ई-कॉमर्स वेबसाईट

Submitted by प्रेरीत on 30 March, 2016 - 00:09

आम्ही एका ई-कॉमर्स वेबसाईट बनवण्यासाठी प्रयत्न करतो आहोत जी की व्यवसायाशी संबधीत आहे. प्रो-डेव्हलपर कडे जाण्याआधी खालील प्रश्न मनात आहेत-
१)ई-कॉमर्स साईट ऑनलाईन वेब-मेकर (विबली,शॉपिफाय व इतर) मधून तयार करणे कितपत योग्य ठरेल?
२)तसे करुन प्रॉडक्ट विक्री करणे,हॅकर्स्,बग्स च्या हिशोबाने किती सेफ आहे? ते तसे अनसेफ असेल तर उपाय काय आहेत?
३)ई-कॉमर्स साठी डोमेन्,होस्ट आणि रेजिस्ट्रेशन असा वार्षिक काय खर्च आहे आणि होस्ट स्पेस/चार्ज कसा असतो?

आमची ४ जणांची टिम आहे.त्यात वेगवेगळी डिपार्टमेंट्स प्रत्येकाने वाटून घेतली आहेत. प्रॉडक्ट्स चा प्लॅटफॉर्म सध्या R & D आहे.पण तो प्लिफकार्ट किंवा इतर कंन्झ्युमर उत्पादनांसारखा नसेल हे नक्की.

कृपया मार्गदर्शन करावे.
ध.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१)ई-कॉमर्स साईट ऑनलाईन वेब-मेकर (विबली,शॉपिफाय व इतर) मधून तयार करणे कितपत योग्य ठरेल?
>> शॉपिफायचे बरेच चांगले नाव ऐकले आहे. पण विबली मधे ईकॉम होऊशकेल का याबाबत माहिती नाही.
तुमच्या गरजा अगदी सरळसोट असतील, तुमच्या गरजेप्रमाणे फार काही विशिष्ट बदल करायचे नसतील तर + वर लिहिलेले प्लॅटफॉर्म वापरण्याचे तांत्रीक कौशल्य (जे काही लागत असेल) ते असेल तर योग ठरेल.

२)तसे करुन प्रॉडक्ट विक्री करणे,हॅकर्स्,बग्स च्या हिशोबाने किती सेफ आहे? ते तसे अनसेफ असेल तर उपाय काय आहेत?
>>
सेफ असावे. कारण यामधे त्या कंपन्या तुमच्या प्लॅटफॉर्मची जबाबदारी घेत आहेत. योग्य तसा सुरक्षीत परवलीचा शब्द वापरणे ई. तुमची जबाबदारी.

३)ई-कॉमर्स साठी डोमेन्,होस्ट आणि रेजिस्ट्रेशन असा वार्षिक काय खर्च आहे आणि होस्ट स्पेस/चार्ज कसा असतो?
>>
डोमेन नेमः अंदाजे ६०० - १५०० भारतीय रुपये प्रतिवर्ष हे .कॉम साठी. .इन इ. यापेक्षा स्वस्तात २०० रुपये प्रतिवर्ष आहे काही ठिकाणी. विशेष डोमेन्स साठी ही रक्कम काहीही असु शकते.
होस्टः वर उल्लेखलेल्या सेवांबाबत माहिती नाही. तरी अंदाजे १००० त १०,००० प्रतिमहीना - गरजेप्रमाणे

नक्की उत्पादन काय आहे त्यावर हे ठरवता येईल की शॉपिफाय ई. वापरावे की नाही.

शॉपिफाय सारखि अजुन एक साईट आहे zoey.com. In comparison Zoey is bettter than shopify.

३)ई-कॉमर्स साठी डोमेन्,होस्ट आणि रेजिस्ट्रेशन असा वार्षिक काय खर्च आहे आणि होस्ट स्पेस/चार्ज कसा असतो?>> Hosting charges depends on the required webspace. Domain registration will not cost you more than 600.

धन्यवाद।
अभिनव आभारी आहे सविस्तर प्रतिसादासाठी.
उत्पादन हे 'हँडक्राफ्ट' संबंधी आहे.वेब स्पेस बऱ्यापैकी जास्त लागणार.

पेमेंट गेटवे आम्ही सध्या यात धरत नाही आहोत कारण त्याचे ऑप्शन सध्या बेसिक ठेवणार आहोत.पेमेंट गेटवे अत्ता आम्हाला पर्वडणारे नाही.

वेब साइट विकसित करण्याचे बेसिक अगदीच बेसिक किंवा विबली वापरून आम्ही या आधी चांगल्या तात्पुरत्या साइट्स तयार केलेल्या आहेत. ईकॉमर्स हा पहिलाच प्रकार आहे.त्यामुळे या साइटस ना लागणारे फॉर्मेट वेगळे असल्याने विचारतो आहोत.

पेमेंन्ट गेटवे पेक्षाही फक्त लुक आणि सिस्टम आम्हाला फ्लिपकार्ट सारखी दिसली म्हणजे झाले.तेवढ़याच योग्यतेने अशा साइट्स वर वेब डिझाइन होउ शकते का की मर्यादा येतील,असे वाटते.

zoey.com नक्की पाहतो.
धन्यवाद.

इ कॉमर्स वेब साईट बनवणे एक गुंतागुंतीचे काम आहे. सुरुवातीच्या काळात जर ह्या विषयाची सखोल माहिती नसेल तर shopify वापरणे केंव्हाही चांगले. एक तर सुरुवातीची गुंतवणूक कमी होते आणि मुख्य काम (विक्री) कडे लक्ष देऊ शकता. सुरुवातीच्या काळात कराव्या लागतात. पण वेळेच्या तुलनेत मला ते फायदेशीर वाटते. माझ्या मते कमीत कमी वेळात तुम्ही विक्री सुरु करू शकला तर बाकीच्या महत्वाच्या करणे केंव्हाही योग्य. कुठल्याही व्यवसायाचा महत्वाचा भाग हा विक्री आहे. तुमच्या ग्राहकाला उत्पादनांमधून योग्य उत्पादन मागवता आले पहिजे. shopify आणि त्या सारख्या दुसर्या सास मध्ये काही सुविधा साठी त्यांचे पेड प्याकेज घ्यावे लागते.

काही वेळ वापरल्या नंतर तुम्हाला त्याच्या मर्यादा लक्षात येऊ लागतात. तसे वाटल्यास तुम्ही तुमचा अनुभव वापरून स्वतःची custom site बनवून घेऊ शकता. पण तो पर्यंत एखादे out of box soltion वापरणेच योग्य आहे.

धन्यवाद
बरीच माहिती निर्णयाप्रत येण्यासाठी पुरेशी वाटते आहे.
आभारी आहे