Sterling Holidays बद्दल माहिती हवी आहे

Submitted by सुखी१४ on 7 May, 2016 - 01:56

मंडळी नमस्कार __/\__

मला व सौ ला भटकायची आवड आहे.
आता थोडी सवड आणि पैस्याची जुळणी झालीये, त्याचवेळी Sterling Holidays यांच्या २५ वर्षांच्या membership बद्दल ऐकल.

आपल्यापैकी कोणी Sterling Holidays ची membership घेतली आहे का?

मार्गदर्शनाच्या व भल्या बुर्या अनुभवान्च्या प्रतिक्षेत...

शिवाय, दुसरी कुठली संस्था Sterling Holidays पेक्षा चांगली असेल तर कृपया कळवा...

-सुखी१४

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नो नो जर टाइम शेअर असेल तर फंदात पडू नका. ते म्हणतील तिथेच राहावे लागते. मी टाइम शेअरसाठी जाहिराती केल्या आहेत. व माझे मत त्यात पैसे गुंतवू नये असे आहे. व्यक्तिशः मला माझे फिरण्याचे व मनात येइल तिथे राह ण्याचे स्वातंत्र्य जपायाचे आहे. पण तुम्ही त्यांच्या टर्म्स नीट समजावून घ्या. व मगच इन्वेस्ट करा. अनुभवी लोकांचे सल्ले येतीलच.

तसे ही लहान वय असेल व फेमिली असेल तर ह्या ऑप्शनस नक्की बघून घ्याव्या. फॅमिली हॉलिदॅ साठी उपयुक्त असतील.