जरा एक प्रश्न पडला होता!

Submitted by shendenaxatra on 10 March, 2016 - 09:56

वरील शीर्षकातील जरा ह्या शब्दाचे नक्की स्थान काय? त्या शब्दाचा शब्दशः अर्थ इथे लागू होत नाही. इंग्रजीतही असे शब्द वापरले जातात. त्यांना इंग्रजीत pragmatic particles वा discourse particles अशी संज्ञा आहे.
ह्या प्रकाराला मराठीत काय म्हणावे? अशी संज्ञा विशेष ज्ञात नसली तरी असे शब्द व्यवहारात सर्रास वापरले जातात. विशेषतः जिथे शिष्टाचार पाळायचा असतो तिथे.

आणखी काही उदाहरणे पहा

१. थोडं काम कराल का माझे? (ह्यात थोडं ह्या शब्दाचा शब्दशः अर्थ अभिप्रेत नाही. आपली विनंती सौम्य करण्याकरता हा शब्द घातला आहे)

२. आता मी तरी काय सांगू? (ह्यातील आता हा शब्द).

तुम्हाला मराठीतली आणखी काही उदाहरणे सुचली तर नक्की कळवा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

संवादिक शब्द म्हणता येईल का?

"तसं पाहिलं तर", "खर सांगायचं झालं तर", "मी काय म्हणतो/म्हणते" हे पण discourse particles मध्ये मोडतील का?