हल्लीच आम्ही काही मराठी संकेतस्थळावर काही महिने रोमात राहिलो. मराठी संकेतस्थळांचा इतिहास काही जाणकार लोकं इतर सायटींवर ददेतीलच पण ह्या स्थळांपैकी काहीवर आम्ही जे अनुभवले ते आम्ही इथे लिहीणार.
पहिले स्थळ मायबोली -- नको मायबोलीचा आढावा नंतर घेतो आता उसळपावाच्या तर्रीचा आस्वाद आधी घेवू मग साध वरण, तुप मिठ भात खाऊ.
मिसळवाव.
आता रोमात आणि उसळपावावर एकत्र कसे राहता येईल हा प्रश्न तुम्हास पडला असेल तर त्याचे आम्हास काही घेणेदेणे नाही.
मिसळ्पाव स्थळाची वैशीष्ट्ये.
१. उत्तम गुंडागर्दीचे ठिकान. - येथे राहील्यावर तुम्ही फोकलिच्या, गांx, बापxवला अश्या अनेक शिव्या तुम्हाला शिकायचा नसल्या तरी शिकावयास मिळतील. मालकच सारखे असे बडबडत असतात त्यामुळे काही सदस्य हे त्याचा वापर तुम्हावर करतील, तेंव्हा सावधान.
२. येथे काही सदस्यांचा खरडवहीत एकमेकांनी धमक्याकी दिल्या आहेत. "तुला मारिन, तुझे पाहून घेईन, पळता भुई थोडी करेन वैगरे. ( अहो काय झाले की आम्ही मिपावर रोजच्या प्रमाने रोमात राहयला गेलो तर तिथे एका नविन असलेल्या व स्वतःला इतिहास अभ्यासक म्हणवून घेणार्या सदस्याने (सदर सदस्य मायबोलीकर आहे). लेखनचौर्य हा लेख प्रसिध्द केला, तर आम्ही आमचा प्राण कानात आनुन ते ऐकत होतो. (पक्षी वाचत) तर तिथल्या एका माजलेल्या सदस्याने धमकी समजु नका तुम्हाला पळवून लावीन, असे त्या सदर लेखकाला सदस्याला लिहील. तो लेखक महाबेरकी असल्यामूळे व त्याचा लेख चोरी गेल्यामुळे त्या धमकी देणार्याला पुरुन (म्हणजे मातीत नाही हो) उरला. (थोडक्यात गुंडागर्दी करने आणी चालुवून घेणे हे या स्थळाचे वैशीष्ट्य. त्याच सदस्याने इतरही काही मेंबर्सला धमकी दिली असे त्यांचा खरडवहीतून वाचून आहोत.
३. ह्या स्थळावर कायमच आम्ही कसे चिखलातुन वाट काढत आहोत अशी न्युनगंडाची भावना सदस्यात रुजविली जाते. मग मनोगत, मायबोली वाले आम्हाला कसे पाण्यात पाहतात (आता चिखल पाण्यातच पाहिला जातो हे कोणीतरी तात्यारांवाना* सांगा हो) हे गळा काढून सांगीतले जाते. त्यामुळे इतर स्थळांची नावे कोणी लिहीली ही त्या सदस्याच्या नावाने गळा काढला जातो.
४. संभोगा विषयी मराठीत माहीती ह्या स्थळावर आजकाल रोज वाचायला मिळते. एकुनातच गल्लीच्या कट्यावर चार गुंड एकत्र येऊन पान थुंकत, शिव्या देत, वैषयीक गप्पा मारतात तसे हे स्थळ होऊ घातले आहे की काय अशी आम्हास भिती वाटते.
* हे तात्या आणि आम्ही वेगळे आहोत. आम्ही अद्याप कोणाचेही मालक झालेलो नाहीत. नाव पुर्ण देता येईल, पण प्रत्येक साईटीवाल्यांचे खरे नाव काय आहे, हे शोधाकार्य आम्ही तुमच्यावर सोपवतो. तुम्ही गेस करा आम्ही बरोबर की चूक ते आनंदाने सांगू.
मनोगत
१. इथे तुम्हाला शुध्दलेखन आलेच पाहिजे हा आग्रह असल्यामुळे आम्ही रोमातच राहिलो. इथे लिहीताना आम्हाला आत्यंतिक आनंदाचे भरते आले आहे व त्यामुळे कि बोर्डवर शब्द पटापटा उमटत आहेत.
२. टाबू असनारे विषय इथे चालत नाहीत.
३. हे स्थळ आंतरजालावर इतर मराठी स्थळांना जन्म घालते त्यामुळे सर्वजन ह्या स्थळाकडे "अतिपवित्र" म्हणून बघत असतात.
४. सकस लेखन असुनही म्हणावी तेवढी प्रगती होत नाहीये ह्या कडे शेटांनी लक्ष द्यावे.
५. इथे प्रतिसाद लगेच दिसत नाही. तो संपादित केला जातो. च्यायला, मग आम्ही तिथे का लिहावे?
मायबोली.
१. हे स्थळ 'अ' मध्ये असनार्या लोकांसाठी नसुन 'ब', 'क' वैगरेंसाठी आहे असे साहेबांनी आधीच लिहील्यामुळे आम्ही इकडेही रोमात राहिलो. कधी कधी लिहीले देखील. पण प्रतिक्रियाच दिल्या.
२. काही चांगल्या गोष्टी आम्हाला आढळल्या जसे वेगवेगळ्या गावांची कुजबुज, आयमिन बोलने हो, जसे पार्ले, पुणे. संवाद नावाचे सदर, असे इतर कुठेही नाही. येथील दिवाळी अंकही चांगले असतात.
३. गुलमोहराचा दर्जा दिवसेंदिवस घसरत चालला आहे. कुठल्याही फ दर्जाच्या कविता इथे येतात व त्यावरुन येथील काही सदस्य रणकंदन माजवतात. आजकाल हे रणकंदन वेगवेगळ्या बाफवर असते त्यामूळे आम्ही त्या बाफवरच पहिले जातो.
४. काही सदस्य हे स्वतःचेच स्थळ असल्याप्रमाने इतरांना उपदेश देत सुटतात. उपदेश देने हे लोकांना आवडत नाही, हे हल्लीच्या एका लेखावरुन सिद्ध झाले आहे. शुद्धलेखनाचा आग्रह आजकाल फारच वाढला आहे. ह्या स्थळाचेही मनोगत होईल हे मात्र मालकांनी गंभीररित्या घ्यावे.
आम्हास शुध्दलेखन आवडते, पण आम्हास शुध्द लिहीता येईल असे काही नाही.
त्यामुळे आम्ही रोमात राहनेच पसंत करु. (कधी कधी मजा म्हणून खिल्ली उडवीली जाईल)
४. ह्या साईटीवर मात्र खरी लोकशाही आहे. इथे मॉडरेटर्स नावाचा प्रकार आता अस्तित्वात नाही असे वाटते. सदस्यांनी(च) निट लिहावे ह्यावर भर दिला असल्यामुळे लोकशाही नांदत आहे. पराजीत न होणार्या साहेबांचा त्यामूळे आम्हास आदर वाटतो.
एवढे लिहून आमचे बोटं सध्या दुखत आहेत, नंत्तर परत लिहीन्याचे कष्ट घेईन. सध्या थांबतो.
आम्ही हा लेख एका वेगळ्या स्थळावर आधी लिहीलेला आहे, ह्याची नोंद घ्यावी.
स्थळ मला
मला जळी स्थळी ... पाताळी आठवल.
अरेरे
अरेरे लक्ष्मीकांतराव स्थळावरुन तुम्हाला फक्त जळी स्थळीच आठवलं. अहो मराठीत स्थळ म्हणजे छावा किंवा छावी हो. म्हणजे ऍरेंज केलेले छावे व छाव्या.
>>>आम्हास
>>>आम्हास शुध्दलेखन आवडते, पण आम्हास शुध्द लिहीता येईल असे काही नाही. स्मित त्यामुळे आम्ही रोमात राहनेच पसंत करु. (कधी कधी मजा म्हणून खिल्ली उडवीली जाईल)
आलं नाही तर शिकून घ्यायची सक्ती केली जाईलच. आणि खिल्लीही नक्कीच उडवली जाईल.
माबोवरच्य
माबोवरच्या सगळ्यात विनोदी वाक्य म्हणजे 'हे माझे वैयक्तिक मत आहे'. अरे राजा आम्ही कुठे म्हणतोय की तू शेजारच्याची मते सांगतोयस. कायच्या काय!! त्यावर कडी म्हणजे 'आता यावर चर्चा नको' आँ, आपले मत सांगून झाले की संपले? त्यावर बाकीच्यांनी काहीच बोलायचे नाही?

प्रत्येक गोष्टीचे द्यावे लागणारे प्रचंड एक्स्प्लेनेशन हेही इथले एक वैशिष्ठ्य.उदा.वर मी अरे राजा असे लिहिले आहे ते कोणत्याही राजा नावाच्या आय.डी वा व्यक्तीस उद्देशून नाही. हे सांगावे लागते.
ह्या साईटीवर मात्र खरी लोकशाही आहे.>> नक्कीच आहे,आणि एखाद्या बिबिवर झालेले आत्यंतिक मतभेद दुसरीकडे सहसा नेले जात नाहीत.विरोध शक्यतो विचारांचा असतो व्यक्तीचा नाही.उदा मी आणि लिंब्या कितिही भांडलो तरी ते मुद्यापुर्तेच असते.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
'हे माझे
'हे माझे वैयक्तिक मत आहे'. अरे राजा आम्ही कुठे म्हणतोय की तू शेजारच्याची मते सांगतोयस. >>>>> अगदी अगदी...
'आता यावर चर्चा नको' आँ, आपले मत सांगून झाले की संपले? >>>>> कारण ते हल्ली IMO असते..
>>>>> विरोध
>>>>> विरोध शक्यतो विचारांचा असतो व्यक्तीचा नाही
कधी कधी, व्यक्ती सोडून, "विविक्षीत" आयड्यान्नाच साताजन्माचे वैरी असल्यागत विरोध केला जातो रे भो! स्वानुभव हे!
...;
आपला, लिम्बुटिम्बु
obviously,(च्यायल
obviously,(च्यायला हा शब्द वापरायची पण भिती वाटतेय
).मला अजून इथे 'मुरायला' वेळ आहे,त्यामुळे तुम्ही म्हणताय तसला विरोध अजून व्हायचाय.बाकी विरोधापेक्षाही अनुल्लेख हे इथले जास्त प्रभावी हत्यार आहे (त्याबाबतीत तर लिंब्याची पियचडी आहे
)
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
पण अडमा.. इथे आपण इतर
पण अडमा.. इथे आपण इतर संकेतस्थळांची नावे काढून शिव्या देत नाही की नावे ठेवत नाही आणि संदर्भासाठीच केवळ इतर संकेतस्थळांचा उल्लेख आला तर त्यावर कुणाही खर्या मायबोलीकराला वा आडमिन आणि मॉडस ना त्रास होत नाही. आडमिनचा वा मॉडस चा आमच्याच इथे केवळ लिहिले पाहिजे असा आग्रहही कधीच नसतो.
-नी
हाहा नी !
हाहा नी ! अगदी खरं!!
निधपा तै
निधपा तै तुम्ही आम्हाला एक चांगला मुद्दा दिला. हे आम्ही विसरलोच हो.
अजुनही काही स्थळे (म्हणजे सायटी हो) बाकी आहेत. जसे उपक्रम, लोकायत आणि खास नविन बजबजपुरी. (तिकडे तुमचाही उल्लेख आहे, तर लेखनी चालवून घ्या त्यांचावर)
अरे राजा आम्ही कुठे म्हणतोय की तू शेजारच्याची मते सांगतोयस>> हे आवडलं. आगाऊराव तुम्ही खिल्लीदार लेखन करु शकता असे आम्हास वाटायला लागले. आमच्या आशा पल्लवीत झाल्या. (हे वाक्यच मोठ गमतीदार हाय नै. आशा पल्लवीत म्हणे )
>>खास नविन बजबजपुरी. (तिकडे
>>खास नविन बजबजपुरी. (तिकडे तुमचाही उल्लेख आहे, तर लेखनी चालवून घ्या त्यांचावर)<<
चिखलात दगड मारायचा मूड नाहीये सध्या!
-नी
:D
तात्या,
तात्या, तुमच्या व्यासंगपूर्ण अभ्यासाचा आम्हांस हेवा वाटतो आहे. या सर्व स्थळांची सरमिसळ करून, चांगले वाईट निवडून एक नवे स्थळ तुम्ही जन्माला घालावे, असे आम्हांस वाटते. (अन मग तुम्ही त्या स्थळाचे 'जनरल फायर' किंवा 'खिल्लीराव'
)
असे झाले, अन आम्ही सुचविलेली नावे वापरायची असल्यास सांगा हां!!
--
पुढच्या युगांची सर्वच दु:खे; मीही भोगीन म्हणतो,
आजच्या व्यथांना काय करावे; कुणी सांगतच नाही!
>>'जनरल
>>'जनरल फायर' किंवा 'खिल्लीराव'
अभ्यन्करा
अभ्यन्कराचो तात्या काय रे तू????
येवढा चान्गला आडनाव अस्ताना भयन्कर विन्चू कशापाई बाळगतोस??? DDD
...;
आपला, लिम्बुटिम्बु
छान वाटले
छान वाटले इथेच इतर सर्व गोष्टींचा उलगडा झाला हेच बरे..!
<<<< तात्या, तुमच्या व्यासंगपूर्ण अभ्यासाचा आम्हांस हेवा वाटतो आहे. या सर्व स्थळांची सरमिसळ करून, चांगले वाईट निवडून एक नवे स्थळ तुम्ही जन्माला घालावे, असे आम्हांस वाटते. (अन मग तुम्ही त्या स्थळाचे 'जनरल फायर' किंवा 'खिल्लीराव' )
साजिराच्या म्हणण्याप्रमाणे झाले तर... नविन स्थळ जन्माला घालतांना होणा-या बाळंतवेणांच्या वेदनांमधे आम्ही समस्त मायबोलीवाशिणी ( हे अगदी माहेरवाशिणिसारखे झाले) / मायबोलीकरीणी , सहभागी आहोत...! एवढच काय जन्मपुर्व आणि जन्मपश्चात करण्याचे सर्व संस्कारांबद्दल फुकटचे सल्ले देउ...!
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
स्मितहास्याची ही गोलंदाजी
पेलवेल त्याने करावी फलंदाजी....
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
म्हन्जे
म्हन्जे तात्या ख्ररा रिकामा आहे. काहीतरी उगीच विषय काढायचा आणि सुरु करुन द्यायच.
आशा
***
... कारण चड्डी असतेच (कुठे ना कुठेतरी) !
इथे तात्या
इथे तात्या म्हणजे मी असे लोकांना वाटते. तर लोकहो मी तात्या आहेच. पण अभ्यंकर नाही, विंचू ( ते विन्चू आमच्या शुद्धलेखनात बसत नाही लिंबूराव.) सांप्रत तात्या म्हणजे मी असा नविन वाद नका काढू. तात्याच्या स्थळाबद्दल आम्ही लिहीले तरी तात्याबद्दल योग्य तो आदर आहे. शेवटी सर्वच स्थळ साजुक तूपाची असली तर, मिसळ कुठे खाणार?
एक नवे स्थळ तुम्ही जन्माला घालावे, असे आम्हांस वाटते. (अन मग तुम्ही त्या स्थळाचे 'जनरल फायर' किंवा 'खिल्लीराव' >> नको रे बाबा. कुणाचे 'धनी' व्हायला आम्हाला जमत नाही. डायरु ने जी धमाल केलीये, ती मी करु शकत नाही. मी आपल त्या पिंक चड्यांवर पण मत नोंदवू शकलो नाही, तर स्थळ काढून मतांचा प्रसार आणि प्रचार कसा करणार?
हा लेख आवडला असेल तर अजुन एक लेख टाकावा म्हणतोय.
कुणी आमची लेखनास मदत करणार काय? झालयं काय की हे निट लिहायला खूप वेळ लागत आहे व आमची धनीन आम्हांवर रागवत आहे. तिला आता व्हँलेनटाईन दिनाची काय भेट द्यावी हा प्रश्न पडलायं, पण तो पिंक चड्डीने सुटला आहे असे वाटतेय. बघू काय होते ते.
व्हँलेंटाईनदिनाच्या योग्य त्या शुभेच्छा सर्वांना. भेटूच.
(अभ्यंकर नसलेला) तात्या.
कुणी आमची
कुणी आमची लेखनास मदत करणार काय? >> अहो पण उगाच कोणी म्हणायचे कि तुम्ही इतरांची मते सांगताय
तात्या,
तात्या, ग्रेट! छान लिहिलय. बाकी सायटींचा अभ्यास नाही, पण तू जे लिहिलस त्यावरून चांगली कल्पना येते.
शरद
काही सदस्य
काही सदस्य हे स्वतःचेच स्थळ असल्याप्रमाने इतरांना उपदेश देत सुटतात>>
उपदेश? आदेश म्हणायचय ना?
कुलदिपराव,
कुलदिपराव, त्यांचा प्रत्येक उपदेशाला तुम्ही आदेश म्हणून घेत असाल तर घ्या की . हाकानाका.