Submitted by Rama 85 on 2 May, 2016 - 10:39
७-८ दिवसान्च्या सुट्टी साठी आपण बाहेर जातो तेव्हा, कुन्डीतिल झाडान्ची किवा ग्यालरीतील बागेला पान्याचि काय सोय करता येइल???/
एके ठिकाणी कापसाच्या वाति करुन त्या पान्याच्या बाद्लीतुन कुन्डीत सोड्न्याबद्दल ऐकले आहे....कुनाला अधिक माहीती असेल तर द्या प्लिज....इतर कोनत्या प्रकारे पाण्याची सोय करता येइल का...????
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्ही कुठल्या सीझनमधे जाणार
तुम्ही कुठल्या सीझनमधे जाणार आहात ? कुठल्या प्रकारची झाडे आहेत ? कुंड्या किती मोठ्या आहेत ?
नॉर्थ इस्ट अमेरिकेत बर्याच इन्डोअर झाडांना फॉल / विंटर मधे ६-७ दिवसातून एकदा पाणी घातलेलं पुरतं . उन्हाळ्यात त्याच झाडांना दर दोन- तीन दिवसांनी पाणी घालायला लागतं. बाहेर डेकवर, पॅटिओवर असलेल्या झाडांना दिवसातून एकदा , कधी कधी ( ९० डि च्या वर असेल तापमान, अन फार उन लागत असेल तर) दिवसातून दोनदा पण घालावे लागते.
प्लास्टिकच्या बाटलीला एक अगदी बारीक छिद्र करुन त्यात पाणी भरुन ती बाटली कुंडित ठेवता येईल. प्रत्यक्ष प्रवासाला जायच्या आधी काही दिवस प्रयोग करुन पहा म्हणजे किती मोठी बाटली किती दिवस पुरेल याचा अंदाज येईल.
कापसांच्या वातींपेक्षा,
कापसांच्या वातींपेक्षा, साध्या नाड्या उपयोगी पडतील. मोठ्या जार्सना अगदी बारीक्ष छिद्रे पाडून त्यातले पाणी अगदी थेंब थेंब झाडांना मिळेल असे बघता येईल. कुंड्यांतील मातीवर पालापाचोळा पसरुन, बाष्पीभवनाने उडून जाणारे पाणी वाचवता येईल.
शक्य असल्यास एखाद्या परिचिताला, दोन तीन दिवसातून एकदा पाणी द्यायला सांगितले, तर हे सर्व वाचेल.
thanx medha and dinesh
thanx medha and dinesh da..........
मी तुम्ही दोघानिहि सान्गितलेले प्रयोग करुन पाहते..
@.मेधा...मुम्बैइतल्या उन्हाळ्यात ७-८ दिवसाकरता ह्वाय हा सिन्चन प्रकल्प...!!!
दिनेशदा, लगतचे शेजारी सुद्धा सुट्टीवर गेलेत..ऽआणि नविन असल्यमुळे फ़ारसे परिचीत नाहीत म्हनुन हा खटाटोप..!त
http://m.wikihow.com/Make-a-D
http://m.wikihow.com/Make-a-Drip-Irrigator-from-a-Plastic-Bottle
बाल्कनी किंवा घराच्या बागेतील रोपट्यांना, झाडांना आवश्यक पाणी तर मिळावे परंतु पाण्याची नासाडी होऊ नये यासाठी एक पाहिलेला उपाय - बिसलेरीच्या किंवा शीतपेयाच्या २ लिटरच्या जुन्या प्लास्टिक बाटल्या तळाशी साधारण १ इंचावर कापून, त्या बाटलीच्या झाकणाला १ ते ४ छिद्रे पाडून ती कापलेली बाटली झाकण लावून झाडांच्या मुळांशी मातीत उपडी खोचून ठेवणे. त्यात पाणी घातल्यावर छिद्रांमधून पाणी मुळांपर्यंत पोहोचते. पाणीबचत होते व झाडांचीही तहान भागते.
हे अरुंधती कुलकर्णी यांनी पाणीबचतीच्या http://www.maayboli.com/node/55466 या धाग्यावर दिले होते
हर्पेन यांनी दिलेला उपाय
हर्पेन यांनी दिलेला उपाय मागच्याच आठवड्यात पुण्यात पाहण्यात आला.
हे छिद्र सुईने पाडायचे
हे छिद्र सुईने पाडायचे खिड्याने वगैरे नको ते फार मोठे होईल. मी मागे अकोल्याला लग्नाला गेलो होतो आणि पुण्यात बालकनीमधे आमचीही झाडी आहेत. मी काही झाडे घरात आणली आणि काचेची खिडकी जिथे आहे तिथे ठेवली. काही झाडांमधे मिनरल वॉटरच्या बाटल्या भरुन ठेवल्या सुईने बारीक छिद्र केले होते. छान जमून आला हा प्रयोग आणि झाडे आठ दिवस मस्त तगलीत.
सुईने केलेल्या छिद्रात माती
सुईने केलेल्या छिद्रात माती अडकून पाणी झिरपणे थांबण्याचा धोका उद्भवतो.
बाहेरगावी जायच्या आधी ४-५ दिवस कसे काय होते / किती पाणी झिरपते वगैरे स्वतः पाहून मग काय ते ठरवावे हे उत्तम.
हर्पेन मग तुम्ही कशानी छिद्र
हर्पेन मग तुम्ही कशानी छिद्र पाडायला सुचवाल? मोठे छिद्र झाले की पाणी भराभर बाहेर पडते. चार पाच दिवस राहत नाही.
छिद्र पाडलेली बाटली टांगुन
छिद्र पाडलेली बाटली टांगुन ठेवुन त्या छिद्राकडुन दोरा/नाडी झाडाच्या मुळाशी आणली तर?
सुई पेक्षा मोठे पण
सुई पेक्षा मोठे पण खिळ्यापेक्षा लहान आकाराचे ज्याला आम्ही टेकस / चुका म्हणतो त्याने
मोठे भोक थोडे बुजून लहानही होऊ शकते.
आणि लहान भोक पाडून मग पाणी कमी पडतंय असे वाटले तर त्याला मोठे करणे हे ही ठीकच
माती कशाप्रकारची आहे बाटल्या टांगून ठेवणार का मातीत गाडून यानुसार ठरवावे.
आमच्याकडे कुंड्यांखाली ताटली ठेवून त्यात पाणी ठेवणे, कुंड्या सावलीत आणून ठेवणे असेही प्रकार केले होते.
मी बारीक सुईने १-२ भोकं
मी बारीक सुईने १-२ भोकं पाडून बाटल्या मातीत १-२ इंच खोल खुपसून ठेवल्या आहेत अनेकदा. मला तरी त्यात माती अडकण्याचा प्रॉब्लेम आलेला नाही. ९०डि किंवा जास्त तापमान असेल तेंव्हा अंगणातल्या टेंडर अॅनुअल्स च्या मुळांपाशी अन कुंड्यांमधल्या झाडांच्या मुळांपाशी अशा बाटल्या रोज लावून ठेवते मी.
अगदी महत्त्वाची झाडे मी
अगदी महत्त्वाची झाडे मी मातीपासून दहाबारा इंचावर छाटतो,पाने काढून टाकतो.पसरट ट्रे /ताटलीत पाणी इंचभर ठेवून बाल्कनीतून काढून ( पुढे ठेवलेली) खाली ठेवतो .आठ दिवसांनी येतो तेव्हा नवीन पालवी येत असते.मनी प्लांटचीपाने उतरवा आणि तीन चार काड्या ठेवा.गुलाबाची पाने कापून काड्या ठेवा .कळ्या फुले शेंडे छाटा.यशस्वी प्रयोग आहे.
४-५ महिन्यापु॑र्वी नवीन घरी
४-५ महिन्यापु॑र्वी नवीन घरी आलो जुना मालक कडिपाल्याचे रोप काढुन घेऊन गेला पण एक पिल्लु तसेच सोडुन गेला जे लक्षात आले नव्हते. लक्षात आले तेव्हा कळले की पाणी न मिळ्ताही कसेबसे तग धरुन राहिले होते. मग कोण्त्यातरी धाग्यावर बहुतेक रारने लिहिलेले आठवले की दूधाची बाटली संपली की ती विसळुन ते पाणी झाडांना चांगले. मग प्रत्येक बाटली संपली की विसळुन विसळुन पाणी घातले तेव्हामग १-२ महिन्यानी इवलुशी पाने आली त्याला. पण आता आमच्या इथला भयानक उन्हाळा सुरु होईल त्याने काळजीत आहे के रोपट्याला कसे वाचवु. आता हा बाटलीचा प्रयोग सुरु करावा लागेल.
बी, मेधा तुम्ही म्हणताय तसं
बी, मेधा तुम्ही म्हणताय तसं सुई / टाचणीने पाडलेली भोके पुरेसे पाणी पुरवणारी ठरावीत.
काल मी पण स्वतःच करून बघीतले.
मी सेफ्टी पिनेने भोकं पाडली. मी एकूण ७ भोके पाडली. पाडलेली भोके टाल्कम पावडरच्या डब्याला असतात तशी बाजूनी ६ आणि मधे १ अशी आहेत.
१२ तासात अर्धा इंच पाणी कमी झालंय १ लिटर बाटलीतले म्हणजे अशी १ बाटाली ५-६ दिवस पुरावी.
हो आणि मुख्य म्हणजे बाटलीच्या खालचा भाग (उलटा केल्यावर वरती आलेला) पुर्ण कापला नाहीये तर त्यालाही टाचणीने भोकेच पाडली आहेत.
२-३ दिवस केलेल्या प्रयोगानंतर अजून नीट कळू शकेल.
सुनिधी कडीपत्त्यचे रोप
सुनिधी कडीपत्त्यचे रोप अंगणात आहे ? लकी यू !
रोपाच्या मुळाशी थोडे फाइन मल्च किंवा पीट मॉस चा पात़ळ थर द्या. पाणी पहाटे उन वाढायचा आत द्या. अगदी ड्राय वाटत असेल तर वर लिहिल्या प्रमाणे प्लास्टिक बाटलीत पाणी भरुन ठेवत जा.
गूड लक