिटीव बोलत् होते सर्व. हायपर्टेंशन आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उपयोग नक्की होतो असं म्ह्णणारे अनेक लोक प्रत्यक्ष बघितले आहेत. पण रात्रीचं जेवण डिसेंट असलं पाहिजे हा अलिखित नियम. कारण तिखट, वातुळ, मसालेदार जेवण घेतल्यास सकाळी शिवाम्बुची चव ही खूप असह्य असते असा सर्वांचा अनुभव होता. काही मेजर औषधं चालू असतील तर त्यानेही चव बदलते. कोल्हपूरचं शिवाम्बु सेंटर माझे बाबा प्रत्यक्ष बघून आले तेव्हा ते सांगत होते.

मैत्रीण ,तिचा नवरा आणि सासू हे तिघेही घेत असत.तिघांचे वेगवेगळे ग्लास ठेवले होते.तिची स्कीन सुंदर होती.मी मोरारजींनाही पाहिले आहेआमच्या कॉलेजमधे.अतिशय तुकतुकीत्,लिंबाच्या कांतीसारखी त्वचा होती.त्यावेळी त्यांचे वय बरेच होते.

मधुमेह असेल आणि किडनी डिसिज मधे घेवु नये हे शिवम्बु असे एकले आहे.>>>>> माझ्या मैत्रिणीच्या नवर्‍याला मधुमेह होता.तो शिवांबु घ्यायचा.परत सर्व डॉ.च्या सल्ल्यानुसार वागणारे होते.

जर खरच मुत्राची शरिराला एव्हढी गरज आणि फायदे असतिल तर, इतकं काँप्लेक्स शरिर बनवणार्‍या निसर्गाला/देवाला (तुम्हाल जो पर्याय आवडेल तो वाचा) अशी नैसर्गिक रचना करणे अशक्य होते का?

अ‍ॅक्चुली अग्निपंख. मलाही तेच वाटतं. अरे जे विसर्जित होतंय / विसर्जित व्हावं अशीच सिस्टीम असताना तेच पुन्हा प्यायची काय गरज? आणि त्याने स्कीन वैगेरे अतिशय छन होत असेल हे तर मला अन्बिलीवेबल वाटतं.

जर खरच मुत्राची शरिराला एव्हढी गरज आणि फायदे असतिल तर, इतकं काँप्लेक्स शरिर बनवणार्‍या निसर्गाला/देवाला (तुम्हाल जो पर्याय आवडेल तो वाचा) अशी नैसर्गिक रचना करणे अशक्य होते का?>>>>> +१.
शिवाम्बुचा अजून २ कथित फायदे:
स्वमूत्र,एका काचेच्या बाटलीत भरून बाटली उन्हामधे ठेवायची.४ दिवसांनी त्याने केस धुवायचे म्हणजे गळत नाहीत व चमकदार होतात.
मुरुमांवर ताजे स्वमूत्र लावायचे की मुरुमे नाहीशी होतात.
एकीने हे सांगितले होते,ते ऐकूनच शिसारी आली होती.

जर खरच मुत्राची शरिराला एव्हढी गरज आणि फायदे असतिल तर, इतकं काँप्लेक्स शरिर बनवणार्‍या निसर्गाला/देवाला (तुम्हाल जो पर्याय आवडेल तो वाचा) अशी नैसर्गिक रचना करणे अशक्य होते का?>>>

शिवांबुबद्दल काही माहिती नाही खरच त्याचा फायदा होतो की नाही ते. पण वरील लॉजिक निदान प्राण्यांच्या बाबतीत तरी लागू होत नाही असे वाटते.

https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/1954740

Coprophagy is performed by rodents and lagomorphs and to a lesser degree by piglets, foals, dogs and nonhuman primates. Due to the construction of the digestive system of rodents and rabbits, coprophagy is necessary to supply many essential nutrients. Bacterial synthesis of nutrients occurs in the lower gastrointestinal tract in these animals where little absorption is realized. The eating of their feces provides a method for obtaining these nutrients.

असे वाचले आहे की:
" व्हिटामिन B12 आपल्या मोठ्या आतड्यात बॅक्टेरिया पासून तयार होते, ते शरीरास मिळत नाही. आपले पूर्वज कपि coprophagy तून ते मिळवायचे. " (याच्या सत्यासत्यते बद्दल जाणकारांनी प्रकाश टाकावा.)